AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्या’ 4 दिवसांच्या दुखण्यावर चॉकलेट ठरते गुणकारी !

बहुतांश महिलांना मासिक पाळीदरम्यान भयानक वेदना सहन कराव्या लागतात. मात्र अशा वेळी काही पदार्थांचा आहारामत समावेश केल्यास स्नायू शिथील होतात व पीरियड क्रॅम्प्सपासून मुक्तता होते. चॉकलेटमुळे त्या चार दिवसांच्या वेदनांपासून आराम मिळतो.

'त्या' 4 दिवसांच्या दुखण्यावर चॉकलेट ठरते गुणकारी !
चॉकलेटमुळे वेदनांपासून मिळतो आरामImage Credit source: Freepik
| Updated on: Dec 16, 2022 | 11:40 AM
Share

नवी दिल्ली – चॉकलेट (chocolate),लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मनापासून आवडणारा हा पदार्थ. एखाद्या गोष्टीचा आनंद झाला असो किंवा सेलिब्रेशन करायचे असेल, तोंड गोड करण्यासाठी चॉकलेट हा उत्तम पर्याय ठरतो. मात्र त्याचा आणखी एक महत्वाचा उपयोग आहे. प्रत्येक महिलेला महिन्यातील ‘ते’ चार दिवस बऱ्याच वेदनांचा सामना करावा लागतो. त्यापासून आराम मिळावा म्हणून कोणी शेक घेतं तर कोणी एखादं औषध. मासिक पाळीदरम्यान येणारे क्रॅम्प्स (period cramps) सहन करण्यासाठी अनेक जणी पेन किलर्सही खातात. मात्र अशावेळी चॉकलेटची (benefits of eating chocolate) मदत होऊ शकते. वाचून हैराण झालात ना ?

पण हे खरं आहे. मासिक पाळीच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी चॉकलेट गुणकारी ठरते, अशी माहिती एक अहवालातून समोर आली आहे. पीरियड्सचे दुखणे दूर व्हावे, यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात काही बदल करणं गरजेचं आहे. पीरियड डाएटमध्ये काही पदार्थांचा समावेश केल्यास स्नायू रिलॅक्स होतील व तुमचा क्रॅम्प्सचा त्रास दूर होईल. चॉकलेटसह इतर काही पदार्थ खाल्याने या वेदनांपासून आराम मिळू शकतो. ते पदार्थ कोणते हे जाणून घेऊया.

चॉकलेट

लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच चॉकलेट खायला आवडतं. त्याच्या अवीट अशा गोड चवीव्यतिरिक्त चॉकलेट हे मॅग्नेशिअमचा उत्तम स्त्रोत मानले जाते, ज्यामुळे स्नायूंना आराम मिळतो. चॉकलेट हे आपल्या शरीरातील डोपामाइनची पातळी वाढवण्यास प्रोत्साहन देते, ज्यामुळे तुमचा मूड सुधारतो. त्यामुळे वेदनांपासून आराम मिळतो. 70% कोको पावडर असलेले चॉकलेट हे मासिक पाळीच्या काळातील क्रॅम्प्सवर उत्तम मानले जाते.

आलं

मासिक पाळीच्या काळात वेदना तर होतातच पण इतर अनेक समस्यांचाही सामना करावा लागतो. अशा वेळी आलं हे त्या सर्व लक्षणांसाठी खूप फायदेशीर ठरतं. आल्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी (दाहक-विरोधी) गुणधर्म असतात, ज्यामुळे वेदना कमी होतात, जळजळीपासून आराम मिळतो. तसेच मासिक पळी दरम्यान होणारी ब्लोटिंगची समस्याही दूर होते.

हळद

मासिक पाळीदरम्यान आहारात हळदीचा समावेश केल्याने खूप फायदा होतो. त्यामुळे पीरिएड क्रॅम्प्स आणि जळजळ कमी होते. हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन हे तत्व पाळीच्या काळात होणाऱ्या वेदना तसेच PMSच्या लक्षणांवर फायदेशीर ठरते.

हिरव्या पालेभाज्या

मासिक पाळीच्या काळातील भयानक वेदना दूर करायच्या असतील आहारात हिरव्या पालेभाज्यांच्या अवश्य समावेश करावा. त्यामध्ये लोह आणि फायबर यासह फायटोकेमिकल्स हेही असते. आरोग्य तज्ज्ञही पालेभाज्यांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात.

अक्रोड

मासिक पाळीदरम्यान अक्रोड खाल्याने खूप फायदा होतो. अक्रोडमध्ये माशांप्रमाणे ओमेगा-3 फॅटी ॲसिड असते. तसेच अक्रोड हे फायबरचा उत्तम स्त्रोत आहेत. ज्यांचे सेवन केल्याने पाळीच्या काळात होणाऱ्या वेदनांची समस्या कमी होते व आराम मिळतो. तुम्ही स्नॅक्स म्हणून अक्रोडचा आहारात समावेश करू शकता.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.