स्वस्थ हृदय हवं असेल तर आधी मानसिक आरोग्य सांभाळा, संशोधन काय सांगतं ?

जर आपले मानसिक आरोग्य चांगले नसेल तर त्याचा आपल्या संपूर्ण शरीरावर प्रभाव पडतो, तसेच हृदयावरही परिणाम होऊ शकतो. मानसिक आरोग्य आणि हृदयरोग यांचा एकमेकांशी काय संबंध आहे, हे जाणून घेऊया.

स्वस्थ हृदय हवं असेल तर आधी मानसिक आरोग्य सांभाळा, संशोधन काय सांगतं ?
Follow us
| Updated on: Dec 02, 2022 | 12:36 PM

नवी दिल्ली – हार्ट ॲटॅक (heart attack) आल्यास किंवा कार्डिॲक सर्जरी झाल्यास अथवा हृदयरोगाचे निदान झाल्यास (संबंधित) रुग्णाला वाईट वाटणे स्वाभाविक आहे. भविष्याचा विचार करून कोणालाही वाईट वाटू शकते किंवा त्याची काही अन्य कारणेही असू शकतात. त्याचप्रमाणे, मानसिक आरोग्य (unhealthy mental health) चांगले नसेल तर त्यामुळे हृदयरोगही होऊ शकतो. मानसिक आरोग्य खराब असेल तर त्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम (bad effect on health) होतो, हे तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे. मात्र त्यामध्ये हृदयरोगाचाही समावेश आहे.

खराब जीवनशैली, अयोग्य आहार, धूम्रपान करणे, व्यायाम न करणे असे काही कॉमन घटक आहेत, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढू शकतो. ज्यांचे मानसिक आरोग्य बिघडले आहे अशा लोकांमध्येही ही लक्षणे अथवा सवयी दिसू शकतात. मानसिक आरोग्य आणि हृदयरोग यांचा एकमेकांशी काय संबंध आहे, याबद्दल एक संशोधन करण्यात आले असून, त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

हे सुद्धा वाचा

खराब मानसिक आरोग्यामुळे होऊ शकतो हृदयरोग

एका अभ्यासानुसार, डिप्रेशन (नैराश्य) आणि चिंता यासारख्या मानसिक आरोग्याच्या विकारांवी ग्रासलेल्या लोकांमध्ये हृदय व रक्तवाहिन्या संदर्भातील समस्या उद्भवण्याची शक्यता जास्त असते. मेडिकल न्यूज टुडेमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात असे आढळले आहे की आपले मानसिक आरोग्य कसे आहे, त्याच्या च्या स्थितीचा ऑटोनॉमिक कार्यांवर प्रभाव पडतो, ज्याचा रक्तदाबावर मोठा परिणाम होऊ शकतो. म्हणजेच मानसिक आरोग्याची समस्या असेल तर कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज म्हणजे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि ऑर्गन डॅमेज (अवयवांचे नुकसान) होण्याचा धोका वाढतो. मात्र, याबद्दल करण्यात आलेले संशोधन हे मर्यादित आहे. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टिम सेल्सचे एक गुंतागुंतीचे नेटवर्क असते, जे आपल्या शरीरातील अनेक प्रक्रिया रेग्युलेट अथवा त्यांचे नियमन करते. श्वासोच्छवासाचा पॅटर्न योग्य ठेवणे, ब्लड प्रेशर योग्ये ठेवणे आणि आपल्या हृदयाचे ठोके नियंत्रित करणे, अशा अनेक क्रियांचा त्यामध्ये समावेश असतो.

एखाद्या व्यक्तीला मानसिक आरोग्याची समस्या असल्यास त्याचा व ब्लड प्रेशर आणि हृदयाची गती यांच्याशी संबध असतो, असे आढळून आले आहे. म्हणजेच मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे ब्लड प्रेशर व हृदयाची गती याच्याशी संबंधित समस्या वाढू शकतात.

अशा परिस्थितीत काय करावे ?

जे लोक मानसिक आरोग्याच्या विकारांनी ग्रस्त आहेत, त्यांनी डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यांचे पालन केले पाहिजे. तज्ञांच्या मते, अशा रुग्णांनी सायकिॲट्रिक औषधे घेण्यापूर्वी आणि त्यानंतरही नियमितपणे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य तपासणी केली पाहिजे. तसेच हृदयाशी संबंधित आरोग्याच्या समस्यांचा धोका कमी होण्यास मदत करतील असे उपचार घेतले पाहिजेत.

(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Non Stop LIVE Update
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.