AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त टॉयलेटमध्ये गेल्यावरच दिसतात ‘या’ आजाराची लक्षणे, हसण्यावारी नेऊ नका; नाही तर महागात पडेल

Colorectal Cancer Symptoms: कोलोरेक्टल कॅन्सरचा ट्यूमर मोठं आतडं ब्लॉक करू शकतं. ज्यामुळे आतड्यांच्या हालचालीत काही बदल होतात. हे बदल त्याची लक्षणे म्हणून ओळखले जातात.

फक्त टॉयलेटमध्ये गेल्यावरच दिसतात 'या' आजाराची लक्षणे, हसण्यावारी नेऊ नका; नाही तर महागात पडेल
Image Credit source: Freepik
| Updated on: Mar 13, 2023 | 9:12 AM
Share

नवी दिल्ली : बहुतेक कर्करोग अथवा कॅन्सर हे सायंलेट आजार असतात, जे आतल्या आत घातक ठरतात. गेल्या काही वर्षांमध्ये कॅन्सरचा विळखा वाढताना दिसून येत आहे. तोंड, पोट, गळा आदी विविध कॅन्सरच्या प्रकारांचे रुग्ण आढळून येत असतात. बदलती जीवनपध्दती, खाण्याच्या चुकीच्या सवयी, फास्टफूडचा (Fast food) अतिवापर अशा विविध कारणांमुळे कॅन्सरच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. कोलोरेक्टल (colorectal cancer) हा देखील असाच एक सायंलेट कॅन्सर आहे, ज्यामध्ये सुरुवातीला लक्षणे (symptoms) दिसण्याची शक्यता फारच कमी असते. पण टॉयलेटला गेल्यावर दिसणारी काही लक्षणे अथवा बदल यांच्याकडे नीट लक्ष देऊनच ते ओळखता येते.

कोलोरेक्टल कॅन्सर कुठे होतो ?

दोन अवयवांवर परिणाम करणाऱ्या कर्करोगाला कोलोरेक्टल कॅन्सर म्हणतात. याचा अर्थ तुम्हाला तुमच्या मोठ्या आतड्यात किंवा गुदाशयात कर्करोग आहे. दरवर्षी मार्च हा कोलोरेक्टल कॅन्सर जागरूकता महिना म्हणून साजरा केला जातो.

काय दिसतात लक्षणे

मलत्याग करताना होतात वेदना

मलत्याग करताना वेदना होणे हे सर्वात सामान्य लक्षण आहे असे डॉक्टर सांगतात. मात्र याकडजे बऱ्याचवेळेस पोटाची एखादी समस्या म्हणून दुर्लक्षित केले जाते. काही रुग्णांना पोटदुखी किंवा पेटके देखील असू शकतात. त्यामागील कारण म्हणजे मोठ्या आतड्यात अडथळा अथवा ब्लॉकेज असणे आणि मल बाहेर येण्यासाठी मार्ग न सापडणे.

मलत्याग करताना रक्त येणे

कोलोरेक्टल कॅन्सरचे हे लक्षण बद्धकोष्ठता किंवा मूळव्याधचे लक्षण देखील समजले जाते. तथापि, कॅन्सर असल्यास रक्तस्त्राव वारंवार होतो आणि कालांतराने तीव्र होऊ शकतो. पण बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर सतत रक्तस्त्राव होत नाही. असा त्रास वारंवार होत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधून तपासणी करून घ्या. तुमचे एक पाऊल तुमचा जीव वाचवू शकतो.

डायरियाचा त्रास

डॉक्टरांच्या मते, कधीकधी या कर्करोगामुळे, मलत्याग करण्याची सवय किंवा स्टूलच्या सुसंगततेमध्ये फरक असतो. कारण, मोठ्या आतड्यात असलेल्या ट्यूमरमधून पूसारखा द्रव बाहेर पडतो, ज्यामुळे अतिसार होऊ शकतो. अनेक प्रकरणांमध्ये, डायरियाची ही समस्या गंभीर असू शकते.

बद्धकोष्ठता आणि सैल मल

कोलोरेक्टल कॅन्सरच्या सुरुवातीला बद्धकोष्ठता ही समस्या असू शकते. कारण, ट्यूमरमुळे आतड्यात अडथळा येतो आणि मल बाहेर येऊ शकत नाही. याशिवाय या अडथळ्यामुळे मल सैल होऊ शकतो. बाऊल मूव्हमेंटमध्ये होणारे हे 2 बदल देखील या प्राणघातक कर्करोगाचे संकेत देऊ शकतात.

पोट साफ झाल्यानंतरही अस्वस्थता जाणवणे

जेव्हा ट्यूमरमुळे आतड्यात अडथळा येतो, तेव्हा आतड्याची हालचाल झाल्यानंतरही असे दिसते की पोट पूर्णपणे साफ झाले नाही. त्यामुळे एक प्रकारची अस्वस्थता आणि बैचेनी जाणवत राहते.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...