AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काळ्या, घनदाट आयब्रो हव्या असतील तर हा उपाय नक्की करून पहा…

घनदाट आयब्रोमुळे डोळ्यांचे सौंदर्य आणखी वाढते. तुम्हालाही काळ्या, आणि घनदाट आयब्रो किंवा भुवया हव्या असतील तर त्यासाठी काही घरगुती उपाय करू शकता.

काळ्या, घनदाट आयब्रो हव्या असतील तर हा उपाय नक्की करून पहा...
| Updated on: Jul 03, 2023 | 6:14 PM
Share

Thick Eyebrows :  सध्या घनदाट आयब्रोची फॅशन सुरू आहे. त्यामुळे डोळ्यांचे सौंदर्य तर वाढतेच पण आपल्या चेहऱ्यातही बराच फरक दिसतो. लांबसडक आणि घनदाट आयब्रो मिळाव्यात यासाठी महिला बरेच उपाय करतात. काही तर महागड्या ट्रीटमेंटही करून घेतात. मात्र त्या दरवेळेस फायदेशीर ठरतातच असे नाही. अशा वेळी काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही घनदाट आयब्रो मिळवू शकता.

घनदाट भुवयांसाठी करा हे उपाय

– जर तुम्हाला नैसर्गिकरित्या घनदाट भुवया हव्या असतील तर त्यावर एरंडेल तेल लावावे. या तेलाने केसांची वाढ जलद होते. एरंडेल तेलामध्ये प्रथिने, फॅटी ॲसिडस्, अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्व ही मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे केसांचे पोषण होण्यास मदत मिळते. व भुवया घनदाट दिसू लागतात.

– लांबसडक व घनदाट भुवया हव्या असतील तर तुम्ही भुवयांना बदामाचे तेलही लावू शकता. त्यामुळे केस खूप वेगाने वाढू लागतात. रात्री झोपण्यापूर्वी कापसाच्या बोळ्याने हे तेल भुवयांना लावा. याच्या नियमित वापराने तुमच्या भुवया जाड होऊ शकतात.

– नारळाच्या तेलात व्हिटॅमिन ई हे मुबलक प्रमाणात असते. भुवयांना हे तेल नियमितपणे लावले तर भुवया घनदाट होण्यास मदत होते. यासाठी रोज कापसाच्या साहाय्याने भुवयांवर खोबरेल तेल लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा. काही दिवसात तुम्हाला फरक दिसून येईल.

– यासाठी ऑलिव्ह ऑईलही अतिशय उपयुक्त ठरेल. त्याच्या नियमित वापराने भुवया घनदाट होऊ शकतील. ऑलिव्ह ऑइलमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. ज्यामुळे भुवयांच्या केसांची वाढ होण्यास मदत होते. रात्री झोपण्यापूर्वी हे तेल दररोज वापरल्यास फरक दिसून येतो.

– वाचून आश्चर्य वाटेल पण दुधाच्या मदतीनेही भुवयांची वाढ चांगली होऊ शकते. यासाठी एक चमचा कच्चे दूध घेऊन, त्यात कापूस भिजवून तो भुवयांवर लावा आणि ५ ते १० मिनिटे मसाज करा. नियमित वापरामुळे तुम्हाला अपेक्षित परिणाम दिसून येईल.

– कांद्याचा रस लावल्यानेही भुवयाही जाड आणि घनदाट होऊ शकतात. दिवसातून दोनदा कांद्याचा रस भुवयांवर लावल्याने फायदा होऊ शकतो.

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती