‘ही’ आसने करा अन् डोकेदुखीला दूर पळवा, रामदेव बाबांनी सांगितला खास उपाय

Ramdev Baba: काही लोक डोकेदुखीकडे दुर्लक्ष करत असतात, मात्र हे मायग्रेन किंवा हाय ब्लड प्रेशर या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. डोकेदुखी दूर पळवण्यासाठी रामदेव बाबी यांनी खास उपाय सांगितला आहे. काही सोपी योगासन करून तुम्ही डोकेदुखी दूर पळवून लावू शकतात.

ही आसने करा अन् डोकेदुखीला दूर पळवा, रामदेव बाबांनी सांगितला खास उपाय
Ramdev baba tips for headache
| Updated on: Oct 23, 2025 | 6:56 PM

तुमच्यापैकी अनेकजण डोकेदुखीने त्रस्त असाल. काही लोक डोकेदुखीकडे दुर्लक्ष करत असतात, मात्र हे मायग्रेन किंवा हाय ब्लड प्रेशर या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. डोकेदुखी दूर पळवण्यासाठी रामदेव बाबी यांनी खास उपाय सांगितला आहे. काही सोपी योगासन करून तुम्ही डोकेदुखी दूर पळवून लावू शकतात. या आसनांमुळे डोकेदुखी कमी होते, तसेच मन देखील शांत होते. त्याच बरोबर रक्ताभिसरण सुधारतात आणि मानसिक ताणही कमा होतो. या योगासनांची माहिती जाणून घेऊयात.

डोकेदुखीची कारणे

कामाचा ताण आणि कमी झोप यामुळे डोकेदुखीचा त्रास होतो. तसेच मोबाईल किंवा संगणकाच्या स्क्रीनकडे जास्त वेळ पाहिल्यामुळे डोळ्यांवर ताण येतो यामुळेही डोकेदुखीचा त्रास होतो. तसेच डिहायड्रेशन झाल्यास, जास्त कॅफिन किंवा जंक फूडचे सेवन केल्यास, मोठा आवाज ऐकल्यासही डोकेदुखीचा त्रास होतो. हवामानातील बदल, हार्मोनल असंतुलन आणि रक्तदाबाच्या समस्येमुळेही डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. डोकेदुखी कमी करण्यासाठी पुढील आसने फायदेशीर ठरतील.

भ्रामरी

बाबा रामदेव यांनी सांगितले की, भ्रामरी हे योगासन डोकेदुखी आणि मायग्रेनसाठी फायदेशीर असते. हे आसन करताना, खोल श्वास घ्या आणि गुणगुणण्याचा आवाज करा. यामुळे मन शांत होते आणि ताण कमी होतो.

अनुलोम-विलोम

अनुलोम-विलोममुळे शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो आणि रक्तदाब नियंत्रित होतो. यामुळे मेंदूतील थकवा आणि मानसिक ताण कमी होतो. त्यामुळे डोकेदुखीही कमी होते.

शीतली

शीतली या आसनात जीभ नळीसारखी गोलाकार केली जाते. यात तोंडातून श्वास घेतला जातो आणि नाकातून श्वास सोडला जातो. हे आसन शरीराचे तापमान कमी करण्यास मदत होते आणि राग आणि ताण कमी करते.

शीतकरी

या आसनात दात थोडे उघडे ठेवून दातांमधून श्वास घेतला जातो आणि नाकातून श्वास सोडला जातो. यामुळे शरीर थंड होते, तसेच मनाला आराम मिळतो.

वरील सर्व आसने सकाळी रिकाम्या पोटी किंवा संध्याकाळी वातावरण शांत असताना करावीत. या आसनांचा नियमित सराव केल्यास डोकेदुखी कमी होते.

खालील गोष्टी लक्षात ठेवा

  • पुरेशी झोप घ्या आणि रात्री उशिरापर्यंत जाग नका.
  • भरपूर पाणी प्या.
  • ताणतणाव टाळा.
  • जास्त वेळ मोबाईल किंवा लॅपटॉप वापरू नका.
  • हलका आहार घ्या.
  • मोठ्या आवाजापासून दूर रहा.
  • योगासोबत ध्यानदेखील करा.