Shweta Tiwari Video: ‘माझ्या ** ची साईज देव घेतोय’, टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीच्या विधानावरून वाद, मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्याचा कारवाईचा इशारा

Shweta Tiwari Video: 'माझ्या ** ची साईज देव घेतोय', टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीच्या विधानावरून वाद, मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्याचा कारवाईचा इशारा
श्वेता तिवारी

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीच्या एका वादग्रस्त विधानावरून सध्या जोरदार वाद रंगलाय. मध्य प्रदेशचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांनी तर थेट कारवाईचा इशारा दिला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Jan 27, 2022 | 7:31 PM

मुंबई : टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीने (shweta tiwari) एका कार्यक्रमादरम्यान ‘माझ्या ‘ब्रा’ ची साईज देव घेऊन जातोय’, असं विधान केलं आणि त्यावरून सध्या जोरदार वाद रंगलाय. मध्य प्रदेशचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा (MP Home Minister Dr. Narottam Mishra) यांनी तर थेट कारवाईचा इशारा दिला आहे.

श्वेता तिवारीचं वादग्रस्त विधान काय आहे? एका प्रमोशनसाठी श्वेता भोपाळमध्ये गेली होती. या प्रमोशनच्या कार्यक्रमादरम्यान श्वेता म्हणाली की, ‘माझ्या ‘ब्रा’ची साईज देव घेऊन जातोय’. तिच्या या विधानावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी हे विधान गंभीर असल्याचं म्हटलंय. तिच्या या विधानाचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

मध्यप्रदेशच्या गृहमंत्र्यांचा कारवाईचा इशारा

मध्य प्रदेशचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांनी कारवाईचा इशारा दिलाय. ‘श्वेताचं हे विधान मी ऐकलंय, पाहिलंय. तिचं हे विधान निंदनीय आहे’ असं ते म्हणालेत. तसंच ‘मी या प्रकरणी भोपाळच्या पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर त्या रिपोर्टची एक कॉपी मला द्या आणि नंतरच कारवाई करा’, असे आदेश दिल्याचंही नरोत्तम मिश्रा म्हणाले.

श्वेता तिवारी हिंदी टीव्हीतील प्रसिद्ध चेहरा आहे. ‘कसौटी जिंदगी की’ ही तिची मालिका विशेष गाजली. तिच्या कामाचं प्रचंड कौतुक झालं. पण सध्या या विधानामुळे तिच्यावर टीकेची झोड उठली आहे.

संबंधित बातम्या

Mouny Roy wedding : ‘बँण्ड बाजा वरात घोडा घेऊनी आले नवरोजी!’, मौनी रॉय करतेय लग्न, कोण आहे तिचा होणारा पती?, जाणून घ्या…

Shehnaaz Gill Birthday : बिग बॉसमध्ये एन्ट्री, सिद्धार्थसोबत मैत्री, पंजाबची कतरिना, वाचा शहनाझ गिलचे खास व्यक्तिमत्वाचे पैलू

Shreyas Talpade Birthday Special: 46 वं वर्ष गाठलं, तरीही चिरतरुण, ‘चॉकलेट बॉय’ श्रेयस तळपदेच्या चित्रपटांची यादी वाचून तुम्हीही व्हाल चकित

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें