Insomnia : तुम्हीही झोपेसाठी रात्रभर तळमळता ? या 5 उपायांनी मिळवा शांत व गाढ झोप

रात्री उशीरापर्यंत झोप न येण्याची समस्या सतावत असेल तर काही पदार्थांचे सेवन केल्याने शांत झोप लागण्यास मदत होऊ शकते.

Insomnia : तुम्हीही झोपेसाठी रात्रभर तळमळता ? या 5 उपायांनी मिळवा शांत व गाढ झोप
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Feb 07, 2023 | 10:29 AM

नवी दिल्ली – निरोगी राहण्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे. यामुळे मन आणि मेंदू दोन्ही तणावमुक्त (stress free) राहतात. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ञ दररोज 6 ते 8 तास झोपण्याची ( 6 to 8 hours sleep) शिफारस करतात. मात्र, व्यस्त जीवनशैली, जास्त काम, तणाव, खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी तसेच चिंता यासह इतर कारणांमुळे काही लोक रात्री उशिरापर्यंत झोपत नाहीत. याशिवाय रात्री उशिरापर्यंत मोबाईल (mobile) बघत राहिल्यानेही लवकर झोप येत नाही.

दीर्घकाळापासून निद्रानाशाची समस्या असेल तर त्याचा त्या व्यक्तीचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य (physical and mental health) या दोहोंवर वाईट परिणाम होतो. सोप्या भाषेत सांगायचे निद्रानाशाची समस्या असलेली व्यक्ती ही मानसिकरित्या अस्वस्थ राहते. त्या व्यक्तीला बेचैन वाटत राहतं. या स्थितीमुळे इतर अनेक आजारांचा धोकाही वाढतो. जर तुम्हीही निद्रानाशाच्या समस्येने त्रस्त असाल आणि यापासून सुटका मिळवू इच्छित असाल तर या हे उपाय करून पहा. सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर या पदार्थांचे सेवन केल्याने तुमची झोपेची समस्या दूर होऊ शकते. ते पदार्थ कोणते , हे जाणून घेऊया.

तुळस

हे सुद्धा वाचा

तुळशीचा शतकानुशतके औषध म्हणून उपयोग केला जात आहे. तुळशीच्या सेवनाने सर्दी, खोकला, कफ आणि इतर अनेक आजारांमध्ये आराम मिळतो. तसेच तुळशीच्या सेवनाने निद्रानाशाच्या समस्येवर मात करता येते. यासाठी झोपण्यापूर्वी तुळशीच्या पानांचा चहा प्यावा. यामुळे निद्रानाशाची समस्या दूर होण्यास मदत मिळते.

अश्वगंधा

निद्रानाशासाठी अश्वगंधा ही उत्तम औषध ठरू शकते. तिच्या पानांमध्ये फायदेशीर घटक आढळतात, जे निद्रानाश दूर करण्यात मदत करतात. अश्वगंधाचा वापर केल्याने तणावापासून लवकर आराम मिळतो. यासाठी एका ग्लास दुधात एक चमचा अश्वगंधा पावडर मिसळून रोज रात्री झोपण्यापूर्वी सेवन करा.

कृष्णकमळाचा चहा

कृष्णकमळामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी, हायपोग्लायसेमिक, हायपोलिपिडेमिक, वेदनाशामक गुणधर्म आहेत, जे अनेक रोगांवर औषधाप्रमाणे काम करतात. विशेषत: निद्रानाश झालेल्यांसाठी हे वरदानापेक्षा कमी नाही. कृष्ण कमळाचा चहा प्यायल्याने निद्रानाशात आराम मिळतो.

व्हॅलेरियन

18 व्या शतकापासून निद्रानाश दूर करण्यासाठी व्हॅलेरियनचा वापर केला जात आहे. याच्या सेवनाने निद्रानाशाच्या समस्येत लवकर आराम मिळतो. अनेक संशोधनांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की व्हॅलेरियनच्या सेवनाने निद्रानाशाची समस्या त्वरित दूर होते.

कॅमोमाइल चहा

जर तुम्ही निद्रानाशाच्या समस्येने त्रस्त असाल आणि त्यापासून सुटका मिळवू इच्छित असाल तर रात्री झोपण्यापूर्वी कॅमोमाइल चहा घ्या. यामध्ये अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात, जे झोपेची समस्या दूर करण्यात मदत करतात. त्यामुळे शांत व गाढ झोप लागते.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.