देशातील सर्वात पहिली काचबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी, 3 रुग्णांना नवी दृष्टी

| Updated on: Oct 21, 2021 | 12:04 AM

सर्व साधारण जगभरात शंभरात 3 जणांना ह्या रोगाला सामोरे जावे लागते. पण ठाण्यातील श्रीरामकृष्ण नेत्रालयानं तीन रुग्णांना नवी दृष्टी प्रदान केलीय. श्रीरामकृष्ण नेत्रालय हे संपूर्ण भारतातील सर्वश्रेष्ठ एनएबीएच मान्यता प्राप्त असलेल्या आणि ठाणे, मुलुंड, सीवूड आणि नवी मुंबईत कार्यरत असलेल्या ग्लूकोमा डिपार्टमेंटमध्ये काचबिंदू रुग्णांचे तपास, निदान आणि शस्त्रक्रिया गेल्या 15 वर्षांपासून होत आहे.

देशातील सर्वात पहिली काचबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी, 3 रुग्णांना नवी दृष्टी
Follow us on

मुंबईः देशातील सर्वात पहिली काचबिंदू शस्त्रक्रिया पार पडली असून, तीन रुग्णांना नवी दृष्टी मिळालीय. काचबिंदू म्हणजे डोळ्यातील दाब वाढल्याने डोळ्याचा नसेला (optic nerve) होणारी इजा असेत. हा आजार अधिकपणे अनुवंशिकतेने होणारा असून, योग्य उपचार वेळीस न झाल्यास अंधत्वाकडे घेऊन जातो. या आजाराची काही लक्षणे सुरुवातीस जाणवत नसल्याने अधिक इजा झाल्यावरच रुग्णाला याचा परिणाम जाणवतो आणि त्या परिस्थितीत याला नियंत्रणात आणणे अवघड होत जाते आणि अनेकांना अंधत्वाला सामोरे जावे लागते.

जगभरात शंभरात 3 जणांना रोगाला सामोरे जावे लागते

सर्व साधारण जगभरात शंभरात 3 जणांना ह्या रोगाला सामोरे जावे लागते. पण ठाण्यातील श्रीरामकृष्ण नेत्रालयानं तीन रुग्णांना नवी दृष्टी प्रदान केलीय. श्रीरामकृष्ण नेत्रालय हे संपूर्ण भारतातील सर्वश्रेष्ठ एनएबीएच मान्यता प्राप्त असलेल्या आणि ठाणे, मुलुंड, सीवूड आणि नवी मुंबईत कार्यरत असलेल्या ग्लूकोमा डिपार्टमेंटमध्ये काचबिंदू रुग्णांचे तपास, निदान आणि शस्त्रक्रिया गेल्या 15 वर्षांपासून होत आहे. हजारो रुग्ण नियमितपणे ह्या सेवेचा लाभ घेत आहेत. काचबिंदू निदान आणि उपचारात अग्रणी असलेल्या ह्या इन्स्टिट्यूटमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गेली अनेक वर्षे होत आहे. ओपन एंगल ग्लूकोमा हा जगात सर्वात अधिक प्रमाणात आढळणारा काचबिंदूचा प्रकार आहे. डोळ्यांचा पुढील भागात ट्रेबेकुलर मेशवर्क ह्या जाळीतून पाण्याचा निचरा डोळ्याबाहेर होत असतो.

डोळ्यातील पाण्याचा दाब वाढून डोळ्याचा नसीला इजा होते

अनुवांशिक कारणामुळे या जाळीचे गुणधर्म बदलतात, ज्यामुळे डोळ्यातील पाण्याचा (aqueous humor ) निचरा व्यवस्थित होत नाही. यामुळे डोळ्यातील पाण्याचा दाब वाढून डोळ्याचा नसीला (optic nerve) इजा होते. श्रीरामकृष्ण नेत्रालय आईस्टेंट (istent) व आईस्टेंट इनजेक्ट (istent inject) हे ग्लूकोज (Glaukos) नावाच्या अमेरिकन कंपनीचे माइक्रो इनसीजन (अतिसूक्ष्म वृदांतून होणारे) ग्लूकोमा सर्जरी डिवाइस (micro incision glaucama surgery device) सर्वप्रथम भारतात आणत आहे. मानवी शरीरात रोपण होणारे हे डिवाइस (device) जगातील सर्वाधिक सूक्ष्म असून, त्याला एफडीए (FDA, USA) ची मान्यता प्राप्त आहे. जगभरात मान्यताप्राप्त असे हे तंत्रज्ञान आहे. आयस्टेंट (istent) हा डोळ्यातून पाण्याचा निचरा करणाऱ्या ट्रॅब्यूलर मेशवर्कमध्ये गुंतविले जाते, त्यामुळे डोळ्यातील पाण्याचा अडकलेला मार्ग खुला होतो व त्यामुळे डोळ्यातील दाब नियंत्रित होतो. हे डिवाइस सूक्ष्म असल्याने ही शस्त्रक्रिया सूक्ष्म छेदातून होते.

डोळ्याला कोणतीही हानी पोहोचत नाही

सर्जिकल ग्रेड टायटानियम या धातूपासून बनलेल्या डिवाईसमुळे डोळ्याला कोणतीही हानी पोहोचत नाही. संपूर्ण एनएबीएच मान्यता प्राप्त झालेले श्रीरामकृष्ण नेत्रालय गेली अनेक वर्ष ठाणे आणि मुंबई येथे अत्याधुनिक तंत्रज्ञान रुग्णांना उपलब्ध करून देत आहे. जागतिक दर्जाच्या सुविधा अगदी परडवणाऱ्या किमतीत सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्याचा वसा नेत्रालयाने घेतलेला आहे.

संबंधित बातम्या

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्पशी वाढ, सक्रिय रुग्णसंख्येत मात्र घट

Home Remedies For Sinus : सायनसचा त्रास दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा!