त्वचेच्या आजारांसाठी पतंजलीचे दिव्य कायाकल्प तेल फारच उपयोगी, पण कसा वापर करायचा?

दिव्य कायाकल्प हे तेल त्वचेच्या आरोग्यासाठी फार लाभदायी ठरते. या तेलामध्ये हळद तसेच इतर आयुर्वेदिक वनस्पती असतात. त्यामुळे हे तेल वापरल्यास लगेच त्वचा मुलायम होते असे म्हटले जाते.

त्वचेच्या आजारांसाठी पतंजलीचे दिव्य कायाकल्प तेल फारच उपयोगी, पण कसा वापर करायचा?
divya kayakalp
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 05, 2026 | 6:21 PM

Divya Kayakalp Oil : आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्यासाठीही वेळ नसतो. त्वचेच्या आरोग्याकडेही आपण सर्रास दुर्लक्ष करतो. बदलती जीवनशैली, प्रदूषण, जेवण्याची चुकीची सवय यामुळे त्वचेवर वाईट परिणाम होतो. त्यामुळेच गचकरण, त्वचेला खाज सुटणे, बुरशी लागणे अशा प्रकारचे आजार होतात. कितीही उपचार केला तरी हे आजार नंतर पिच्छा सोडत नाहीत. परंतु पतंजली या कंपनीचे दिव्य कायाकल्प तेल अशा आजारांचा नायनाट करू शकते. त्वचेची काळजी घेण्यासाठी हे तेल फार उपयोगी पडते.

त्वचेशी निगडीत असलेल्या सामान्या त्रासापासून सुटका व्हावी यासाठीच दिव्य कायाकल्प या तेलाची निर्मिती करण्यात आली आहे. या तेलाच्या उपयोगामुळे तुमची त्वचा निरोगी राहण्यास मदत होती. परंतु या तेलाचा नियमित वापर केला तरच तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये फरक पडलेला दिसतो.

दिव्या कायाकल्प तेल कसे वापरावे?

त्वचेला खाज सुटणे, फंगल इन्फेक्शन, एक्झिमा अशा आजारांवर मात दिव्य कायाकल्प तेल वापरले जाते. यासोबतच त्वचेची आग होणे, त्वचा लाल होणे, त्वचा कोरडी होणे यासाठी दिव्य कायाकल्प हे तेल फार मदतीला येते. अनेक लोकांना अॅलर्जीचाही त्रास होतो. अशा प्रकारचा त्रास दूर व्हावा यासाठीदेखील दिव्या कायाकल्प तेल वापरले जाते. या तेलाचा नियमित वापर केल्यास त्वचेला पोषण मिळते. सोबतच त्वचा मुलायम होण्यास मदत होते. हे तेल वापरले तर त्वचा कोरडी होत नाही.

दिव्य कायाकल्प तेलात नेमके कोणते तत्त्व असते?

दिव्य कायाकल्प तेलात लिंबू, हळद, चंदन तसेच अन्य आयुर्वेदिक वनस्पती असतात. कडूनिंब हे त्वचेसाठी फार उपयोगी असल्याचे बोलले जाते. सोबतच हळद शरीरावरील सूज, त्वचेला होत असलेली आग कमी करण्यासाठी फार उपयोगी पडते. दिव्य कायाकल्प वापरताना मात्र काही काळजी घेणे गरजेचे आहे. जखमेच्या ठिकाणी हे तेल वापरू नये. सोबतच हे तेल डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी. हे तेल लावल्यानंतर त्वचेला जळजळ होत असेल तर या तेलाचा वापर बंद करावा. सोबतच तुम्हाला खूपच त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.