सुशांत सिंह राजपूतच्या ड्रग तस्कर शेजाऱ्याला एनसीबीकडून अटक, तब्बल 8 महिन्यांनंतर एसीबीच्या जाळ्यात

सुशांत सिंह राजपूतच्या ड्रग तस्कर शेजाऱ्याला एनसीबीकडून अटक, तब्बल 8 महिन्यांनंतर एसीबीच्या जाळ्यात
एनसीबी

सुशांत सिंग राजपूतचा शेजारी ड्रग्ज तस्कर साहिल शाह एलियस फ्लैको याला एनसीबीने अटक केली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

Jan 28, 2022 | 5:07 PM

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर ड्रग्ज प्रकरण खूप जास्त चर्चेत आलं होतं. सुशांतच्या मृत्यूनंतर उघडकीस आलेल्या ड्रग्ज प्रकरणात अनेकांना अटकही झाली होती. बॉलीवूड आणि ड्रग्ज यांचं कनेकक्शन समोर आलं. मात्र हळूहळू प्रकरण निवळलं. आज सुशांतच्या शेजाऱ्याला एनसीबीनं (NCB) म्हणजेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली आहे. सुशांत सिंग राजपूतचा शेजारी ड्रग्ज तस्कर साहिल शाह एलियस फ्लैको याला एनसीबीने अटक केली आहे. साहिल शाह एलियस फ्लैको मागच्या 8 महिन्यांपासून फरार होता. या प्रकरणी येत्या काही दिवसात एसीबी अधिक तपास करणार असल्याचं समोर येतंय. त्यामुळे आता यापुढे या प्रकरणात काय होतं हे पहावं लागेल.

सुशांतच्या शेजाऱ्याला अटक

सुशांत सिंग राजपूतचा शेजारी ड्रग्ज तस्कर साहिल शाह एलियस फ्लैको याला अटक एनसीबीने अटक केली आहे. साहिल शाह एलियस फ्लैको मागच्या 8 महिन्यांपासून फरार होता. फ्लैकोची येत्या दिवसात कसून चौकशी करण्यात येणार असल्याचं एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये अटक करण्यात आलेला आरोपी गणेश शेरे आणि सिद्धांत अमीन यांच्याकडे 25 लाख रुपये किमतीचा 310 ग्रॅम गांजा आणि 1.5 लाख रुपये जप्त करण्यात आला होता. या प्रकरणी फ्लैकोचीदेखील चौकशी करण्यात येणार आहे. गणेश शेरे याने चौकशी दरम्यान फ्लैकोबाबतची माहिती दिली. या माहितीच्या आधारे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या मालाडच्या फ्लॅटवर छापा टाकला पण तेव्हा तो त्या जागी नव्हता. मात्र आज त्याला अटक केली आहे.

या प्रकरणातील ड्रग्ज तस्कर साहिल शाह एलियस फ्लैकोला अटक झाल्यानंतर आणखी काही नावं समोर येण्याची शक्यता आहे. एनसीबीकडून फ्लैकोची चौकशी केली जात आहे. या चौकशीत आणखी काही गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे.

फ्लैको बुधवारी रात्री उशिरा एजन्सीसमोर हजर झाला आणि त्याने आत्मसमर्पण केलं. साहिल शाह एलियस फ्लैको त्याच्या पत्नीसोबत दुबईत होता. तो नुकताच भारतात परतला आहे. एनसीबी अधिकार्‍यांनी सांगितलं की, ‘सुशांत सिंग राजपूतशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात ऑगस्ट 2020 मध्ये करण अरोरा आणि अब्बास लखानी यांना अटक केल्यानंतरही फ्लैकोचं नाव पुढं आलं होतं. मात्र तो भारतात नसल्याने त्यांनी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही.’

संबंधित बातम्या 

मिस्टर अॅण्ड मिसेस चांदकरांची वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, कलाकारांच्या नजरेतून करूयात जंगल सफारी

काखेतील केसांचा फोटो शेअर करत अभिनेत्री तिलोत्तमा म्हणते, ‘मी माफी मागणार नाही म्हणजे नाही!

Gangubai Kathiyawadi : आलिया भटच्या ‘गंगूबाई काठियावाडी’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी सिनेमा प्रदर्शित होणार

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें