हृदयापासून हाडांपर्यंत… तिनं सगळंच दान केलं, मुंबईत चर्चा त्या स्पॅनिश महिलेची

माणुसकी असते तिथे भौगोलिक सीमाही फिक्या पडतात, हेच या महिलेच्या उदाहरणावरून पुन्हा एकदा सिद्ध झालंय.

हृदयापासून हाडांपर्यंत... तिनं सगळंच दान केलं, मुंबईत चर्चा त्या स्पॅनिश महिलेची
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jan 13, 2023 | 11:06 AM

मुंबईः या जगात कोण कधी कुणाच्या कामी येईल, सांगता येत नाही. एखाद्याच्या मदतीला आपण धावून आल्याचं समाधान काही वेगळंच असतं. त्यातल्या त्यात एखाद्याचे प्राण वाचवण्याचं पुण्य तर सर्वोतोपरी. मुंबईत सध्या अशाच दानशूर महिलेची चर्चा आहे. कामासाठी, रोजीरोटीसाठी सतत धावणाऱ्या मुंबईकरांना (Mumbai) याची फार खबरबात नसेल. पण वैद्यकीय (Medical) क्षेत्राशी संबंधित लोकांमध्ये एका महिलेच्या दानाशूरतेची सध्या चांगलीच चर्चा आहे.

भारताच्या सफरीवर आलेल्या स्पॅनिश महिलेने पाच जणांना जीवनदान दिलं. जसलोक हॉस्पिटलमध्ये या महिलेवर उपचार सुरु होते. डॉक्टरांनी तिला ब्रेन डेड घोषित केलं. त्यानंतर महिलेल्या कुटुंबियांच्या परवानगीनंतर तिचे बहुतांश अवयव दान करण्यात आले. यामुळे चार भारतीय नागरिक आणि एका लेबनानच्या नागरिकाचे प्राण वाचले.

टेरेसा मारिया फर्नांडिज असे या स्पॅनिश महिलेचं नाव असून ६७ वर्षांची होती. भारत भ्रमंतीवर आलेली असताना मुंबईत ५ जानेवारी रोजी तिला हेमोरिजिक स्ट्रोक झाला. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जसलोक हॉस्पिटलमध्ये एवढे दिवस उपचार घेतल्यानंतरही तिच्या प्रकृतीत सुधारणा नव्हती. अखेर डॉक्टरांनी तिला ब्रेन डेड घोषित केले. तोपर्यंत तिचे नातेवाईक मुंबईत दाखल झाले होते.

या स्पॅनिश महिलेची मुलगी व्यवसायाने डॉक्टर आहे. माझ्या शरीराचे अवयव दान करायचे आहेत, ही आईची इच्छा होती, असे महिलेच्या मुलीने सांगितले. त्यानंतर कुटुंबियांनी मिळून महिलेचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला.

कुटुंबियांच्या इच्छेनुसार, महिलेचे फुप्फुस, हृदय, आतडे भारतीय रुग्णांना दान केले. महिलेचं हृदय लेबानी नागरिकाला दान करण्यात आलं. हाडंदेखील दान केली.

मुंबईतल्या ५४ वर्षीय डॉक्टरला या महिलेचं यकृत दान करण्यात आलं. यामुळे त्यांचे प्राण वाचले. नानावटी रुग्णालयात अवयव प्रत्यारोपणाची प्रक्रिया पूर्ण झाली.

जसलोक रुग्णालयाचे डॉक्टर आंबेडकर म्हणाले, या स्पॅनिश महिलेच्या घटनेपासून आपण आदर्श घ्यायला हवा. दुसऱ्या देशात असूनही या कुटुंबाने कोणताही संकोच न बाळगता अवयवदान केलं. माणूसकीला भौगोलिक सीमा नसतात, हेच त्यांनी दाखवून दिलंय.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.