AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘नॉर्मल डिलिव्हरी’हवी आहे… मग या गोष्टी नक्की करा, सर्व समस्या होतील दूर

महिलांना त्यांची डिलिव्हरी नॉर्मल होणार की सिझेरियन होणार, याची चिंता असते. सर्वसामान्यपणे नॉर्मल डिलिव्हरी ही सर्वबाबतीत चांगली मानली जात असते. यात शस्त्रक्रीयेनंतच्या वेदना कमी होउन जनजीवन लवकर पूर्वपदावर येत असते.

‘नॉर्मल डिलिव्हरी’हवी आहे... मग या गोष्टी नक्की करा, सर्व समस्या होतील दूर
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Jan 29, 2022 | 10:12 AM
Share

मुंबई :  गर्भधारणा (Pregnancy) प्रत्येक स्त्रीसाठी एक सुखद अनुभव असतो. मातृत्वाचा अनुभव घेत असताना यासोबत अनेक चिंतादेखील सतावत असतात. त्यातीलच एक असते ती आपली डिलिव्हरी (Delivery) नॉर्मल होणारी की सिझेरियन पध्दतीने होणार.अगदी गर्भधारणेच्या पहिल्या दिवसांपासून मनात कुठेना ना कुठे ही चिंता महिलांना असतेच. नॉर्मल डिलेव्हरी चांगली मानली जात असते. प्राकृतिकदृष्ट्या होणारी प्रसुती ही सिझेरियनच्या तुलनेत कमी वेदनादायी असते. तर दुसरीकडे सिझेरियन केल्यास शारीरिक त्रास हा काही प्रमाणात कायमचा जडत असतो. शिवाय खर्चिक व वेदनादायी असल्याने प्रत्येक महिलेला आपली डिलेव्हरी ही नॉर्मलच व्हावी असे मनोमन वाटत असते. नॉर्मल डिलेव्हरीसाठी (Normal Delivery) महिलांकडून सुरुवातीलच्या काही महिन्यांपासूनच तज्ज्ञांचा सल्ला घेउन काही व्यायाम, चालणे आदी करण्यात येत असते. शिवाय आपल्या आहारातदेखील बरेच बदल करण्यात येत असतात. आज आम्ही आपणास अशाच काही उपायांची माहिती देणार आहोत, जे नॉर्मल डिलेव्हरीसाठी तुम्हाला मदत करतील.

बसून कामे करावीत

प्रसुतीच्या शेवटच्या दिवसांमध्ये महिलांना बसून घरे पुसने आदी कामांचा सल्ला फार पूर्वीपासून देण्यात येत असतो. यातून गर्भवती महिलांचा चांगला व्यायाम होतो. तसेच ‘पेल्विक’स्नायूंचा चांगला व्यायाम होतो आणि स्नायू थोडे शिथिल आणि लवचिक होत असल्याचा सल्ला तज्ज्ञांकडूनही देण्यात येत असतो. यातून नॉर्मल डिलेव्हरी होण्यास मदत होते.

शेवया व उडदाच्या दाळीचा समावेश

प्रसुतीच्या शेवटच्या दिवसांमध्ये अनेक गर्भवती महिलांना दूध व तुप टाकलेल्या शेवया तसेच उडदाच्या डाळीचे पाणी दिले जात असते. यामुळे योनीमार्गात गुळगुळीतपणा येत असल्याचे सांगण्यात येते. यातून नॉर्मल डिलेव्हरी होण्यास महिलांना मोठी मदत होत असते.

तणावमुक्त ठेवा

गर्भवती महिलांना तज्ज्ञांकडून प्रामुख्याने चालण्याचा सल्ला दिला जातो. सकाळ- संध्याकाळ मोकळ्या हवेत किमान अर्धा तास पायी चालण्याचा व्यायाम हा नॉर्मल डिलेव्हरीसाठी उत्तम मानला जातो. शेवट्या दिवसांमध्ये चालण्यामुळे पोटातील गर्भ हा हळूहळू खालच्या दिशेने सरकत असतो. त्यामुळे डिलेव्हरीच्या वेळी प्रसुत होण्यास अडचणी येत नसल्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. या शिवाय ध्यानधारणा श्‍वासांचे व्यायाम करण्याचाही सल्ला देण्यात येत असतो.

(सदर लेख केवळ माहितीच्या आधारवर लिहिला आहे. याला कुठल्याही प्रकारचा सल्ला समजू नये, अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)

संबंधीत बातम्या :

Mumbai Crime : मुंबईतून 8 कोटींच्या सोन्याची चोरी, राजस्थानमध्ये खड्ड्यात पुरलं, मुंबई पोलिसांकडून 10 जणांना अटक

12 आमदारांबाबतचा निकाल आणि नियुक्तीवरुन भाजप प्रवक्ते आणि उर्मिला मातोंडकर यांच्यात जुंपली, काय आहेत आरोप-प्रत्यारोप?

Shweta Tiwari Viral Video : ‘तर मी माफी मागते!’, भोवती टिकेचं वादळ घोंगावत असताना श्वेता तिवारीचा माफीनामा

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.