AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Throat Cancer Symptoms : गळ्यापाशी आलीय सूज, सारखा होतोय कफ ? नका करु दुर्लक्ष, ही असू शकतात गंभीर कॅन्सरची लक्षणे !

कॅन्सरचे नाव ऐकताच लोकांच्या पायाखालची जमीन सरकते. पण सुरुवातीची लक्षणे ओळखून डॉक्टरांकडे गेल्यास कॅन्सरवर सहज उपचार होऊ शकतात. घशाच्या कॅन्सरची लक्षणे ओळखणे देखील खूप सोपे आहे.

Throat Cancer Symptoms : गळ्यापाशी आलीय सूज, सारखा होतोय कफ ? नका करु दुर्लक्ष, ही असू शकतात गंभीर कॅन्सरची लक्षणे !
| Updated on: Feb 23, 2023 | 9:40 AM
Share

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेच्या (world health organization) सांगण्यानुसार 2020 मध्ये एक कोटीहून अधिक लोकांच्या मृत्यूला कॅन्सर (cancer) कारणीभूत होता. आकडेवारीनुसार, दर 6 पैकी एक मृत्यू (death) कॅन्सरमुळे होतो. कॅन्सर हा असा आजार आहे, त्याचे नाव लोकांच्या पायाखालची जमीन सरकते. या आजाराची भीती लोकांच्या हृदयात व मनात घर करून बसते. बैठी जीवनशैली, खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी (bad habits and lifestyle) हे कॅन्सरच्या बहुतांश घटनांमध्ये कारणीभूत असतात.

बदलत्या जीवनशैलीमुळे हा आजार आणखीनच धोकादायक बनला आहे. कॅन्सरची लक्षणे अगोदरच आढळून आल्यास त्यावर सहज उपचार करता येतात. घशाचा कॅन्सर हा असा आजार आहे ज्याची लक्षणे खूप पूर्वीपासून दिसू लागतात. घशाच्या कॅन्सरसाठी सिगारेट, दारू, तंबाखू, गुटखा आदी पदार्थ प्रामुख्याने कारणीभूत आहेत. त्यामुळे घशाच्या कॅन्सरकडे लक्षणांकडे वेळीच लक्ष दिल्यास हा जीवघेणा आजार टाळता येऊ शकतो.

कानात दुखणे, मानेवर सूज येणे, गिळण्यास त्रास होणे, या लक्षणांसह घशाचा कॅन्सर सुरुवातीलाच ओळखता येतो. या लक्षणांकडे वेळीच लक्ष दिल्यास आणि डॉक्टरांकडे गेल्यास घशाच्या कर्करोगावर सहज उपचार होऊ शकतात.

घशाच्या कॅन्सरचे प्रकार

घशाच्या कॅन्सरची लक्षणे जाणून घेण्यापूर्वी, घशाच्या कॅन्सरचे प्रकार जाणून घेणे आवश्यक आहे. त्यानुसार त्याची लक्षणेही दिसून येतात. घशात 6 प्रकारचे कॅन्सर विकसित होऊ शकतात.

1) नेजोफारिंजल कॅन्सर – तो नाकपुड्यांपासून सुरू होतो. म्हणजेच ते नाकाच्या अगदी मागून सुरू होते.

2)ओरोफायरिंजल कॅन्सर – तो तोंडाच्या अगदी मागे सुरू होते. टॉन्सिल्समधील कर्करोग हा त्याचाच एक भाग आहे.

3) हायपोफॅरेंजियल कॅन्सर – हा घशाचा खालचा भाग आहे जो अन्ननलिकेच्या वर असतो, म्हणजे अन्ननलिका.

4) ग्लॉटिक कॅन्सर- त्याची सुरुवात व्होकल कॉर्डपासून होते.

5) सुप्राग्लॉटिक कॅन्सर – हा स्वरयंत्राच्या वरच्या भागापासून सुरू होतो. यामुळे अन्न गिळले जात नाही.

6. सबग्लोटिक कॅन्सर – हे स्वरयंत्राच्या तळापासून सुरू होते.

घशाच्या कॅन्सरची लक्षणे

1) कफ – घशाच्या काही कॅन्सरमध्येत कफ राहतो. जास्त दिवस कफ येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

2) आवाजात बदल – जडपणा किंवा आवाजात बदल हे घशाच्या कॅन्सरचे अगदी सुरुवातीचे लक्षण आहे. आवाजातील हा बदल दोन आठवड्यात बरा झाला नाही, तर लगेच डॉक्टरांकडे जावे.

3) गिळण्यात अडचण येणे – जेव्हा अन्न गिळण्यात अडचण येते, अन्न घशात अडकल्यासारखे वाटते, तेव्हा ताबडतोब डॉक्टरांकडे जावे. हे घशाच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते.

4) वजन कमी होणे – कोणत्याही प्रकारच्या कॅन्सरच्या बाबतीत वजन अचानक कमी होते. त्यामुळे कोणतेही कारण नसताना अचानक वजन कमी होत असल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा.

5) कानात दुखणे – कानाचा भागही मानेमध्ये येतो. त्यामुळे कानात सतत दुखत असेल आणि ही वेदना लवकर दूर होत नसेल, तर ते घशाच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते.

6) घशाच्या खाली सूज येणे – जर घशाच्या खालच्या भागात सूज आली असेल आणि उपचार करूनही ती बरी होत नसेल तर ते कॅन्सरचे कारण असू शकते. या प्रकरणात त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.