उभं राहून पाणी पिणाऱ्यांनो, असं करण्याचे गंभीर परिणाम माहीत आहेत का? जाणून घ्या सविस्तर

जेवणाआधी किंवा जेवणासोबत तसेच जेवण झाल्यानंतर लगेच पाणी पित असाल तर हे तुमच्या शरीराला अपायकारक ठरु शकते. यामुळे तुमची पचनक्रिया बिघडून तुम्हाला अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

उभं राहून पाणी पिणाऱ्यांनो, असं करण्याचे गंभीर परिणाम माहीत आहेत का? जाणून घ्या सविस्तर
Follow us
| Updated on: Jan 29, 2022 | 11:10 AM

आपल्या शरीराचा बहुतांश भाग हा पाण्याने बनलेला आहे. मानवी शरीरास (Human body) एका दिवसाला साधारणत: तीन लीटर पाण्याची आवश्‍यकता असते. हवामानानुसार यात काही अंशी बदल होउ शकतात. आपल्याला अनेक वेळा तज्ज्ञांकडून पुरेसे पाणी पिण्याचा सल्लाही दिला जातो. याशिवाय शरीरात पाण्याचे संतुलित प्रमाण (Balanced amount of water) ठेवल्यास यातून शरीराला अनेक चमत्कारीक फायदेही (Benefits) आहेत. पाणी पिल्याने विषारी तसेच दुषित गुणधर्म मुत्रावाटे शरीराबाहेर जातात. मानसिक तणाव दूर होतो. पोटाचा कोठा साफ होउन ‘स्क्रीन ग्लो’ होण्यासही मदत होत असते. असे एकना अनेक फायदे पाण्याचे आहेत. परंतु पाणी कसे व केव्हा प्यावे, याबाबत फारशी जागृकता नसल्याने पाणी पिल्याने जेवढे फायदे आपणास मिळायला हवे तेवढे ते मिळताना दिसत नाहीत. जेवणासोबत पाणी पिल्यास (Water with meals) त्याचे फायदे कमी व नुकसानच अधिक होतात. त्यामुळे पाणी कसे, केव्हा व कधी प्यावेत हे जाणून घेणे महत्वाचे ठरते.

पाण्याच्या कमतरतेने पचनक्रियेवर परिणाम

शरीराला पुरेशा प्रमाणात पाणी न मिळाल्यास याचा परिणाम मानवी पचनक्रियेवर होत असतो. यासोबतच जेवणाआधी व जेवणासोबत पाणी पिल्यासही अन्नाचे पचन होण्यास बाधा निर्माण होउ शकते. तसेच जेवण झाल्यावर लगेच पाणी पिणे टाळावे, साधारणत: जेवण झाल्यावर अर्धा तासानंतर पाणी पिेणे केव्हाही योग्य असते. पाण्यात थंड तत्व असतात. भूक लागते तेव्हा पोटात आग निर्माण झालेली असते. आपण जेवणाच्या आधी पाणी पिल्यास पोटातील अग्नी शांत होउन भूक कमी होते. यामुळे पोटात जळजळ, अपचन आदी विविध व्याधींचा सामना करावा लागू शकतो.

एकदम पाणी पिणे टाळा

पाणी कधीही भराभरा पिणे टाळले पाहिजे. यामुळे शरीरातील आतील अवयवांवर वाइट परिणाम होत असतो. केव्हाही पाणी थोडे थोडे पिणे योग्य ठरते. भराभर पाणी पिल्याने यातून शरीरातील गॅस्ट्रिक पातळ होउ शकते, याचा परिणाम आपल्या पचनक्रियेवर निर्माण होउन परिणामी पोटात जळजळ होते. तहान लागल्यास जेवणाच्या अर्धा तास आधी आणि जेवणानंतर अर्ध्या तासांनी पाणी प्यावे. अन्नाचे योग्य पचन होण्यासाठी शक्यतो गरम पाणी प्यावे.

उभं राहून पाणी पिणे टाळा

धावपळीच्या युगात अनेकांना बसून पाणी पिण्यालादेखील वेळ नाही कुठे बाहेर असल्यास आपण उभं राहूनच सरळ ढसाढसा पाणी पित असतो. परंतु हीच सवय आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात अपायकारक ठरु शकते. उभ राहून पाणी पिल्यास पाणी सरळ आपल्या पोटातील अवयवांवर आदळते. यासह उभे राहून पाणी पिल्यास गुडघेदुखीचा त्रास जाणवत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे नेहमी बसून पाणी पिेणे फायद्याचे ठरते.

इतर बातम्या-

Budget Expectations| ऑटो क्षेत्राला मिळावा दिलासा, विकासाच्या दृष्टीने पाऊल उचला, मर्सिडीज-बेंझच्या काय आहेत अपेक्षा?

Travel Special|स्वर्गाहून सुंदर, जगातील सर्वात उंच शिवमंदिर, उत्तरांचलच्या कुशीत वसलेले चोपता हिलस्टेशन

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.