गर्भवती स्त्रीने बाजरीची भाकरी खावी की नाही? जाणून घ्या काय आहे तज्ञांचे मत

पोषणामुळे गरोदरपणात महिलांच्या मनात अन्नाशी संबंधित अनेक प्रश्न निर्माण होतात. यापैकी एक प्रश्न म्हणजे गरोदरपणा स्त्रिया बाजरीची भाकरी खाऊ शकतात का? बाजरीची भाकरी गरम असल्यामुळे काही जण गर्भवती महिलांना बाजरीची भाकरी न खाण्याचा सल्ला देतात. जाणून घेऊ यावर तज्ञांचे मत काय आहे.

गर्भवती स्त्रीने बाजरीची भाकरी खावी की नाही? जाणून घ्या काय आहे तज्ञांचे मत
bajra roti
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: Jan 21, 2025 | 12:42 AM

गरोदरपणात महिलांना स्वतःची तसेच पोटातील बाळाची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे असते. गर्भधारणेचा संपूर्ण कालावधी महिलांसाठी कोणत्याही आव्हानापेक्षा कमी नसतो. या काळात महिलांनी त्यांच्या योग्य जीवनशैलीचे पालन केले पाहिजे आणि खाण्याची दिनचर्या योग्य ठेवली पाहिजे. बहुतेक लोक हिवाळ्यात बाजरीची भाकरी खातात. हिवाळ्यात बाजरीची भाकरी खाल्ल्यामुळे शरीर आतून उबदार राहते. पण बाजरी गरम असते त्यामुळे गर्भवती महिला बाजरीची भाकरी खावू शकतील का? असा प्रश्न अनेक वेळा उपस्थित होतो.

आहार तज्ञ मोहिनी डोंगरे सांगतात की बाजरीत व्हिटॅमिन बी, लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यासारखे अनेक पोषक घटक आढळतात. त्यामुळे गरोदरपणात बाजरीच्या भाकरीचे सेवन करणे फायदेशीर ठरते. बाजरी ही उष्ण असते त्यामुळे गर्भधारणे दरम्यान तिचे सेवन मर्यादित प्रमाणातच करावे असेही तज्ञांचा मत आहे. तज्ञांनी गरोदरपणात बाजरीची भाकरी खाण्याचे काही फायदे सांगितले आहेत.

हिमोग्लोबिन वाढते

बाजरी मध्ये लोह भरपूर प्रमाणात असल्याचे आहार तज्ञ सांगतात. बाजरीची भाकरी खाल्ल्याने अशक्तपणा दूर होतो. गरोदरपणात बाजरीची भाकरी खाल्ल्याने महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता होत नाही. त्याचा फायदा गर्भातील बाळाला होतो.

बद्धकोष्ठतेसाठी फायदेशीर

बाजरीच्या भाकरी मध्ये जास्त प्रमाणात फायबर असते. गरोदरपणात बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी हे उपयुक्त आहे. यामुळे पचनाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. बाजरीच्या भाकरी मध्ये प्रोबायोटिक्स असतात जे आतड्यांचे आरोग्य सुधारतात.

शरीराला ऊर्जा मिळते

गर्भधारणे दरम्यान महिलांमध्ये थकवा, अशक्तपण आणि सुस्ती दिसून येते. बाजरीच्या भाकरीमध्ये कार्बोहायड्रेट आढळतात असे तज्ञांचे म्हणणे आहे. हे शरीराला ऊर्जा देण्याचे काम करते.

तज्ञांचे म्हणणे आहे की ज्या महिलांना गर्भधारणेच्या सुरुवातीपासूनच आरोग्याच्या समस्या आहे त्यांनी बाजरीची भाकरी खाऊ नये. अशा महिलांनी गर्भधारणे दरम्यान बाजरीची भाकरी आणि भरड धान्यापासून बनवलेले इतर अन्नपदार्थ टाळावे. अन्यथा खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.