Breastfeeding Week : अकाली जन्मलेल्या बाळांकरिताही स्तनपान आवश्यक; डॉ. मीता नाखरे यांचा सल्ला

Breastfeeding Week : आईचे दूध जन्मानंतर सुमारे दोन ते चार दिवसांनी तयार होते, परंतु जर वेळेआधी प्रसूती झाली तर दूध तयार होण्यास थोडा उशीर लागू शकतो. कांगारूंची केअर हे अकाली जन्मलेल्या बाळांमध्ये मजबूत बंध निर्माण करण्यास मदत करते. नवमातांसाठी हे अतिशय गरजेचे आहे.

Breastfeeding Week : अकाली जन्मलेल्या बाळांकरिताही स्तनपान आवश्यक; डॉ. मीता नाखरे यांचा सल्ला
अकाली जन्मलेल्या बाळांकरिताही स्तनपान आवश्यक; डॉ. मीता नाखरे यांचा सल्लाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 11, 2022 | 8:58 AM

पुणे : आई आणि बाळासाठी स्तनपानाचे (Breastfeeding Week) अनेक फायदे आहेत. अकाली जन्मलेल्या अर्भकांसाठीही आईचे दूध तितकेच महत्वाचे आहे. कारण ते त्यांना निरोगी आयुष्य बहाल करते. त्याचबरोबर प्रतिकार शक्ती वाढवून विविध आजार तसेच संसर्गांचा सामना आणि संक्रमणांपासून दूर ठेवण्यास मदत करू शकते. नव मातांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्तनपान करणे आवश्यक आहे, असं लोकमान्य हॉस्पिटलच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मीता नाखरे (Dr. Meeta Nakhare) यांनी सांगितलं. 37 ते 42 आठवड्यांपुर्वी म्हणजेच अकाली जन्मला आलेले बाळाला प्रिमॅच्युअर बेबी (premature baby) असे म्हणतात. अकाली जन्मलेल्या बाळाचे अवयव अनेकदा पूर्णपणे विकसित होत नसल्यामुळे, त्यांना श्वासोच्छवासाच्या समस्या, संसर्ग, अशक्तपणा आणि रक्तातील साखर कमी होणे यासारख्या विविध आरोग्य समस्यांचा सामना देखील करावा लागतो. अकाली जन्मलेल्या बाळाच्या पोषणाकडे सुरुवातीला दुर्लक्ष झाले तर भविष्यात अनेस समस्यांचा सामना करावा लागतो. आईच्या दुधामुळे बाळाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते, असंही त्या डॉ. नाखरे म्हणाल्या.

स्तनपान जागृती सप्ताहा निमित्त पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात डॉ. मीता नाखरे बोलत होत्या. अकाली जन्माला येण्यामागील कारणे जुळी ,तिळी मुलं किंवा इतर समस्या जसे की गर्भाशय किंवा नाळेची समस्या, धूम्रपान किंवा अवैध औषधांचा वापर, उच्च रक्तदाब आणि मधुमेह असू ही देखील कारणे असू शकतात. गर्भधारणेपूर्वी कमी वजन किंवा जास्त वजन असणे, गरोदरपणात एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू किंवा घरगुती हिंसाचार आणि आघात यासारख्या तणावपूर्ण घटना अशी काही कारणे अकाली प्रसुतीस कारणीभूत ठरु शकतात, असं लोकमान्य हॉस्पिटलच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मीता नाखरे यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

तर नळीद्वारे आहार द्यावा

बाळ सुरुवातीला स्तनपान स्वीकारू शकणार नाहीत कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती पूर्णपणे विकसित झालेली नाही. अकाली जन्मलेल्या बाळांच्या जठराचाही अनेकदा योग्य प्रकारे विकास होत नाही, त्यामुळे त्यांना तोंडातून किंवा नाकातून थेट पोटात टाकलेल्या नळीद्वारे अतिशय हळूहळू आहार द्यावा लागतो. परंतु, बाळाला आईचे दूध देणे अत्यावश्यक आहे कारण त्यात ॲंटीबॉडीज असतात जे रोगाशी लढण्यास आणि संसर्गास प्रतिबंध करण्यास मदत करतात, असंही नाखरे यांनी सांगितलं.

कर्करोगापासून बचाव होतो

स्तनपान विशेषत: नेक्रोटाइझिंग एन्टरोकोलायटिस (एनईसी) टाळण्यास मदत करते, हा एक धोकादायक रोग ज्यामध्ये आतड्याचे काही भाग सूजतात आणि खराब होतात. आईचे दूध आतड्यांची काळजी घेण्यास मदत करते आणि मेंदूच्या विकासास अनुमती देते. अकाली प्रसुती झालेल्या मातांच्या दुधामध्ये प्रथिने, सोडियम आणि क्लोराईडचे प्रमाण जास्त असते आणि लैक्टोजचे प्रमाण कमी असते. तसेच आईच्या दुधात असलेले फॅट्स बाळ सहजपणे पचवू शकते. आईच्या आरोग्यासाठीही स्तनपान महत्त्वाचे असते. हे आईला स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगापासून दूर ठेवण्यास मदत करते, बाळाशी तिचे संबंध आणखी मजबूत करते, तणाव कमी करते आणि प्रसूतीनंतरचे नैराश्य देखील कमी होते. एनआयसीयूमधील बाळाची प्रकृती नाजूक असते आणि त्याला त्वरित वैद्यकीय मदतीची आवश्यकता देखील भासते, असेही डॉ मीता नाखरे यांनी स्पष्ट केले.

डॉक्टरांचा सल्ला पाळा

आईचे दूध जन्मानंतर सुमारे दोन ते चार दिवसांनी तयार होते, परंतु जर वेळेआधी प्रसूती झाली तर दूध तयार होण्यास थोडा उशीर लागू शकतो. कांगारूंची केअर हे अकाली जन्मलेल्या बाळांमध्ये मजबूत बंध निर्माण करण्यास मदत करते. नवमातांसाठी हे अतिशय गरजेचे आहे. म्हणून, सर्व सूचनांचे पालन करण्याचा प्रयत्न करा आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे बाळाला स्तनपान करा, असा सल्ला अपोलो स्पेक्ट्रा पुणे येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ नितीन गुप्ते यांनी दिला.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.