ओमिक्रॉनबाधित रुग्णांमध्ये पोस्ट कोविड समस्यांचे प्रमाण कमी, जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ?

| Updated on: Jan 29, 2022 | 8:08 PM

यावेळी जे लोक कोरोनामधून (Coronavirus) रिकव्हर होत आहेत, त्यांच्यामध्ये पोस्ट कोविड समस्या (Post covid problems)आढळून येत नसल्याचे समोर आले आहे. तसेच पहिल्या दोन लाटीच्या (Corona wave) तुलनेमध्ये तिसऱ्या लाटेत कोरोनातून रिकव्हर होण्याचा कालावधी देखील कमी झाला आहे.

ओमिक्रॉनबाधित रुग्णांमध्ये पोस्ट कोविड समस्यांचे प्रमाण कमी, जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ?
Corona patients
Follow us on

नवी दिल्ली :  यावेळी जे लोक कोरोनामधून (Coronavirus) रिकव्हर होत आहेत, त्यांच्यामध्ये पोस्ट कोविड समस्या (Post covid problems)आढळून येत नसल्याचे समोर आले आहे. तसेच पहिल्या दोन लाटीच्या (Corona wave) तुलनेमध्ये तिसऱ्या लाटेत कोरोनातून रिकव्हर होण्याचा कालावधी देखील कमी झाला आहे. पहिल्या दोन लाटेंमध्ये कोरोनातून रिकव्हर झाल्यानंतर देखील सहा महिन्यांपर्यंत रुग्णांना थकवा जाणवणे, श्वास घ्यायला त्रास होणे, हातपाय दुखणे अशा विविध पोस्ट कोविड समस्या जाणवत होत्या. मात्र यावेळी त्याचे प्रमाणत कमी आहे, तसेच रिकव्हर होण्याचा कालावधी देखील घटला असून, चार ते पाच दिवसांमध्ये कोरोनाचा रुग्ण ठणठणीत बरा होत आहे. याबाबत बोलताना डॉक्टरांनी सांगितले की, हा सर्व कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेल्या ओमिक्रॉनचा प्रभाव आहे. कोरोनाचा हा विषाणून डेल्टा आणि डेल्टा प्लसच्या तुलनेत सैम्य असल्याचे दिसून येते. त्यामुळे ओमिक्रॉनची लागण झालेले रुग्ण चार ते पाच दिवसांमध्येच रिकव्हर होत असून, त्यांना पोस्ट कोविड समस्यांचा देखील सामना करावा लागत नाही.

100 पैकी केवळ 1 व्यक्तीला पोस्ट कोविडची लक्षणे

याबाबत माहिती देताना दिल्लीच्या जीटीबी रुग्णलयातील पोस्ट कोविड सेंटरचे डॉक्टर अजीत कुमार यांनी सांगिले की, कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ज्यांना कोरोना झाला, त्यातील अनेक रुग्णांना पोस्ट कोविड समस्यांचा सामना करावा लागला होता. ज्यांना कोरोना होऊन गेला आहे, अशा रुग्णांनी पोस्ट कोविड उपचारासाठी गर्दी केली होती. मात्र या लाटेत रुग्णांना पोस्ट कोविडची फारशी लक्षणे दिसत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना अजीत कुमार यांनी सांगितले की, कोरोनातून बऱ्या झालेल्या केवळ 100 पैकी एका रुग्णालाच पोस्ट कोविडची लक्षणे दिसून येत आहेत.

ज्यांना पूर्वीचे आजार आहेत अशाच रुग्णांना लक्षणे

दिल्लीच्या लोकनायक रुग्णालयाचे मेडिकल डायरेक्टर डॉक्टर सुरेश कुमार यांनी याबाबत बोलताना सांगितले की, पहिल्या दोन लाटेमध्ये कोरोनातून बऱ्या झालेल्या जवळपास 50 टक्के रुग्णांमध्ये पोस्ट कोविडची लक्षणे आढळून आली होती. मात्र यावेळी फार थोड्या लोकांमध्ये अशी लक्षणे आढळून येत आहेत. विशेष: ज्या लोकांना पूर्वीचेच काही आजार आहेत आणि त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली, अशाच लोकांना सध्या पोस्ट कोविडसंबंधित समस्या निर्माण होत असल्याचे सुरेश कुमार यांनी सांगितले. सुरेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार डेल्टा विषाणूची ज्यांना लागण झाली होती, त्यांच्यामध्ये पोस्ट कोविडची लक्षणे अधिक होती. मात्र ज्यांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे, अशा रुग्णांमध्ये पोस्ट कोविडची लक्षणे दिसून येत नाहीत.

संबंधित बातम्या

आयुर्वेदामध्ये सांगितली आहे जेवणाची योग्य पद्धत; तुम्ही देखील जाणून घ्या

लठ्ठपणाची समस्या आहे? मग कोरफडीचे नियमित सेवन करा; जाणून घ्या इतरही अनेक फायदे

सफरचंदाची साल फेकताय… अनेक पध्दतीनेही होऊ शकतो उपयोग