खरंच कोणी आठवण काढली तर उचकी लागते का? उचकी लागण्याची कारणं आणि त्यावरील उपाय..

खरंच कोणी आठवण काढली तर उचकी लागते का? उचकी लागण्याची कारणं आणि त्यावरील उपाय..
उचक्या लागण्याची कारणं आणि उपाय

Health Tips उचकी लागणे यामागे अनेक कारणं असतात. उचकी लागणे ही नैसर्गिक गोष्ट आहे. त्यामुळे यावर उपायही आहेत. मात्र कोणा कोणाला उचकी खूप वेळ असेल तर डॉक्टरांकडे जाणे गरजेचं आहे. उचकी कशामुळे येते आणि ती कशी थांबता येईल ते बघणार आहोत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Jan 25, 2022 | 11:49 AM

अगं किती ती उचकी येतेय तुला, नक्की कोणतरी आठवण काढतेय तुझी…उचली लागली तर पहिले हे वाक्य ऐकायला येतं. पण खरंच कोणी आठवण काढली की उचकी लागते का?, तरी नाही. यामागे वैज्ञानिक कारणं आहेत. उचकी लागण्याचे अनेक कारणं आहेत. उचकी ही एक नैसर्गिक गोष्ट आहे.

का लागते उचकी?

उचकी ही स्नायूंची अनैच्छिक क्रिया आहे जी आपल्या घशाच्या केनलमध्ये असते. जेव्हा डायाफ्रामचे स्नायू अचानक आकुंचन वावतात तेव्हा आपल्याला उचकी यायला लागते. यावेळी फुप्फुसातील हवा बाहेर येते आणि अशावेळी होणारा आवाज म्हणजे उचकी. ही क्रिया घडत असताना आपण श्वास आत घेऊ शकत नाही म्हणून उचकी लागली की आपल्याला अस्वस्थत वाटतं. उचकी ही काही वेळेसाठी येते मात्र ही थांबत नसेल आणि खूप वेळ येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

उचकी येण्यामागे काय आहेत कारणं?

1. लवकर लवकर जेवणे
2. जास्त मसाले असलेलं जेवण
3. काही लोकं एक्साइडिट झाल्यावर येते उचकी
4. तनाव असेल तरी येते उचकी

उचकी घालवण्याचे खास ट्रिक्स

1. श्वास काही वेळासाठी रोखून धरा
2. थंड पाणी प्या
3. जीभ बाहेर काढा आणि थोडा वेळ तसेच राहा. यामुळे घशामधील मांसेपेशी ओढल्या जाईल आणि तुम्हाला बरं वाटेल.
4. तुम्ही खाली बसा आणि गुडघ्याला छातीजवळ आणा आणि दोन मिनिटं या स्थित बसा.
5. उचकी लागली तर साखर खा
6. लिंबू आणि मधाचं चाटण खा
7. चॉकलेट पावडरचं सेवन करा
8. मीठाचं पाणी प्या
9. तीन काळेमीरे आणि खडी साखर चावून खा आणि त्यावर पाणी प्या
10. टमाटर चावून चावून खा
11. पीनट बटर खा
12. उलटे आकडे मोजा
13. असं म्हणतात उचकी लागलेल्या माणसाला घाबरविल्यास उचकी लगेचच थांबते.

टीप : या बातमीतील आरोग्यविषयक सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा

इतर बातम्या-

विराटने अनुष्काशी लग्न करायला नको होतं म्हणताच चाहत्यांनी शोएबला घेरले; म्हणाले…

महाराष्ट्रातील घाटात पंजाबमधील ट्रकचालकाचा कुणी केला खून? 24 तासांच्या आत पोलिसांनी लावला शोध!


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें