Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्पशी वाढ, सक्रिय रुग्णसंख्येत मात्र घट

गेल्या 24 तासात भारतात 14 हजार 623 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 197 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 19 हजार 446 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्पशी वाढ, सक्रिय रुग्णसंख्येत मात्र घट
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 9:56 AM

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेले काही दिवस नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट होताना दिसत होती, मात्र आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत अल्पशी वाढ झाली. कालच्या दिवसात देशात 14 हजार 623 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 197 कोरोनाग्रस्तांना एका दिवसात प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे. देशातील सक्रिया कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या आता दोन लाखांच्या आत आहे.

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 14 हजार 623 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 197 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 19 हजार 446 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 41 लाख 8 हजार 996 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 34 लाख 78 हजार 247 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 52 हजार 651 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 1 लाख 78 हजार 98 इतके सध्याच्या घडीला सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 99 कोटी 12 लाख 82 हजार 283 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 14,623

देशात 24 तासात डिस्चार्ज – 19,446

देशात 24 तासात मृत्यू – 197

एकूण रूग्ण – 3,41,08,996

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 1,78,098

एकूण डिस्चार्ज (रिकव्हरी) – 3,34,78,247

एकूण मृत्यू  – 4,52,651

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 99,12,82,283

गेल्या 24 तासातील लसीकरण – 41,36,142 

संबंधित बातम्या :

मुंबईकरांसाठी आजच दसरा दिवाळी, एकाही कोरोना मृत्यूची नोंद नाही, संक्रमणाचा रेटही घटला

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.