AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hair Fall: केसगळती थांबत नसेल तर ‘ या ‘ 3 नैसर्गिक गोष्टींचा करा वापर

केसगळतीची समस्या जाणवू लागल्यास लोकांना त्यांचा आहारावर लक्ष देण्यास तसेच केसांची काळजी घेण्यास सांगितले जाते. पोषक तत्वांच्या अभावामुळे केस गळू शकतात.

Hair Fall: केसगळती थांबत नसेल तर ' या ' 3 नैसर्गिक गोष्टींचा करा वापर
| Edited By: | Updated on: Sep 09, 2022 | 8:24 PM
Share

साधारणत: केसगळतीची समस्या जाणवू लागल्यास लोकांना त्यांचा आहारावर (Diet and hair care) लक्ष देण्यास तसेच केसांची काळजी घेण्यास सांगितले जाते. कारण बऱ्याच वेळेस पोषक तत्वांच्या अभावामुळे केसांची मुळं कमकुवत होतात व ते तुटतात, गळू (Hair fall problem) लागतात. अशावेळी पौष्टिक आहार घेणे तर गरजेचे आहेच. पण त्यासह नैसर्गिक पदार्थांपासून तयार करण्यात आलेल्या प्रॉडक्ट्सचा (Natural ingredients) केसांसाठी वापर करणे महत्वाचे असते. त्यामुळे केसांच्या समस्या दूर होण्यास मदत होते. त्यामुळे कोणत्या पदार्थांचे सेवन केल्याने किंवा कोणत्या पदार्थांचा वापर केल्याने तुमची समस्या दूर होऊ शकते, हे वेळीच समजले तर तुमच्या (केसगळण्याच्या) समस्येवर उपाय शोधण्यास बरीच मदत होऊ शकते. कोणते नैसर्गिक पदार्थ वापरून केस गळतीची समस्या दूर होऊ शकते, हे जाणून घेऊया.

मेथीच्या बिया

केसांच्या समस्येसाठी मेथीच्या बिया वापरल्यास खूप फायदा होऊ शकतो. केसांची निगा राखताना, मेथीच्या बिया या एक आयुर्वेदिक औषध म्हणून वापरल्या जातात. आपल्या घरात आजी- आईसुद्धा मेथीच्या बियांचा वापर करायच्या. केसांसाठी असा करावा मेथीच्या बियांचा वापर –

– 2-3 चमचे मेथीच्या बिया किंवा मेथीचे दाणे घेऊन ते रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे. – दुसऱ्या दिवशी या बिया गाळून बाजूला ठेवाव्यात. – नंतर या बिया (मिक्समधून) नीट वाटून घ्याव्यात व त्यांची पेस्ट करून घ्यावी. – ही पेस्ट केसांना लावावी व तासभर ठेवावी. त्यानंतर केस साध्या पाण्याने स्वच्छ धुवावेत.

आवळा

आवळ्याचे तेल केसांसाठी अतिशय उत्तम असते. त्यामुळे केस काळे तर होतातच पण ते घनदाट आणि चमकदारही बनतात. मात्र आवळ्याचा वापर केल्याने केस तुटणे व गळणे कमी होते, हे तुम्हाला माहीत आहे का ? केसांसाठी असा करावा आवळ्याचा वापर –

– यासाठी आवळ्याचे वाळलेले तुकडे मिक्सवर वाटून त्याची पावडर तयार करावी. अन्यथा बाजारातील रेडीमेड आवळा पावडर वापरावी. – नंतर आवळा पावडरीमध्ये लिंबाचा थोडा रस आणि गरजेनुसार पाणी घालून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. – हे मिश्रण केसांना नट लावून साधारण 45 मिनिटे केसांवर राहू द्यावे. नंतर केस पाण्याने स्वच्छ धुवावेत. – नियमित वापराने अपेक्षित परिणाम दिसून येईल.

कोरफड

कोरफडीचा रस हा केसांसाठी अतिशय उपयोगी मानला जातो. त्यामधील पोषक गुणधर्मांमुळे हा रस केसांसाठी एखाद्या औषधाप्रमाणे ठरतो. कोरफडीच्या वापरामुळे स्काल्पचीही स्वच्छता होते आणि स्काल्प व केस दोघांनाही पोषण मिळते. ज्यामुळे केस मऊ व मुलायम होतात आणि इन्फेक्शन कमी होते. तसेच केस गळणे व तुटणे ही समस्याही दूर होते.

कोरफडीचा असा करावा वापर –

– कोरफडीच्या पानांमधून ताजा रस काढून एका बाऊलमध्ये ठेवावा. – नंतर तो रस हातांवर घेऊन केसांना चोळून लावावा. – केसांना नीट मसाज करून हे रस केसांवर 20-30 मिनिटे तसाच राहू द्यावा. – नंतर केस सौम्य शांपूने व पाण्याने स्वच्छ धुवावेत. – नियमित वापराने अपेक्षित परिणाम दिसून येईल व केस गळती कमी होईल.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.