AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वच्छ हवा येईल आणि ताण होईल दूर, फक्त घराच्या बाल्कनीत लावा ‘ही’ सुंदर रोपं

घराच्या बाल्कनीत रोपं लावल्याने घराचे सौंदर्य तर वाढतेच पण आपला ताणही कमी होतो. पण प्रश्न असा आहे की बाल्कनित कोणती झाडे लावावीत? येथे आम्ही तुम्हाला अशा काही झाडं व रोपांबद्दल सांगणार आहोत ज्यांच्याने तुम्हाला सकारात्मक वाटतील आणि तुमचा मूड फ्रेश होईल.

स्वच्छ हवा येईल आणि ताण होईल दूर, फक्त घराच्या बाल्कनीत  लावा 'ही' सुंदर रोपं
indoor plants
| Edited By: | Updated on: Jul 21, 2025 | 11:07 AM
Share

आपल्या घराच्या आसपास असलेली झाडं व रोपं ही एक वेगळ्या प्रकारची सकारात्मकता आणतात. आजकाल अशी अनेक झाडे आहेत जी घराच्या बाल्कनित लावण्याची फॅशन झाली आहे. त्याचबरोबर अशी काही रोपं म्हणा किंवा झाडं आपण आपल्या घराच्या आसपास तसेच बाल्कनित लावल्याने ते केवळ हवा स्वच्छ करत नाहीत तर आपला ताणही कमी करतात. अशातच तुम्ही तुमच्या घराच्या डेकोरसाठी या काही रोपांचा वापर केला जाऊ शकतो जी घराच्या हवेत एक वेगळ्या प्रकारची ताजेपणा आणतात.

परंतु प्रश्न असा आहे की ही झाडे आपल्याला आनंदी वातावरणासोबतच आपले लक्ष केंद्रित करण्यास मदत करतात का? इंटरनॅशनल जर्नल ऑफ एन्व्हायर्नमेंटल रिसर्च अँड पब्लिक हेल्थने देखील याची पुष्टी केली आहे. या संस्थेने त्यांच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की घरातील अनेक झाडे आपल्या जीवनातील ताण कमी करतात आणि मानसिक आरोग्य सुधारतात. ही झाडे आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या इतर अनेक प्रकारे फायदे देतात.

यासाठी आपण आपल्या घरात अशी झाडे लावणे महत्वाचे आहे ज्यांचा आपल्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. अनेकदा कोणती झाडे लावणे याबद्दल गोंधळ निर्माण होतो. तर आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला अशा काही झाडं व रोपांबद्दल सांगणार आहोत जे केवळ सुंदरच दिसत नाहीत तर अनेक आरोग्य फायदे देखील देतात. चला तर मग जाणून घेऊयात…

पीस लिली लावा आणि मूड होईल फ्रेश

पीस लिली घरात एक नवीन प्रकारचा ताजेपणा आणते आणि त्यामुळे आपला मूड सुधारतो. या झाडाला कमी प्रकाशाची आवश्यकता असते. त्यामुळे हे पीस लिलीचे झाड घरी लावल्याने घरातील वातावरण आंनदी राहते. अशातच आपल्यातील अस्वस्थतपणा देखील कमी होते. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हे झाड मुलं आणि पाळीव प्राण्यांच्या आवाक्याबाहेर असावी. खरं तर असे मानले जाते की त्याची पाने त्यांना नुकसान पोहोचवू शकतात.

जेड प्लांट ताण कमी करेल

या वनस्पतीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला कमी सुर्यप्रकाश आणि देखभाल पण कमी करावी लागते . जेड प्लांट घराच्या बाल्कनित लावल्याने आपल्याला खूप तणावपूर्ण वातावरणातही लक्ष केंद्रित करण्यास मदत करते. यामुळे आपली काम करण्याची क्षमता वाढते. त्यातच ही वनस्पती अनेक कार्यालयांमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल.

एलिफेंट इअर प्लांट लावा

या वनस्पतीची पाने मोठी आणि हृदयाच्या आकाराची असतात. यामुळे याला ‘हत्तीचे कान’ असेही म्हणतात. वृत्तानुसार, घरी हे रोप लावून आपण उच्च रक्तदाब आणि चिंता यासारख्या समस्यांपासून मुक्त होऊ शकतो. हा दावा अनेक संशोधन अहवालांमध्ये करण्यात आला आहे.

स्पायडर प्लांट हवा शुद्ध करते

स्पायडर प्लांटला कमी पाण्याची आवश्यकता असल्याने आपण हे झाडं आपल्या बाल्कनित सहज लावू शकतो. नासाच्या अहवालात असे आढळून आले आहे की ही वनस्पती हवेतून कार्बन मोनोऑक्साइडसारखे हानिकारक घटक काढून टाकण्यास मदत करते. प्रदूषण कमी करून घरातील वातावरण सुधारते. म्हणूनच या प्लांटला हवा शुद्ध करणारे रोपं म्हटले जाते. तसेच ही वनस्पती घरातील ताणावपूर्व वातावरण कमी करण्यासाठी देखील मदत करते.

स्नेक प्लांट देखील यादीत आहे

या वनस्पतीची पाने लांब असून तलवारीसारखी दिसतात. हे स्नेक प्लांट त्यांच्यामधून ऑक्सिजन बाहेर सोडतात. अशातच विशेष म्हणजे तुम्ही स्नेक प्लांट बेडरूममध्ये देखील लावू शकता. त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहे आणि याचे कारण त्याचे सौंदर्य आहे.

मनी प्लांट अस्वस्थता दूर करेल

मनी प्लांट ही वनस्पती जवळजवळ प्रत्येकाच्या घरात आपल्याला पाहायला मिळते. या प्लांटची पाने हृदयाच्या आकाराची असतात. ही वनस्पती आपल्यातील चिंता आणि अस्वस्थता दूर करते. तसेच लक्ष केंद्रित करण्यास देखील उपयुक्त ठरते. खरं तर हे मनी प्लांट ऑक्सिजन सोडते आणि कार्बन डायऑक्साइड शोषून घेते. असे म्हटले जाते की तणाव कमी करण्यासोबतच डोळ्यांना थंडावा देखील देते.

औषधी वनस्पती सकारात्मक वातावरण निर्माण करतील

घरी तुळस, चमेली किंवा पुदिना यांसारखी झाडे लावल्याने वातावरणात सकारात्मक सुगंध राहतो. तुमच्या जेवणात त्याचा समावेश करण्याचे अनेक फायदे आहेत. चमेलीबद्दल हे सिद्ध झाले आहे की ते रक्तदाब कमी करते आणि हृदय गती देखील स्थिर राखते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.