अधिक व्हिटॅमिन डी शरीराला असते धोकादायक; तर होऊ शकतात ‘हे’ आजार

| Updated on: Jan 25, 2022 | 3:59 PM

व्हिटॅमिन डी जसे शरीराला आवश्यक असते. तसेच त्याचा अतिरेक झाल्यानंतर त्याच्यापासून शरीराला नुकसान देखील होऊ शकते.

अधिक व्हिटॅमिन डी शरीराला असते धोकादायक; तर होऊ शकतात हे आजार
Follow us on

Vitamin D Tips : शरीराला वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिटॅमिनची (Vitamins) मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. जर तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन कमी झाले तर तुम्हाला वेगवेगळ्या समस्या जाणून शकता. व्हिटॅमिन डी (Vitamin D) बद्दल बोलायचे झाल्यास व्हिटॅमिन डी हे तुमच्या शरीराला सर्वात जास्त आवश्यक असते. व्हिटॅमिन डीला सनशाईन व्हिटॅमिन देखील म्हटले जाते. कोवळे ऊन (sun)हा व्हिटॅमिन डीचा मुख्य स्त्रोत आहे. व्हिटॅमिन डी हे तुम्हाला अॅक्टिव्ह ठेवण्यासोबतच तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवते. व्हिटॅमिन डीमुळे तुमच्या मांसपेशी मजबूत होतात. तसेच व्हिटॅमिन डीचे अन्य देखील अनेक फायदे आहेत. व्हिटॅमिन डी जसे शरीराला आवश्यक असते. तसेच त्याचा अतिरेक झाल्यानंतर त्याच्यापासून शरीराला नुकसान देखील होऊ शकते. आजपर्यंत आपन नेहमी व्हिटॅमिन डीचे फायदेच ऐकत आलो आहोत. मात्र आज आपन व्हिटॅमिन डी जर शरीरामध्ये अधिक झाले तर त्यापासून काय नुकसान होऊ शकते हे जाणून घेणार आहोत.

व्हिटॅमिन डी कमी झाल्याचे संकेत

जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डी कमी झाले असेल तर तुम्हाला प्रचंड थकवा जाणवतो. हाडे दुखतात. मांसपेशी दुखणे या सारखे सामान्य लक्षणे दिसून येतात. अशा वेळेस डॉक्टरांकडून ज्यापासून व्हिटॅमिन डी मिळते असे पदार्थ आहरात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.

हाडे फॅक्चर होण्याचा धोका

मात्र जेव्हा तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डीची मात्रा अधिक होते. तेव्हा तुमच्या शरीरातील कॅल्शिअमचा स्थर अधिक वाढतो. ज्यामुळे तुमची हाडे ठणकण्यास सुरुवात होते. तसेच तुमच्या शरीरात जर व्हिटॅमिन डी अधिक असेल तर संबंधित व्यक्तीला फॅक्चरचा धोका हा अधिक असतो.

किडनीशी संबंधित समस्या

तुमच्या शरीरामध्ये जर आवश्यकतेपेक्षा अधिक व्हिटॅमिन डी निर्माण झाल्यास ते तुमच्या किडनीसाठी देखील धोकादायक आहे. व्हिटॅमिन डीमुळे तुमच्या शरीरात कॅल्शिअमचे प्रमाण वाढते. हे वाढलेले कॅल्शिअम युरिनचे प्रमाण वाढवते. ज्यामुळे तुम्हाला सतत टॉयलेटला जाण्याचा त्रास होऊ शकतो. व्हिटॅमिन डीचे प्रमाण वाढल्यास त्याचा तुमच्या किडनीवर देखील मोठा परिणाम होऊ शकते.

टीप : वरील सर्व माहिती ही सामान्यज्ञानाच्या हेतूने देण्यात आली आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचे उपचार करणार असाल तर त्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.

संबंधित बातम्या

खरंच कोणी आठवण काढली तर उचकी लागते का? उचकी लागण्याची कारणं आणि त्यावरील उपाय..

Health care in Winter: हे खास घरगुती उपाय करा आणि दम्याच्या त्रास दूर करा!

थंडीच्या दिवसात कमी पाणी प्यायलाने होऊ शकतो लकवा आणि ब्रेन स्ट्रोक, मेंदूची घ्या अशी काळजी !!