Hair care: केसांची उत्तम निगा राखण्यासाठी तुरटीसह करा ‘ या ‘ तेलाचा वापर, मिळतील अनेक फायदे !

| Updated on: Sep 27, 2022 | 3:02 PM

पावसाळ्याच्या काळात वातावरणातील ओलाव्यामुळे केवळ त्वचेचं नाही तर केसांचेही नुकसान होते. केसांतील मळ आणि ओलावा यामुळे कोंड्याचा त्रास होतो आणि केसगळती सुरू होते.

Hair care: केसांची उत्तम निगा राखण्यासाठी तुरटीसह करा   या  तेलाचा वापर, मिळतील अनेक फायदे  !
Hair care: केसांची उत्तम निगा राखण्यासाठी तुरटीसह करा ' या ' तेलाचा वापर, मिळतील अनेक फायदे !
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पावसाळ्याच्या काळात वातावरणातील ओलाव्यामुळे केवळ त्वचेचं नाही तर केसांचेही (hair problem) नुकसान होते. केसांतील मळ आणि ओलावा यामुळे कोंड्याचा त्रास होतो आणि केसगळती (hair loss) सुरू होते. वातावरणातील बदलाव्यतिरिक्त खाण्यापिण्याच्या सवयी आणि अनियमित जीवनशैली हेही केसगळतीचे एक प्रमुख कारण ठरू शकते. केसांची निगा राखण्यासाठी बाजारात अनेक उत्पादने उपलब्ध आहेत , मात्र काही घरगुती उपायांच्या (homemade remedies) मदतीने तुम्ही केसांची उत्तम निगा राखू शकता. घरगुती उपायांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे काही दुष्परिणाम होत नाहीत आणि ते वापरल्याने फरकही लवकर दिसून येतो. या लेखात पाहूया की, तुरटी आणि एका तेलाचा उपयोग केल्याने केसांवर काय परिणाम होतो.

तुरटीसह वापरा हे तेल –

खूप कमी लोकांना माहीत असेल की, तुरटीचा सौंदर्यासाठी वापर केला जातो, त्याचे अनेक फायदे आहेत. काही ठिकाणी कपडे साफ करण्यासाठी तुरटीचा वापर केला जातो. तर पुरुष दाढी केल्यानंतरही तुरटी वापरतात. पण केसांची निगा राखण्यासाठी तुरटी वापरू शकतो. त्यासाठी तुरटी आणि नारळाचं तेल एकत्र करून वापरू शकता. नारळाच्या तेलात ॲंटी-बॅक्टेरिअल गुणधर्मांव्यतिरिक्त ॲंटी-ऑक्सिडंट्स असतात, जे केसांची निगा तर राखतातच पण त्यांची वाढही चांगली होते.

हे सुद्धा वाचा

असा करावा तुरटी व नारळ तेलाचा वापर –

केसांसाठी हा घरगुती उपाय करताना एका भांड्यात नारळाचे थोडं तेल घेऊन ते गरम करावे व त्यामध्ये थोडी तुरटीची पूड मिसळावी. हे मिश्रण कोमट झाल्यानंतर ती पेस्ट ब्रशच्या सहाय्याने किंवा बोटांनी तुमच्या स्कॅल्पवर लावावी व अर्धा तास तसेच राहू द्यावे. त्यानंतर साध्या पाण्याने केस स्वच्छ धुवावेत. केस धुताना शांपूचा वापर करावा आणि त्यानंतर कंडीशनरही आठवणीने लावावे.

तुरटी व नारळ तेलाचे फायदे –

– केसांना तुरटी आणि खोबरेल तेल एकत्र लावल्यास केस गळणं कमी होईल. कोंड्याची समस्या हळूहळू संपेल आणि केस गळणे कमी होईल.

– तुरटी केसांमध्ये असलेली घाण काढून टाकेल, तर नारळाच्या तेलामुळे त्यांच्यात ओलावा टिकून राहू शकेल. केस निरोगी ठेवण्यासाठी, हायड्रेटेड राहणे महत्वाचे आहे आणि यासाठी नारळ तेल हा एक उत्तम पर्याय आहे.

– नारळ आणि तुरटीचे सौंदर्याला अनेक फायदे आहेत. त्वचेवर पिग्मेंटेशनचा त्रास सहन करावा लागत असेल तर तुरटी आणि खोबरेल तेल मिसळून त्वचेवर लावावं. काही महिन्यातच पिगमेंटेशनचा त्रास कमी झालेला जाणवेल.

( टीप- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)