Shweta Tiwari Viral Video : ‘तर मी माफी मागते!’, भोवती टिकेचं वादळ घोंगावत असताना श्वेता तिवारीचा माफीनामा

Shweta Tiwari Viral Video : 'तर मी माफी मागते!', भोवती टिकेचं वादळ घोंगावत असताना श्वेता तिवारीचा माफीनामा
श्वेता तिवारी

'माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. पण तरीही कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांनी माफी मागते', असं श्वेताने म्हटलंय.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

Jan 28, 2022 | 6:15 PM

मुंबई: टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीचा (Tv Actress Shweta Tiwari) एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल (viral) होतोय. त्या व्हीडिओतील श्वेताच्या विधानावर काहींनी आक्षेप घेतला आहे. तर काहींनी तिच्या बोलण्याचा विपर्यास केला जात असल्याचं म्हटलंय. या सगळ्या प्रकरणावर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा (mp Home Minister dr. narottam mishra) यांच्याकडून श्वेताच्याविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. या सगळ्या प्रकरणावर श्वेताने आपली बाजू मांडली आहे. माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. पण तरीही कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांनी माफी मागते, असं श्वेताने (Shweta Apologies) म्हटलंय. तिचं एक ऑफिशिअल स्टेटमेंट समोर आलं आहे.

श्वेताकडून माफीनामा

अभिनेत्री श्वेता तिवारी स्टेटमेंटमध्ये म्हटलंय की, ‘माझ्या सहकलाकाऱ्याच्या मागच्या एका भूमिकेवरून माझ्या या विधानाचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. जेव्हा हा पूर्ण व्हीडिओ पाहिला जाईल तेव्हा लक्षात येईल की ‘भगवान’शी संबंधित मी जे बोलले ते सौरभ राज जैन याच्या प्रसिद्ध देवतेच्या भूमिकेला अनुसरून होतं. नेटकरी एखाद्या भूमिकेच्या नावाला कलाकारांच्या नावाशी जोडतात. माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. पण तरीही कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांनी माफी मागते.’

श्वेता तिवारीविरोधात मध्यप्रदेशचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांच्याकडून करण्यात आली.’श्वेताचं ते विधान मी ऐकलंय, पाहिलंय, तिचं ते विधान निंदनीय आहे’ असं ते म्हणालेत. तसंच त्यांनी या प्रकरणी भोपाळच्या पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

श्वेता तिवारीचं वादग्रस्त विधान काय आहे?

एका प्रमोशनसाठी श्वेता भोपाळमध्ये गेली होती. या प्रमोशनच्या कार्यक्रमादरम्यान श्वेता म्हणाली की, ‘माझ्या ‘ब्रा’ची साईज देव घेऊन जातोय’. तिच्या या विधानावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी हे विधान गंभीर असल्याचं म्हटलंय. तिच्या या विधानाचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

श्वेता तिवारी हिंदी टीव्हीतील प्रसिद्ध चेहरा आहे. ‘कसौटी जिंदगी की’ ही तिची मालिका विशेष गाजली. तिच्या कामाचं प्रचंड कौतुक झालं. पण सध्या या विधानामुळे तिच्यावर टीकेची झोड उठली आहे.

महत्वाच्या बातम्या

सुशांत सिंह राजपूतच्या ड्रग तस्कर शेजाऱ्याला एनसीबीकडून अटक, तब्बल 8 महिन्यांनंतर एसीबीच्या जाळ्यात

मिस्टर अॅण्ड मिसेस चांदकरांची वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, कलाकारांच्या नजरेतून करूयात जंगल सफारी

काखेतील केसांचा फोटो शेअर करत अभिनेत्री तिलोत्तमा म्हणते, ‘मी माफी मागणार नाही म्हणजे नाही!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें