
Malasana Benefits: योगासनामुळे शरीर केवळ लवचिक होत नाही तर शरीर आतून देखील चांगले होते. त्यामुळे आजच्या धावपळी आणि चुकीच्या आहारशैलीत योगाचा आधार महत्वाचा आहे. योगासने जर रोज केली तर तुम्ही दिवसेंदिवस तरुण दिसाल आणि तुमच्या चेहऱ्यावर तेज येईल. अनेकांना बद्धकोष्ठतेचा त्रास असतो. त्यामुळे तुम्ही जर रोज सकाळी मलासन ( Malasana ) केले तर शरीराच्या आत कसा आराम मिळतो याचा पडताळा तुम्हाला स्वत:ला येईल.
योगासन गुरु तनू यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ त्या म्हणतात की, मी एक महिना रोज सकाळी मलासन पोझमध्ये बसुन गरम पाणी पिण्याचा प्रयोग केला. त्यानंतर त्यांना जो आराम मिळाला याची माहीती त्यांनी दिली आहे.
योग एक्सपर्ट तनू यांच्या मते तर या अशा प्रकारे रोज मलासन पोझमध्ये बसुन गरम पाणी प्यायल्याने पचनयंत्रणेत सुधार झाला. सकाळी अशा पद्धतीने गरम पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठता ( Constipation ) पूर्णपणे दूर झाली आणि बॉवेल मूव्हमेंट नियमित झाली.मलासनात बसून कोमट पाणी पिल्याने आतडी स्वच्छ झाली. त्यामुळे संपूर्ण हलके आणि आरोग्यदायी वाटायला लागले.
महिलांसाठी हा प्रयोग आणखीनच फायदेशीर झाला. योग एक्सपर्टच्या मते मलासन केल्याने महिलांचे मासिक सायकल आधीपेक्षा नियमित झाला. तसेच पिरिएड्स दरम्यानची दुखणी हळूहळू कमी झाली.
सकाळी उठल्यानंतर ज्यांना मळमळल्यासारखं वाटत होतं ते सर्व बरे झाले आहे. एक्सपर्टच्यामते मलासनात बसल्याने हिप्स मोबिलिटी वाढते. ज्यामुळे बराच काळ उभे राहण्यास शरीर तयार होते. तर गरम पाणी प्यायल्याने शरीर आतून डिटॉक्स करायला मदत होते. त्यामुळे संपूर्ण दिवस अधिक उर्जादायी आणि एक्टीव्ह तसेच मेंटली स्टेबल रहाता.
तुम्ही दिवसाची सुरुवात एका चांगल्या सवयीने करणार असाल तर मलासनात बसुन गरम पाणी पिण्यास सुरुवात करा आणि यामुळे तुमची पचन यंत्रणाच सुधारत नाही तर शरीरास संपूर्ण दिवसभर एनर्जी मिळते. त्यामुळे ज्यांना पोट साफ होत नाही अशांनी सकाळी उठल्यानंतर अशा प्रकारे मलासनात बसून गरम पाणी पिण्यास सुरुवात करावी असा सल्ला एक्सपर्ट देत आहेत.