AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान ! टॉयलेट सीटवर अती वेळ घालवणे पडेल भारी, शरीराला पडू शकतो ‘या’ आजारांचा विळखा..

अनेक लोक टॉयलेटमध्ये तासन्तास बसलेले असतात, जर तुम्हालाहीव ही विचित्र सवय असेल तर आत्तापासूनच काळजी घ्या, नाहीतर तुम्हाला अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो.

सावधान ! टॉयलेट सीटवर अती वेळ घालवणे पडेल भारी, शरीराला पडू शकतो 'या' आजारांचा विळखा..
Image Credit source: Freepik
| Updated on: Feb 10, 2023 | 11:39 AM
Share

नवी दिल्ली : आजकाल लोक अनेकदा तासन् तास बाथरूममध्ये बसलेले. अनेक लोकांना टॉयलेट सीटवर (toilet seat) बसून पेपर वाचायचीही सवय असते, तर अनेकजण तासन्तास मोबाईल (mobile) वापरतात. पण टॉयलेट सीटवर जास्त वेळ बसल्याने अनेक गंभीर आजार तुमच्या शरीराला (disease)  विळखा घालू शकतात, हे तुम्हाला माहीत आहे का ? तज्ज्ञांच्या मते, टॉयलेट सीटवर 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसणे धोकादायक असते, कारण तेथे अनेक जीवजंतू असतात, जे साध्या डोळ्यांनी दिसत नाही. ते आपल्या शरीरासाठी अतिशय घातक असतात. टॉयलेटमध्ये जास्त वेळ का बसू नये व त्यामुळे काय परिणाम होतात हे जाणून घेऊया.

बॅक्टेरिआ तुम्हाला पाडतात आजारी

टॉयलेटच्या आत आणि टॉयलेट सीटवर अनेक प्रकारचे धोकादायक जंतू असतात, जे स्वच्छता केल्यानंतरही पूर्णपणे जात नाही. जेव्हा एखादी व्यक्ती अनेक तास टॉयलेटमध्ये पेपर किंवा फोन घेऊन बसते तेव्हा ते धोकादायक जंतून पेपर व फोवलाही चिकटतात. घरात पेपर पुन्हा आणला जातो आणि मोबाईलचाही सतत वापर होतो. या दोन्ही गोष्टी साफ करता येत नाहीत. या दोन्ही सवयींमुळे तुम्ही वारंवार आजारी पडू शकता. म्हणूनच टॉयलेटमध्ये जास्त काळ बसू नये. तसेचे तेथे मोबाईल अथवा पेपरचाही वापर करू नये, असा सल्ला तज्ज्ञ देतात.

होऊ शकतो मूळव्याधाचा त्रास

तज्ज्ञांच्या मते, जे लोक टॉयलेट सीटवर जास्त वेळ बसतात त्यांना मूळव्याध होण्याचा धोका जास्त असतो. याचे मुख्य कारण पाठीच्या खालच्या भागाच्या स्नायूंवर दीर्घकाळ ताण पडतो, ज्यामुळे मूळव्याध होऊ शकतो, असे मानले जाते. मूळव्याध झाल्यास गंभीर वेदना तर होतातच पण भविष्यातही अनेक त्रास सहन करावा लागू शकतो.

पचनावर होतो परिणाम

जे लोक टॉयलेट सीटवर बराच वेळ बसतात, त्यांच्या बाऊलिंग मूव्हमेंटवरही परिणाम होतो. त्यातील बिघाडामुळे बद्धकोष्ठतेची समस्या वाढू शकते. पोट नीट साफ होत नाही आणि पोटाच्या समस्या वाढू लागतात. नीट खाता-पिता येत नाही, ज्यामुळे तुमची तब्येत बिघडू शकते तसेच वजनावरही परिणाम होऊ शकतो.

स्नायू कमकुवत होतात

जे लोक टॉयलेट सीटवर बराच काळ बसलेले असतात, त्यांच्या पाठीचे आणि पोटाचे स्नायू सैल होऊ लागतात. या स्थितीमुळे तुमच्या हिप आणि पायांचे स्नायू कमकुवत होऊ लागतात. म्हणूनच टॉयलेटमध्ये जास्त काळ बसू नये.

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती