AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health: वेळेपूर्वीच कॅन्सरसारख्या रोगाला बळी पडत आहेत लोकं, ‘हे’ आहे कारण!

गेल्या काही वर्षांमध्ये तरूणांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढताना दिसत आहे, अशी माहिती लंडनमध्ये ब्रिघम आणि वुमन्स हॉस्पिटलच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून समोर आली आहे.

Health: वेळेपूर्वीच कॅन्सरसारख्या रोगाला बळी पडत आहेत लोकं, 'हे' आहे कारण!
महिलांच्या तुलनेत पुरुषांना कॅन्सर होण्याचा धोका अधिकImage Credit source: Social Media
| Updated on: Sep 09, 2022 | 6:49 PM
Share

खराब जीवनशैलीमुळे (Bad Lifestyle) कर्करोगाचे म्हणजेच कॅन्सरचे (Cancer) प्रमाण वेगाने वाढताना दिसत आहे. साधारणत: असे मानले जाते की कॅन्सरचा आजार 60 व्या वर्षानंतर होतो, मात्र आता हा घातक आजार 50 पेक्षा कमी वय असलेल्या लोकांमध्येही होत आहे. असा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे. लंडनमध्ये ब्रिघम आणि वुमन्स हॉस्पिटलच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. 1990 सालानंतर 50 वर्षांखालील लोकांमध्ये कॅन्सर होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. तरूणांमध्ये (Youth) कोलन, किडनी, लिव्हर आणि स्वादुपिंडाचा कॅन्सर झालेला दिसून येत आहे. लठ्ठपणा, मद्यपान करणे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, या गोष्टी कॅन्सरचे प्रमाण वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. तसेच अपुऱ्या झोपेमुळेही हा आजार बळावत असून तरूण पिढी त्या आजाराला बळी पडत आहे.

महिला रुग्णालयातील संशोधकांनी हे संशोधन नेचर रिव्ह्यू क्लिनिकल ऑन्कोलॉजीमध्ये प्रकाशित केले आहे. मिंटच्या वृत्तानुसार, गेल्या दशकभरात लोकांच्या जीवनशैलीत, दिनचर्येत खूप बदल झाला आहे. लोकांच्या झोपेचा पॅटर्न बदलला आहे, लठ्ठपणा वाढत आहे आणि लोकं पोषण व योग्य आहार घेण्याकडेही नीट लक्ष देत नाही, असे संशोधकांना आढळले आहे.

खराब लाईफस्टाईलमुळे वाढत आहेत कर्करोगाची प्रकरणे –

संशोधनात म्हटले आहे की, 1950 च्या दशकापासून मधुमेह, लठ्ठपणा, जीवनशैली सक्रिय नसल्याने आणि प्रक्रिया केलेले अन्न खाल्यामुळे शरीरात कॅन्सर होत आहे. खराब जीवनशैली, वेळेवर न झोपणे आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी या गोष्टी तरुणांमध्ये अधिक दिसून येत असून, त्यामुळे त्यांना कॅन्सर होत आहे. मात्र, अनेक प्रकरणांमध्ये तरुणांमधील कॅन्सरची लक्षणे लवकर ओळखून उपचार सुरू केले जातात, त्यामुळे मृत्यूची प्रकरणे नियंत्रणात राहतात.

महिलांमध्ये स्तनाच्या कॅन्सरचे रुग्णही लक्षणीयरीत्या वाढल्याचे या संशोधनातून दिसून आले आहे. एकूण १४ प्रकारच्या कॅन्सरमध्ये वाढ झाली आहे. कॅन्सरचे वेगळे कारण नसल्याचेही या संशोधनात आढळले आहे. इतर आजारांप्रमाणेच खाण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायाम न करणे आणि खराब जीवनशैली यामुळे हा आजार होत आहे.

ही आहेत कॅन्सरची लक्षणे –

  1.  अचानक वजन कमी होणे
  2.  सतत थकवा येणे
  3. शरीरातील एखाद्या भागातील गाठ सतत वाढत राहणे
  4.  पोट सतत खराब असणे
  5.  आवाजात बदल होणे
  6.  श्वास घेण्यास नेहमी त्रास होणे
  7.  लघवीतून रक्त येणे
  8.  तीव्र खोकला व त्यातून रक्तस्त्राव होणे
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.