AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Depression : 90 टक्के लोकांमध्ये दिसतात डिप्रेशनची ही सर्वात कॉमन लक्षणे, तुम्हाला माहीत आहेत का ?

जगभरासह देशातही डिप्रेशनच्या केसेस वाढताना दिसत आहेत. डिप्रेशनमुळे काही लोक स्वत:चं जीवनही संपवतात. अशा परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीला या समस्येची लक्षणे माहीत असणं गरजेचं आहे.

Depression : 90 टक्के लोकांमध्ये दिसतात डिप्रेशनची ही सर्वात कॉमन लक्षणे, तुम्हाला माहीत आहेत का ?
Image Credit source: freepik
| Updated on: Sep 16, 2023 | 5:42 PM
Share

नवी दिल्ली | 16 सप्टेंबर 2023 : डिप्रेशन (Depression) हा एक असा आजार आहे, ज्याची व्याप्ती हळूहळू वाढत आहे. ही समस्या माणसाला त्याचं जीवन संपवण्यासही भाग पाडू शकते. चिंतेची गोष्ट म्हणजे, आजही अनेक लोकं डिप्रेशनबद्दल बोलणे टाळतात. एखाद्या व्यक्तीचे मानसिक आरोग्य (Mental Health) बिघडत असेल तर त्याची लक्षणेही सहज लक्षात येत नाहीत. चिंता, भीती आणि घाबरल्यामुळे होणारी सुरूवात डिप्रेशनमध्ये बदलते, ज्यामुळे नंतर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. अमेरिकन मानसोपचार संघटनेच्या मते, गेल्या काही वर्षांत जगभरात नैराश्याची प्रकरणे वाढत आहेत. धकाधकीच्या जीवनामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. 14 ते 30 वर्षे वयोगटात या समस्येची अधिक प्रकरणे समोर येत आहेत. बहुतेक प्रकरणांमध्ये, लोकांना हेदेखील माहित नसते की ते नैराश्याने किंवा डिप्रेशनमुळे ग्रस्त आहेत.

आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे, तुम्ही डिप्रेशनमुळे ग्रस्त आहात, हे ओळखायचं तरी कसं ? यासंदर्भात बोलताना डॉक्टर सांगतात की, सुरूवातीच्या टप्प्यामध्ये नैराश्य किंवा डिप्रेशनची लक्षणे ओळखून परिस्थिती बिघडण्या अगोदरच उपचार करणे शक्य असते. पण आजही अनेक लोक मानसिक आरोग्याबद्दल डॉक्टरांशी बोलण्यास कचरतात. आपण हे समजून घेतलं पाहिजे की जसं आपल्याला बरं नसेल, शरीरात काही त्रास होत असेल तर आपण डॉक्टरांकडे जातो ना. तसच जर आपल्या मनाला काही त्रास होत असेल तर मानसिक आरोग्य चांगलं रहाव म्हणूनही आपण त्या विषयातील तज्ज्ञांशी किंवा डॉक्टरांशी बोललं पाहिजे. पण बरेच लोक मानसिक आरोग्याबद्दल, डिप्रेशन बद्दल बोलणं टाळतात.

या कारणामुळेच अनेक लोकं डिप्रेशनला बळी पडतात. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, भारतामध्ये नैराश्याने किंवा डिप्रेशनमुळे ग्रस्त असलेल्या लोकांची संख्या अधिक आहे. त्यामुळेच आजच्या जगात, लहानपणापासूनच मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. यासाठी सर्वप्रथम या आजाराच्या, डिप्रेशनच्या लक्षणांबद्दल जाणून घेणे महत्वाचे ठरते, ही लक्षणे ९० टक्के रुग्णांमध्ये आढळतात.

ही आहेत डिप्रेशनची लक्षणे

– अचानक खूप जास्त भूक लागणे किंवा अजिबातच भूक न लागणे.

– डोक्यात नकारात्मक विचार येणे

– सतत थकवा जाणवणे.

– आपल्याला काहीच येत नाही, बेकार आहोत, अशी भावना जाणवणे

– कोणत्याही कामात बिलकूल लक्ष न लागणे

– झोपेचा पॅटर्न बदलणे

– इच्छा नसताना हसणे, हसण्यामागे भावना लपवण्याचा प्रयत्न करणे

– एकटं रहावसं वाटणं

– कोणतही काम करताना आनंद न मिळणं

– जीवनातील एखादी दु:खद घटना सतत आठवत राहणे

डिप्रेशनबद्दल बोलणे महत्वाचे

डॉक्टर सांगतात की अनेक तरूण व्यक्ती हे मानसिक ताण तणाव किंवा डिप्रेशनबद्दल बोलण्यास बिचकतात. नैराश्याची लक्षणे ओळखून त्यावर वेळीच उपचार केले तर आत्महत्येचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते. त्यामुळेच डिप्रेशनची काही लक्षणे जाणवत असतील तर डॉक्टरांशी बोलले पाहिजे. तुमच्या ओळखीच्या लोकांमध्ये, मित्रांमध्ये किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या वागण्यात हे बदल किंवा लक्षणं जावली तर त्यांना अवश्य मदत करा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.