महिलांच्या आरोग्याला घातक टॉक्सिक शॉक सिंड्रोम; आजाराचे वेळीच निदान करा

टॉक्सिक शॉक सिंड्रोम सर्वसाधारणपणे पीरियड्सच्या वेळेस अर्थात मासिक पाळीच्या वेळेस महिलांना अधिक त्रास देतो. ज्या महिला टॅम्पोन वापरतात, त्यांना या रोगाचा अधिक त्रास होत असल्याचे आतापर्यंतच्या पाहणीत आढळले आहे. (Toxic shock syndrome, harmful to women's health; Diagnose the disease early)

महिलांच्या आरोग्याला घातक टॉक्सिक शॉक सिंड्रोम; आजाराचे वेळीच निदान करा
महिलांच्या आरोग्याला घातक टॉक्सिक शॉक सिंड्रोम
Follow us
| Updated on: Jul 10, 2021 | 10:18 PM

मुंबई : टॉक्सिक शॉक सिंड्रोम हा मानवी शरीरासाठी विशेषतः महिलांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण करणारा रोग आहे. हा रोग स्टायफिलोकोकस ऑरियस किंवा स्टाफ नावाच्या सूक्ष्मजंतूचे प्रमाण खूप वाढल्यानंतर होतो. हे सूक्ष्मजंतू महिलांच्याच शरीरामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. टॉक्सिक शॉक सिंड्रोम सर्वसाधारणपणे पीरियड्सच्या वेळेस अर्थात मासिक पाळीच्या वेळेस महिलांना अधिक त्रास देतो. ज्या महिला टॅम्पोन वापरतात, त्यांना या रोगाचा अधिक त्रास होत असल्याचे आतापर्यंतच्या पाहणीत आढळले आहे. (Toxic shock syndrome, harmful to women’s health; Diagnose the disease early)

रक्तदाब वेगाने कमी होतो

टॉक्सिक शॉक सिंड्रोममध्ये रक्तदाब वेगाने कमी होताना दिसतो. त्यामुळे शरारीत ऑक्सिजन योग्यरिता पोहोचत नाही. परिणामी मृत्यूचा धोका ओढवू शकतो. अमेरिकेतील 24 वर्षांची मॉडेल लॉरेन वासेर हिला 2012 मध्ये हा गंभीर स्वरूपाचा आजार झाला होता. लॉरेनच्या शरीरात विषारी पदार्थ इतके जास्त झाले होते की त्यामुळे ती तिचे पायसुद्धा उचलू शकत नव्हती. शेवटी डॉक्टरांना तिचा पाय कापावा लागला होता.

टॉक्सिक शॉक सिंड्रोमला मेन्स्ट्रुअल स्पॉन्ज, डायाफ्राम आणि सर्व्हायकल कॅपलादेखील जोडले गेले आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर महिलांना टॉक्सिक शॉक होण्याची जास्त शक्यता असते. हा आजार त्या पुरुष आणि महिलांना होण्याचा धोका असतो, ज्या व्यक्ती सर्जरी किंवा नकली उपकरणांच्या वापरादरम्यान स्टेफ बॅक्टीरियाशी संपर्कात येतात.

19 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुणींना अधिक धोका

टॉक्सिक शॉक हा गंभीर आजार होण्याचे एका तृतीयांशपेक्षा अधिक प्रमाण हे 19 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुणींमध्ये आहे. हा आजार 30 टक्के महिलांना दोनदा होण्याचा धोका असतो. या आजारामुळे हृदय बंद पडू शकते, फुफुससुद्धा निकामी पडू शकते. म्हणजेच काय तर हा आजार थेट हृदयावर आघात करून आपला जीव घेऊ शकतो. त्यामुळे महिलांनी टॉक्सिक शॉकचा त्रास होत असेल तर अजिबात हयगय करता कामा नये. अशा महिलांनी तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा.

टॉक्सिक शॉकची लक्षणे

मानवी शरीरासाठी अधिक घातक असलेल्या टॉक्सिक शॉकची लक्षणे जाणून घेणे गरजेचे आहे. अचानक ताप येणे, ब्लड प्रेशर अर्थात रक्तदाब कमी होणे, डायरिया, हात आणि पायाच्या तळव्यावर ओरखडे पडणे, भ्रम स्थिती होणे, अंगदुखी, तोंड आणि डोळे लाल होणे अशी काही लक्षण आहेत. जेव्हा महिला मासिक पाळीच्या वेळी टॅम्पोनचा वापर करतात. त्यावेळी जर अधिक प्रमाणात ताप आला, तर महिलांनी तातडीने डॉक्टरांकडे जायला हवे. अशा महिलांना टॉक्सिक शॉकचा त्रास सुरु झालेला असू शकतो. सर्वसाधारणपणे या आजारावर अँटिबायोटिक्स औषधे दिली जातात. (Toxic shock syndrome, harmful to women’s health; Diagnose the disease early)

इतर बातम्या

Video | उंची 20 इंच, वजन 26 किलो, ‘राणी’ला पाहण्यासाठी लोकांची गर्दी, जगातील सर्वांत लहान गाय असल्याचा दावा

दिवसभरात किमान एक केळे खा, त्वचेचे सौन्दर्य वाढावा; जाणून घ्या विविध फायदे

Non Stop LIVE Update
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.