पावसाळ्यात केस फ्रिजी होऊ नये यासाठी वापरा ‘हे’ घरगूती नैसर्गिक शाम्पू
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रतेमुळे केस फ्रिजी व कोरडे होतात. जर तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही नैसर्गिक उपाय घेऊन आलो आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही तुमचे केस चमकदार, मऊ आणि निरोगी देखील बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात...

पावसाळा येताच वातावरणात गारवा निर्माण होतो. पण हवामानातील आर्द्रतेमुळे आरोग्यासोबत, त्वचेच्या आणि केसांच्या समस्याही निर्माण होतात. यामध्ये स्कॅल्पमध्ये घाम, घाण आणि चिकटपणा वाढतो, ज्यामुळे केस फ्रिजी आणि कोरडे होऊ लागतात. या ऋतूत अनेक लोकांचे केस इतके कोरडे होतात की ते वेगळेच दिसू लागतात. चमक नाही, गुळगुळीतपणा नाही. त्याशिवाय, महागड्या कॅमिकलने भरलेले शॅम्पू आणि केसांचे प्रोडक्ट केसांची पोत बिघडवतात. यासाठी तुम्ही काही नैसर्गिक, प्रभावी असे घरगुती उपायांची आवश्यकता आहे, जे केसांना खोलवर पोषण देतात आणि स्कॅल्प निरोगी ठेवतात.
बाजारात मिळणाऱ्या महागड्या शाम्पूऐवजी जर तुम्ही घरगुती हर्बल आणि आयुर्वेदिक शाम्पू वापरलात तर केसांची गुणवत्ता सुधारतेच, पण केस गळणे, फ्रिजी होणे आणि कोंडा यासारख्या समस्याही बऱ्याच प्रमाणात कमी होतात. चला तर मग आजच्या या लेखात आपण जाणून घेऊया काही सोप्या आणि घरगुती गोष्टींनी तुम्ही स्वतःसाठी एक नैसर्गिक शाम्पू कसा बनवू शकता, जो पावसाळ्यात तुमच्या केसांना पुन्हा नवजीवन, चमक आणि ताकद देऊ शकतो.
रीठा-शिकाकाई आणि आवळा शाम्पू
रीठामध्ये नैसर्गिक साबण (सॅपोनिन) असतो जो स्कॅल्पची खोलवर स्वच्छता करतो. शिकाकाई केस गळती रोखते आणि आवळा केसांना पोषण देते. त्यामुळे तुम्ही या गोष्टींपासून शाम्पू तयार करू शकता. यासाठी तुम्हाला 5 रीठा, 5 शिकाकाई आणि 5 आवळा घ्या. आता हे रात्रभर पाण्यात भिजवा. दुसऱ्या दिवशी सकाळी या सर्व गोष्टी पाण्यात उकळवा आणि थंड झाल्यावर चांगले मॅश करा आणि गाळून घ्या. गाळून घेतलेलं द्रव तुमचा नैसर्गिक शाम्पू आहे. ते ओल्या केसांवर लावा, 5 मिनिटे मालिश करा आणि त्यानंतर केस धुवा. यामुळे केसांना चमक, ताकद आणि केस गळतीच्या समस्येत मदत होईल.
कोरफड आणि कडुलिंबाचा शाम्पू
कोरफड केसांमध्ये ओलावा टिकवून ठेवते आणि कडुलिंब स्कॅल्पची खाज आणि कोंडा दूर करते. केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी देखील हे प्रभावी आहे. तर हा नैसर्गिक शाम्पू तयार करण्यासाठी 3 चमचे ताजी कोरफड जेल घ्या . 8-10 कडुलिंबाची पाने उकळा आणि त्यांची पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट कोरफड जेलमध्ये टाका. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही टी ट्री ऑइलचे काही थेंब देखील टाकू शकता. ही पेस्ट केसांच्या मुळांवर लावा आणि 10 मिनिटे तसेच राहू द्या, नंतर साध्या पाण्याने धुवा. याचा वापर केल्याने केस मऊ आणि कोंडामुक्त होतील.
मेथी आणि कढीपत्ता शाम्पू
मेथीचा वापर केल्याने केस गळणे कमी करते आणि कढीपत्ता केस पांढरे होण्यास प्रतिबंध करते. हे शाम्पू केसांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. 2 चमचे मेथी आणि 10-15 कढीपत्ता रात्रभर भिजवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते बारीक करून पेस्ट बनवा. थोडे पाणी घालून जाड शाम्पू तयार करा. केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत लावा आणि 10 मिनिटांनी केस धुवा. हे लावल्याने केस जाड, मजबूत आणि निरोगी दिसतील.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
