AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

No Smoking : धूम्रपानामुळे त्रासला असाल तर या सोप्या टिप्समुळे होईल मदत

धूम्रपान आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. यामुळे तुम्ही फुफ्फुसाचा कॅन्सरग, हृदयविकाराचा झटका यासारख्या घातक आजारांना बळी पडू शकता.

No Smoking : धूम्रपानामुळे त्रासला असाल तर या सोप्या टिप्समुळे होईल मदत
Image Credit source: Freepik
| Updated on: Mar 08, 2023 | 1:19 PM
Share

नवी दिल्ली : दरवर्षी 9 मार्च रोजी देशभरात ‘नो स्मोकिंग डे’ (No smoking day) साजरा केला जातो. धूम्रपानामुळे होणाऱ्या हानीबद्दल लोकांना जागरुक करून या वाईट सवयींपासून मुक्ती मिळवणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. धूम्रपानामुळे लोक घातक आजारांना बळी पडतात. धूम्रपानामुळे तुम्ही कॅन्सरसारख्या (cancer) घातक आजाराला बळी पडू शकता. फुफ्फुसाचे आजार, हृदयाच्या समस्या (heart problems) किंवा इतर अनेक आजार (many diseases)बहुतेक धूम्रपानामुळे होऊ शकतात. जर तुम्हीही धूम्रपानाच्या व्यसनाने त्रस्त असाल तर या सोप्या टिप्सच्या मदतीने तुम्ही या वाईट सवयीपासून मुक्त होऊ शकता.

मध व लिंबाचा रस

धूम्रपानाची सवय सोडण्यासाठी तुम्ही मधाचा वापर करू शकता. खरंतर त्यामध्ये प्रथिने, एन्झाईम्स आणि इतर जीवनसत्त्वे आढळतात. यासाठी तुम्ही रोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि एक चमचा मध मिसळून सेवन करू शकता.

तांब्याच्या भांड्यातील पाणी

तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. हे प्यायल्याने आरोग्यालाही अनेक फायदे होतात. हे पाणी प्यायल्याने तुमचे धूम्रपानाचे व्यसन कमी करण्यासाठी मदत होऊ शकते.

दालचिनी

धूम्रपानापासून दूर राहण्यासाठी तुम्ही दालचिनीची मदत घेऊ शकता. यासाठी तुम्ही नियमितपणे काही काळ दालचिनीचा तुकडा तोंडात ठेवू शकता.

त्रिफळा पावडर

त्रिफळा चूर्ण धूम्रपान सोडण्यासाठी वापरता येते. यासाठी रोज झोपण्यापूर्वी त्रिफळा चूर्ण खावे.

तुळशीची पाने

तुळशीची पाने ही औषधी गुणांनी परिपूर्ण आहेत. त्यांच्या मदतीने तुम्ही धूम्रपानाच्या व्यसनापासून मुक्त होऊ शकता. रोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची पाने चावा. असे केल्याने तुम्ही धूम्रपानाच्या सवयीपासून मुक्त होऊ शकता.

व्यायाम करा

धूम्रपान कमी करण्यासाठी, तुम्ही नियमितपणे व्यायाम सुरू करू शकता. यासोबतच फुफ्फुसात साठलेले निकोटीनही कमी होऊ लागते.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी