तुम्हालाही रात्री शांत झोप लागत नाही? मग आयुर्वेदाच्या या सोप्या टिप्स फाॅलो करा आणि समस्या दूर करा!

| Updated on: May 22, 2022 | 9:42 AM

ज्या लोकांना झोप न लागण्याची समस्या आहे, अशांनी झोपण्यापूर्वी प्राणायाम करणे आवश्यक आहे. झोपण्यापूर्वी प्राणायाम केल्याने मज्जासंस्था सुधारते. हे रक्त परिसंचरण सुधारते आणि शरीराला ऑक्सिजन पुरवठा वाढविण्यास मदत करते. यामुळेच प्राणायम करणे आरोग्यासाठी महत्वाचे आहे. दररोज सकाळी प्राणायाम केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर जाण्यास मदत होते.

तुम्हालाही रात्री शांत झोप लागत नाही? मग आयुर्वेदाच्या या सोप्या टिप्स फाॅलो करा आणि समस्या दूर करा!
Follow us on

मुंबई : जर तुम्हाला निरोगी (Healthy) आणि हेल्दी आयुष्य जगाचे असेल तर आठ तासांची झोप खूप आवश्यक आहे. पण सध्याच्या बदलेल्या जीवनशैलीमध्ये आपण रात्री उशीरापर्यंत जागे राहतो आणि सकाळी फार उशीरा उठते. याचा चुकीचा परिणाम आपल्या जीवनशैलीवर (Lifestyle) होतो. परिणामी आपण सतत आजारी पडतो. मात्र, आपल्यापैकी अनेकांना रात्री झोप लागत नसल्याची समस्या आहे. तसेच जर झोप लागली तरी देखील सतत मध्यरात्री जाग येते. असे बरेच लोक आहेत जे नियमितपणे निद्रानाश ग्रस्त असतात. झोप येत नसेल तर शेवटी अनेकजण झोपेच्या गोळ्यांची मदत घेतात. मात्र, ही सवय आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक (Harmful) आहे. असेच चालू राहिल्यास निद्रानाश सारख्या समस्या उद्भवतील. याशिवाय मानसिक थकवा आणि इतर अनेक प्रकारच्या मानसिक समस्या वाढण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे झोपेची समस्या दूर करण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे.

ध्यान करा

आयुर्वेदानुसार झोपेची समस्या दूर करण्यासाठी प्राणायाम सर्वात प्रभावी आहे. पण जर तुम्ही प्राणायामापेक्षा सोपा मार्ग शोधत असाल तर ओम जपाने दीर्घ श्वास घेण्याचा सराव करा. ओमचा उच्चार करताना प्रथम श्वास घ्या, नंतर नाक आणि तोंडाने श्वास सोडा. त्याचाही मनावर चांगला परिणाम होतो आणि झोप येण्यास मदत होते. तसेच थोडा वेळ ध्यान करा, यामुळे ही झोप लागण्यास मदत होते.

हे सुद्धा वाचा

प्राणायाम करा

ज्या लोकांना झोप न लागण्याची समस्या आहे, अशांनी झोपण्यापूर्वी प्राणायाम करणे आवश्यक आहे. झोपण्यापूर्वी प्राणायाम केल्याने मज्जासंस्था सुधारते. हे रक्त परिसंचरण सुधारते आणि शरीराला ऑक्सिजन पुरवठा वाढविण्यास मदत करते. यामुळेच प्राणायम करणे आरोग्यासाठी महत्वाचे आहे. दररोज सकाळी प्राणायाम केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर जाण्यास मदत होते.

मोबाईलचा वापर नको

झोपण्यापूर्वी फोन आणि लॅपटॉप आपल्यापासून चार हात दूर ठेवा. इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सच्या अतिवापरामुळे झोपेचा त्रास होऊ शकतो. आयुर्वेदानुसार रात्री झोपण्यापूर्वी शांत वातावरण तयार केले पाहिजे. जर आपण बेडवर पडल्यानंतर मोबाईल हातामध्येच ठेवला तर झोप लागत नाही. यामुळेच कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स झोपेच्या वेळी वापरू नका.