लठ्ठपणाची समस्या आहे? मग कोरफडीचे नियमित सेवन करा; जाणून घ्या इतरही अनेक फायदे

कोरफड(Aloe vera) ही एक अशी वनस्पती आहे, जी विविध आजारांमध्ये (In diseases) वापरली जाते. कोरफडीमध्ये अनेक औषधी गुणधर्म (Medicinal properties) असतात. त्यामुळे आयुर्वेदामध्ये कोरफडीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.

लठ्ठपणाची समस्या आहे? मग कोरफडीचे नियमित सेवन करा; जाणून घ्या इतरही अनेक फायदे
कोरफड
Follow us
| Updated on: Jan 29, 2022 | 4:01 PM

अजय देशपांडे |  कोरफड(Aloe vera) ही एक अशी वनस्पती आहे, जी विविध आजारांमध्ये (In diseases) वापरली जाते. कोरफडीमध्ये अनेक औषधी गुणधर्म (Medicinal properties) असतात. त्यामुळे आयुर्वेदामध्ये कोरफडीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कोरफडीच्या नियमित सेवनाने पोटाशी संबंधित विविध आजार दूर होतात. तसेच कोरफडीमध्ये असे काही गुणधर्म असतात. की ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. सकाळी उठल्यानंतर काहीही न खाता कोरफडीच्या गराचे सेवन केल्यास तुमचा अनेक आजारांपासून बचाव होतो. तसेच पचनशक्ती देखील वाढते. एवढेच नाही तर कोरफडीमुळे त्वचेशी संबंधित देखील अनेक समस्या दूर होतात. कोरफडीमध्ये असलेले व्हेरा जेल हे एक जांगले मॉइश्चरायझिंग असल्यामुळे कोरफडीचा उपयोग हा अनेक सौंदर्य उत्पादनांमध्ये केला जातो. तसेच कोरफडीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म देखील आढळून येत असल्याने कोरफडीचा उपयोग हा हेल्थ ड्रिंकमध्ये देखील केला जातो. तुम्हाला जर लठ्ठपणाची समस्या असेल आणि तुम्ही जर कोरफडीचा नियमित वापर केला तर तुमचे वजन देखील कमी होते. तुम्ही कोरफडीचे पुढील पाच प्रकारे सेवन करू शकता.

भाजीच्या रसात मिसळून : कोरफड ही एक अत्यंत कडू वनस्पती असते. त्यामधून निघणारा गर कडू असल्यामुळे तो तुम्ही तसाच खाऊ शकत नाहीत. तुम्ही थोडासा कोरफडीचा गर हा भाजीमध्ये मिसळू शकता. भाजी तिखट असल्यामुळे तुम्हाला कडू चव लागणार नाही. याचा मुख्य फायदा असा की, असे नियमित केल्यास तुम्हाला पोटाच्या विविध आजारांपासून सुटका मिळू शकते.

जेवणापूर्वी कोरफडीचा रस प्या : जेवणापूर्वी कोरफडीचा रस प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. जेवणापूर्वी एक चमचा कोरफड खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते, ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी बर्न होऊन, तुमचे वजन देखील कमी होते.

कोमट पाण्यासोबत कोरफडीचे सेवन : चरबी जाळण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी कोमट पाणी सर्वोत्तम मानले जाते. दररोज रिकाम्या पोटी एक किंवा दोन ग्लास कोमट पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. तसेच कोमट पाण्यासोबत कोरफडीचे सेवन केल्यास तुमचे वजन झपाट्याने कमी होते.

लिंबाच्या रसासह कोरफडीचे सेवन : वजन कमी करण्यासाठी लिंबाचा रस देखील खूप प्रभावी आहे. लिंबूपाणीमध्ये कोरफडीचा रस मिसळल्याने तुमचे वजन लवकर कमी होऊ शकते.

मधासोबत कोरफडीचे सेवन : कोरफडीच्या रसामध्ये तुम्ही मधाचे काही थेंब टाकू शकता, ज्यामुळे कोरफडीचा कडूपणा काहीसा कमी होऊ शकतो. मधामध्ये देखील कोरफडीप्रमाणाचे अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. मध आणि कोरफडीचे सेवन नियमित केल्यास तुमचा विविध आजारांपासून बचाव होतो.

टीप : वरील माहिती ही सामान्य ज्ञानासाठी देण्यात आली असून, तुम्ही कुठलेही औषधोपचार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.

संबंधित बातम्या 

सफरचंदाची साल फेकताय… अनेक पध्दतीनेही होऊ शकतो उपयोग

उभं राहून पाणी पिणाऱ्यांनो, असं करण्याचे गंभीर परिणाम माहीत आहेत का? जाणून घ्या सविस्तर

‘नॉर्मल डिलिव्हरी’हवी आहे… मग या गोष्टी नक्की करा, सर्व समस्या होतील दूर

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.