AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्री की सकाळी? दूध पिण्याची योग्य वेळ कोणती?

दूध प्यायला सगळ्यांनाच आवडते असे नाही. पण दूध प्यायला पाहिजे. आपल्या शरीरासाठी ते खूप महत्त्वाचे आहे. दुधात अनेक महत्त्वाचे घटक असतात. ज्यामुळे शरीराला उर्जा मिळते. पण अनेकांच्या मनात एक प्रश्न आहे की, दूध कोणत्या वेळी प्यायला हवे. चला तर मग जाणून घेऊया.

रात्री की सकाळी? दूध पिण्याची योग्य वेळ कोणती?
shailesh musale
shailesh musale | Updated on: Jul 22, 2024 | 10:02 PM
Share

दूध आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. दूध हे एक सुपरफूड आहे. दुधात भरपूर पोषक घटक असतात. ज्यामध्ये कॅल्शियम, प्रथिने आणि निरोगी चरबी यांसारखे आवश्यक बहु-पोषक घटक आढळतात. दूध प्यायल्याने हाडे मजबूत होतात. याशिवाय स्नायू ही मजबूत होतात, शरीर सक्रिय राहते आणि मनही तीक्ष्ण होते. व्हिटॅमिन डी मेंदूचे कार्य सुधारते. पण असं असताना अनेकांच्या मनात हा प्रश्न येतो की ते सकाळी रिकाम्या पोटी दूध पिऊ शकतात का? चला तर मग जाणून घेऊया दूध पिण्याची योग्य वेळ कोणती?

तुम्ही सकाळी दूध प्यावे की रात्री ही तुमची वैयक्तिक निवड असू शकते. पण सकाळी रिकाम्या पोटी दूध पिणे हे व्यक्तीच्या आरोग्याच्या स्थितीवर आणि दुधाच्या प्रकारावर देखील अवलंबून असते.

सकाळी दूध पिण्याचे फायदे

सकाळी दूध प्यायल्याने तुमची पचनक्रिया सुधारते. सकाळी दूध प्यायल्याने कमकुवत हाडांना जीवदान मिळते आणि स्नायू मजबूत होतात. ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांनी सकाळी दूध जरूर प्यावे.

सकाळी दूध पिण्याचे तोटे

काही लोकांना दुधापासून लॅक्टोजची समस्या असू शकते, ज्यामुळे पोटदुखी, अतिसार किंवा गॅस होऊ शकतो. रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने ॲसिडीटी किंवा पोटात जळजळ होऊ शकते. ज्या लोकांना रिकाम्या पोटी दूध प्यायचे आहे त्यांनी गरम दुधाऐवजी थंड दूध प्यावे जेणेकरुन पचनसंस्था आणि ॲसिडिटीशी संबंधित समस्या उद्भवणार नाहीत.

दूध पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती?

तुम्ही सकाळी दूध पिऊ शकता पण ते पिण्यापूर्वी काही फळे किंवा नाश्ता करा. दूध कधीही रिकाम्या पोटी पिऊ नका, ते जेवणासोबत प्या. कमी चरबीयुक्त किंवा स्किम्ड दूध पिणे चांगले आहे, विशेषतः जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल किंवा हृदयाच्या आरोग्याची काळजी असेल. रात्री झोपण्यापूर्वी दूध पिणे देखील फायदेशीर ठरू शकते, कारण यामुळे झोप सुधारण्यास मदत होते. तसेच गरम दूध हळद ​​मिसळून प्या.

Follow Us
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
Eknath Shinde | हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान, ऑपरेशन तुडवावर जोरदार पलटवार
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
Uddhav Thackeray | माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार; ठाकरेंचे मोठे विधान
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
Uddhav Thackeray On Operation Kamal | ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले...
Uddhav Thackeray | आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले....
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली
Uddhav Thackeray | आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली; ठाकरेंची सिंहगर्जना
हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा इशारा
Gulabrao Patil | हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; श्रीकांत शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन्स
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा