Health Care : पायांची सूज असू शकते ‘या’ गंभीर आजारांचे लक्षण, दुर्लक्ष करणे पडेल महागात!

पाय सुजण्याची अनेक कारणे असू शकतात. कधीकधी पायात दुखापत, मुरगळणे इत्यादीमुळे सूज येते. जे लोक दिवसभर खुर्चीवर बसून काम करतात. त्यांचे पाय सतत लटकल्यामुळे सुजण्याची समस्या असते. परंतू ही कारणे नसताना देखील पाय सुजणे गंभीर समस्या आहे.

Health Care : पायांची सूज असू शकते 'या' गंभीर आजारांचे लक्षण, दुर्लक्ष करणे पडेल महागात!
पायांवरील सूज

मुंबई : पाय सुजण्याची अनेक कारणे असू शकतात. कधीकधी पायात दुखापत, मुरगळणे इत्यादीमुळे सूज येते. जे लोक दिवसभर खुर्चीवर बसून काम करतात. त्यांचे पाय सतत लटकल्यामुळे सुजण्याची समस्या असते. परंतू ही कारणे नसताना देखील पाय सुजणे गंभीर समस्या आहे. जर श्वासोच्छवासासह किंवा छातीत दुखत असल्यास पायात सूज येत असेल तर तज्ञांचा त्वरित सल्ला घ्यावा. (Swelling of the feet is a symptom of this serious disease)

मूत्रपिंड समस्या

सहसा तज्ञ पायात सूज पाहूनच मूत्रपिंड चाचणी करण्याची सल्ला देतात. ज्यांची किडनी नीट काम करत नाही, त्यांच्या शरीरातील द्रव गोळा होते. अशा स्थितीत दम लागणे, पायात सूज येणे, लघवी कमी होणे, थकवा येणे इत्यादी समस्या समोर येतात. म्हणूनच, जर पायावर सूज येत असेल तर तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

swelling 2

हृदयरोगाचा धोका

कधीकधी हृदय योग्यरित्या कार्य करत नसल्यास हृदय रक्त व्यवस्थित पंप करू शकत नाही. अशा परिस्थितीत ते पाणी आणि मीठ टिकवून ठेवू लागते. या स्थितीत पायात सूज येऊ शकते. या व्यतिरिक्त, हृदयाचा वेग वाढणे, दम लागणे, अशक्तपणा, थकवा, भूक न लागणे इत्यादी लक्षणे देखील दिसू शकतात.

यकृताची समस्या

अल्ब्युमिन नावाचे प्रथिने तुमच्या रक्तवाहिन्यांमधून रक्त बाहेर पडण्यास प्रतिबंध करते. कधीकधी यकृत अल्ब्युमिन बनवणे थांबवते. अशा स्थितीत शरीरात या प्रथिनाची कमतरता होते. यामुळे रक्तवाहिन्यांमधून रक्त देखील बाहेर पडू शकते. अशा स्थितीत तुमच्या पायामध्ये सूज येते. या स्थितीत, तुम्हाला कावीळ, लघवीचा रंग बदलणे, शारीरिक थकवा इत्यादी लक्षणे देखील येऊ शकतात.

swelling 3

लिम्फॅटिक कारणीभूत

आपल्या शरीराची लिम्फॅटिक प्रणाली शरीरातील विष आणि बॅक्टेरिया काढून टाकते. जेव्हा ही प्रणाली योग्यरित्या आपले काम करत नाही, तेव्हा शरीरात विष जमा होऊ लागते. अशा स्थितीत संसर्ग होतो आणि हात किंवा पायात सूज येऊ लागते. कधीकधी दोन्ही हात किंवा दोन्ही पायांवर सूज येते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Swelling of the feet is a symptom of this serious disease)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI