Pain Killer Side Effect | शरीराला आतून पोखरतायत वेदनाशामक औषधे! जाणून घ्या कोणत्या गोळ्या शरीरासाठी हानिकारक…

एक नाही तर अनेक संशोधन अभ्यासात, जास्त पेन-किलर्स सेवन करणे आपल्यासाठी हानिकारक असल्याचे सिद्ध झाले आहे.

Pain Killer Side Effect | शरीराला आतून पोखरतायत वेदनाशामक औषधे! जाणून घ्या कोणत्या गोळ्या शरीरासाठी हानिकारक...

मुंबई : थोडीशी वेदना झाल्यास पेन किलर घेण्याची सवय आपल्यापैकी बऱ्याच जणांना आहे. त्यापैकी काही लोक असे आहेत, ज्यांना पेनकिलर घेण्याची सवयच लागली आहे. असे लोक नियमितपणे पेन किलर खातात. परंतु, तात्पुरत्या वेदना कमी करणारी ही औषधे गंभीर आजाराला कारणीभूत ठरू शकतात. होय, एक नाही तर अनेक संशोधन अभ्यासात, जास्त पेन-किलर्स सेवन करणे आपल्यासाठी हानिकारक असल्याचे सिद्ध झाले आहे (Pain Killer Side effect on human body).

पेन किलर अर्थात वेदनाशामक गोळ्यांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने आपल्या शरीराच्या अनेक भागांवर वाईट परिणाम होतात. या औषधांच्या सेवनाने हृदयविकाराचा झटका किंवा मूत्रपिंड-यकृत निकामी होण्याची समस्याही उद्भवू शकते. अशा परिस्थितीत पेन किलरचे सेवन अत्यंत मर्यादित प्रमाणात असणे आवश्यक आहे. ही वेदनाशामक औषधे फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सेवन करा. या आधी पेन किलर आपल्यासाठी किती हानिकारक आहेत आणि कोणत्या प्रकारचे पेन किलर अधिक नुकसान करतात, हे जाणून घ्या.

धोका ओळखा!

बाजारात पेन किलरचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. ज्यात केवळ गोळ्या, इंजेक्शन्सच नाहीत तर क्रिम, सिरप इत्यादींचा समावेश आहे. अनेक संशोधनात असा निष्कर्ष समोर आला आहे की, पेन किलरचा जास्त वापर केल्याने तुमच्या मेंदूवर देखील परिणाम होतो. ज्यामुळे तुम्हाला मेंदूशी संबंधित अनेक आजारांचा धोका होण्याची शक्यता असते.

त्याचबरोबर बर्‍याच पेन किलर्सचा तुमच्या किडनी आणि यकृतावरही वाईट परिणाम करतात. यकृत आणि मूत्रपिंड निकामी होण्याची भीती असण्याबरोबरच ही औषधे नैराश्याचे देखील कारण बनतात (Pain Killer Side effect on human body).

पॅरासिटामॉल

पॅरासिटामॉल हे औषध पेन किलर म्हणून सर्वाधिक वापरले जाते. असे म्हणतात की, शरीर हे औषध काही प्रमाणात सहन करू शकते. परंतु, याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने अॅलर्जीच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. तसेच, यकृत खराब होण्याचाही मोठा धोका निर्माण होतो. म्हणून, जर तुम्ही सतत हे औषध वापरत असाल, तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

एनएसएआयडी (NSAID)

बरेच पेन किलर्स नॉन-स्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग्स (NSAID) आहेत. कुठलीही पेन किलर विकत घेताना ती एनएसएड आहे की, नाही ते तपासून पाहा. जर, तसे असेल तर मग हे औषध सेवन करणे आपल्यासाठी धोकादायक आहे. हे औषध शक्यतो ताप, वेदना इत्यादींमध्ये वापरले जाते. त्यात स्टिरॉइड्स नसतात. तथापि, जास्त प्रमाणात सेवन केल्याने मूत्रपिंड, हृदय, रक्त आणि यकृत यांच्याशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

ओपिओईड्स (Opioids)

वेदना कमी करणारे औषध म्हणून ओपिओईड्स देखील बाजारात मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. कर्करोगाच्या उपचार दरम्यान वेदना देखील वापरले जाते. हे औषध दीर्घकालीन वेदना कमी करण्यासाठी वापरले जाते. मात्र, हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतले पाहिजे. या औषधामुळे बद्धकोष्ठता, नैराश्य, मूत्र संसर्ग, उलट्या यासारख्या समस्या उद्भवतात. याशिवाय इबुप्रोफेन पेन किलर्स पोटदुखी, मूत्रपिंड आणि हृदयाच्या समस्येचा धोकादेखील वाढवतात. तसेच, लहान मुलांना अ‍ॅस्पिरिन औषध देणे टाळा.

(Pain Killer Side effect on human body)

हेही वाचा :

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI