Corona Vaccine : कोरोना लस भारतीयांसाठी वरदान, 42 लाख लोकांचे जीव वाचले, ‘द लॅन्सेट’ जर्नलचं सर्वेक्षण

| Updated on: Jun 25, 2022 | 8:05 AM

Corona Vaccine : संभाव्य मनुष्यहानी कोरोना प्रतिबंधक लसींमुळे टाळता आली, असा निष्कर्ष 'द लॅन्सेट' या जर्नलच्या सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे.

Corona Vaccine : कोरोना लस भारतीयांसाठी वरदान, 42 लाख लोकांचे जीव वाचले, द लॅन्सेट जर्नलचं सर्वेक्षण
Follow us on

मुंबई : मागच्या दोन वर्षात कोरोनामुळे आपण सगळेच त्रस्त होतो. याच काळात कोरोना प्रतिबंधक लसीने (Corona Vaccine) महत्वाची भूमिका बजावली. लसीकरण एक मोठं प्रभावी शस्त्र म्हणून समोर आलं. कोरोना संसर्गाने भारतातील आणखी 42 लाखांहून अधिक लोकांचा जीव घेतला असता. ही संभाव्य मनुष्यहानी कोरोना प्रतिबंधक लसींमुळे टाळता आली, असा निष्कर्ष ‘द लॅन्सेट’ (The Lancet Journal) या जर्नलच्या सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे. लसीकरणामुळे देशातील प्रत्येकी 10 हजार लोकांमागे जवळपास 24 जणांचे जीव वाचले, असंही या सर्वेक्षण अहवालात म्हणण्यात आलं आहे. 8 डिसेंबर 2020 ते 8 डिसेंबर 2021 या कालावधीत लसीमुळे ज्या लोकांचे जीव वाचले त्या संख्येच्या आधारे हे सर्वेक्षण करण्यात आलं.

कोरोना लस वरदान

कोरोना संसर्गाने भारतातील आणखी 42 लाखांहून अधिक लोकांचा जीव घेतला असता. ही संभाव्य मनुष्यहानी कोरोना प्रतिबंधक लसींमुळे टाळता आली, असा निष्कर्ष ‘द लॅन्सेट’ या जर्नलच्या सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे.

इतर देशांप्रमाणे हिंदुस्थानातही कोरोना महामारीत मोठी जीवितहानी झाली. कोरोनाच्या सुरुवातीला कुठलंही औषध किंवा लस नसल्यामुळे लोकांच्या जीवावर बेतला. मात्र कोरोना प्रतिबंधक लस आल्यानंतर मृत्यूदर नियंत्रणात आणण्यात यश आलं.कोरोना लसीकरणामुळे जागतिक पातळीवर दोन कोटींहून अधिक लोकांना कोरोनावर मात करता आली आणि त्यांचा जीवही वाचला. कोरोना लस वापरात आल्यानंतर पहिल्या वर्षी लसींमुळे जवळपास 1.98 कोटी लोकांच्या मृत्यूचा धोका टळला. भारतात 42 लाख 10 हजार लोकांसाठी कोरोना प्रतिबंधक लस प्रभावी ठरली. कोरोना काळात झालेल्या मृत्यूच्या आकडेवारीचा अभ्यास करून ‘द लॅन्सेट’ जर्नलने सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला आहे.

हे सुद्धा वाचा

WHO ने 2021 च्या अखेरपर्यंत देशातील जवळपास 40 टक्के लोकसंख्येचं लसीकरण करण्याचं उद्दिष्ट दोळ्या समोर ठेवलं होतं. जर या उद्दिष्टाप्रमाणे लसीकरण झालं असतं तर जागतिक पातळीवर आणखी 5 लाख 99 हजार 300 लोकांचे प्राण वाचले असते. भारतात कोरोना संसर्गामुळे 51 लाख 60 हजार लोकांचा मृत्यू होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. आतापर्यंत झालेल्या मृत्यूंच्या तुलनेत दहापटीने अधिक आहे. देशात कोरोनामुळे 5 लाख 24 हजार 941 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लस ही वरदान ठरली आहे.