AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PCOS आता झाला PMOS… महिलांनो तुम्हाला माहितेय झालेला हा मोठा बदल, जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात?

आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांना थायरॉईड, PCOD आणि PCOS यांसारख्या आजारांचा सामना कराला लागत आहे. पण आता PCOS हे PCOS राहिलेलं नाही. PCOS आता PMOS झालं आहे. यावर डॉक्टरांनी देखील मोठी माहिती दिली आहे.

PCOS आता झाला PMOS... महिलांनो तुम्हाला माहितेय झालेला हा मोठा बदल, जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात?
| Updated on: May 16, 2026 | 3:44 PM
Share

थायरॉईड, PCOD आणि PCOS यांसारखे आजार आजच्या घडीला अनेक महिलांना होत आहेत. लहान मुली देखील यांसारख्या आजारांचा सामाना करत आहेत. यासाठी जबाबदार फक्त आपली लाईफस्टाईल आहे. PCOS अनेक महिलांना आहे. पण हे नावच अनेकांसाठी दिशाभूल करणारं ठरलं आहे. डॉक्टर आणि संशोधकांमध्ये दीर्घकाळ चाललेल्या चर्चेनंतर, या आजाराचं नाव आता अधिकृतपणे बदलून पीएमओएस (पॉलीएंडोक्राइन मेटाबोलिक ओव्हेरियन सिंड्रोम) असं ठेवण्यात आलं आहे. त्यामागे देखील मोठं कारण आहे.

“PCOS” या नावाबाबत कोणते संभ्रम आहेत?

‘पॉलीसिस्टिक’ हे जुने नाव केवळ अंडाशयावरील गाठींकडे लक्ष वेधत होतं. वास्तविक पाहता, ही समस्या असलेल्या सर्वच महिलांच्या अंडाशयावर गाठी नसतात. स्कॅनमध्ये जे दिसतं त्या खऱ्या गाठी नसून, हार्मोनल असंतुलनामुळे वाढ थांबलेली फॉलिकल्स असतात. सामान्य गाठींप्रमाणे या फुटत नाहीत किंवा त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज नसते. या नावामुळे अनेक महिलांनी योग्य उपचार घेण्यास विलंब केला आहे.

पीएमओएस: संपूर्ण शरीरावर होणारे परिणाम:

तज्ज्ञांच्या मते, पीएमएस ही केवळ प्रजनन समस्या नाही. याचा परिणाम शरीराच्या संपूर्ण हार्मोनल आणि चयापचय प्रणालीवर होतो. यामुळे इन्सुलिन प्रतिरोध, वजन वाढणे, टाईप- 2मधुमेह, हृदयरोग, त्याचप्रमाणे चिंता आणि नैराश्य यांसारख्या मानसिक समस्यांचा धोका वाढू शकतो.

PMOS नावाचा अर्थ आणि महत्त्व:

नवीन नावातील प्रत्येक शब्द समस्या किती गंभीर आहे ते दर्शवतो.

पॉलीएंडोक्राइन: याचा अर्थ असा की शरीरातील इन्सुलिन आणि टेस्टोस्टेरॉनसह अनेक हार्मोनल प्रणाली प्रभावित होतात.

चयापचय: ​​हे शरीराच्या वजनाचे नियंत्रण आणि इन्सुलिन प्रणाली यांच्याशी असलेला घनिष्ठ संबंध दर्शवतं.

अंडाशय: यामध्ये अंडी निर्मिती आणि संप्रेरक (हार्मोन) निर्मितीमधील अंडाशयांच्या भूमिकेचा उल्लेख आहे.

सिंड्रोम: याला ‘सिंड्रोम’ म्हटलं जातं कारण याची लक्षणं प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळी असतात.

अनियमित मासिक पाळी, पुरळ, अनपेक्षित वजन वाढणं, चेहऱ्यावर नको असलेले केस वाढणं आणि केस गळणे ही त्याची काही सामान्य लक्षणं आहेत. या सर्वामागे ‘इन्सुलिन रेझिस्टन्स’ ही प्रमुख भूमिका बजावते. जेव्हा शरीरात इन्सुलिनची पातळी वाढते, तेव्हा अंडाशय अधिक टेस्टोस्टेरॉन तयार करतात, ज्यामुळे हार्मोनल असंतुलन होते.

उपचार आणि जीवनशैलीतील बदल

नाव बदललं असलं तरी, उपचाराच्या मूलभूत पद्धती मोठ्या प्रमाणावर जीवनशैलीवर अवलंबून असतात. प्रक्रिया केलेले अन्न टाळणं, नियमित व्यायाम करणं, पुरेशी झोप घेणं आणि तणाव कमी करणं आवश्यक आहे. काही लोकांना त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हार्मोन थेरपी किंवा इन्सुलिन नियंत्रित करणारी औषधे घेण्याची गरज भासू शकते. याप्रकरणात सर्वात महत्त्वाची गोष्टी म्हणजे कोणतेही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या…

Follow Us
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय