
उन्हाळ्यात तुमच्या त्वचेची विशेष काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. बदलत्या हवामानामुळे तुमच्या त्वचेची काळजी घेतले नाही तर त्वचेच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. अशा परिस्थितीमध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी तुमच्या दिनचर्यामध्ये बदल करणे गरजेचे आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेवर तेलकटपणा आणि धाम वाढतो. चेहऱ्यावर तेलाचे प्रमाण वाढल्यामुळे पिंपल्स, मुरूम सारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. चेहऱ्यावरील तेलकटपणामुळे आणि घामामुळे चेहऱ्यावरील छिद्रे बंद होतात, चेहऱ्यावर बारिक पुरळ येतात आणि त्वचेच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. उन्हाळ्यात चेहरा धुतल्यावर काही विशेष गोष्टी लावणे फायदेशीर ठरेल.
उन्हाळ्यात त्वचेला जास्त प्रमाणात घाम येतो. चेहऱ्यावर घाम आल्यामुळे पुरळ आणि खाज यांच्या सारख्या समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. अनेकवेळा सूर्यप्रकाशामुळे चेहऱ्यावर लालसरपणा दिसून येतो. त्वचेचं संरक्षण करण्यासाठी मार्केटमध्ये अनेक क्रिम्स पाहायला मिळतात. परंतु क्रिम्समध्ये भरपूर प्रमाणात रसायनिक पदार्थांचा वापर केला जातो. परंतु अनेक घरगुती उपाय आहेत ज्यांचा वापर केल्यामुळे तुमची त्वचा हेल्दी चमकदार आणि निरोगी राहाते.
टोनर – चेहरा धुतल्यानंतर टोनर वापरणे खूप फायदेशीर आहे. टोनर त्वचेची पीएच पातळी संतुलित करण्यास मदत करते, ते त्वचेच्या छिद्रांना घट्ट करण्यास देखील मदत करते. तुम्ही गुलाबपाणी किंवा काकडीचा रस देखील वापरू शकता, कारण ते त्वचेला थंड करतात आणि जळजळ कमी करतात.
मॉइश्चरायझर – उन्हाळ्यात मॉइश्चरायझर वापरणे खूप महत्वाचे आहे. अनेकांना असे वाटते की उन्हाळ्यात मॉइश्चरायझरची गरज नसते पण तसे नाही. उन्हाळ्यातही तुमच्या त्वचेला ओलावा आवश्यक असतो, विशेषतः जर तुमची त्वचा कोरडी असेल. तुमची त्वचा हायड्रेट राहण्यासाठी आणि तेलकट वाटू नये म्हणून हलके, तेलमुक्त आणि पाणी-आधारित मॉइश्चरायझर्स वापरा.
सनस्क्रीन – उन्हाळ्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सनस्क्रीनचा वापर. सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांमुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे डाग, काळे डाग आणि वृद्धत्वाची चिन्हे दिसतात. चेहरा धुतल्यानंतर, तुम्ही चेहऱ्यावर एसपीएफ सनस्क्रीन योग्यरित्या लावावे जेणेकरून त्वचेचे सूर्यकिरणांपासून संरक्षण होईल.
सीरम – उन्हाळ्यात फेस वॉश केल्यानंतर सीरम देखील वापरता येते. ते त्वचेत खोलवर जाते आणि खोल ओलावा आणि पोषण प्रदान करते. जर तुमच्या त्वचेवर डाग किंवा सन टॅनिंग असेल तर व्हिटॅमिन सी असलेले सीरम वापरा, जे त्वचा चमकदार आणि निरोगी ठेवते. सीरम वापरण्यापूर्वी मॉइश्चरायझर लावा.