AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थंडीत उष्णतेसाठी हीटर वापरताय? त्याआधी जाणून घ्या मोठे धोके

हीटरमुळे बाहेर फेकली जाणारी हवा मोठ्या प्रमाणात शुष्क स्वरुपाची असते. त्वचा कोरडी पडणे, अपुरी झोप, डोकेदुखी यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. हॅलोजन हीटर किंवा ब्लोअरचा अधिक वापर केल्यामुळे तुम्ही आजारी पडण्याचा धोका संभावतो. अस्थमा किंवा श्वसन विकारग्रस्त रुग्णांसाठी हीटरची हवा अधिकच हानिकारक ठरते.

थंडीत उष्णतेसाठी हीटर वापरताय? त्याआधी जाणून घ्या मोठे धोके
ROOM-HEATER
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Dec 20, 2021 | 11:22 PM
Share

मुंबई : हिवाळ्यात तापमानाच्या पाऱ्यात चढ-उतार नोंदवला जातो. तापमानाचा पारा आणखी खालावल्यास हाडं गोठवणाऱ्या थंडीचा सामना करावा लागतो. थंडीपासून बचावासाठी उष्णतावर्धक कपड्यांचा वापर तसेच लोकरीपासून बनवलेल्या चादरीत अनेकजण पहुडलेले दिसतात. तर अनेक जण थंडीच्या काळात घरात हीटरचा वापर करताना दिसून येतात. उष्णता निर्माण करणाऱ्या हीटरचा अधिक काळ संपर्क आल्यास आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. (Using heaters can harm you! understand defects of heater before its use in cold)

हीटर नेमकं कसं काम करतं?

हीटरची निर्मिती इलेक्ट्रॉनिक तंत्राचा अवलंब करून केली जाते. सिरॅमिक धातूपासून बनवलेल्या पट्ट्या हीटरमध्ये वापरण्यात येतात. उष्णता प्रसारता गुणधर्म असलेल्या सिरॅमिक मधून उष्णता बाहेर फेकली जाते. तसेच हवेतील आद्रतेचे शोषण केले जाते.

हीटरमुळे आरोग्याची हानी

हीटरमुळे बाहेर फेकली जाणारी हवा मोठ्या प्रमाणात शुष्क स्वरुपाची असते. त्वचा कोरडी पडणे, अपुरी झोप, डोकेदुखी यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. हॅलोजन हीटर किंवा ब्लोअरचा अधिक वापर केल्यामुळे तुम्ही आजारी पडण्याचा धोका संभावतो. अस्थमा किंवा श्वसन विकारग्रस्त रुग्णांसाठी हीटरची हवा अधिकच हानिकारक ठरते.

‘या’ व्यक्तींनी हीटरपासून दूर राहायला हवं

श्वसनाचे विकार असलेल्या व्यक्तींनी हीटरपासून ठराविक अंतर ठेवायला हवे. हीटरची हवा श्वसनमार्गात गेल्याने कफ होण्याची शक्यता असते. त्यामुळे खोकला तसेच सर्दीने तुम्ही ग्रासले जाऊ शकतात. शरीरात गेलेला कफ शुष्क झाल्याने तुम्हाला प्रतिजैविके घ्यावे लागतील.

‘अॅलर्जी’ स्पेशल हीटर

आरोग्य तज्ज्ञांच्या मतानुसार श्वसनविकारांची अॅलर्जी असलेल्या व्यक्तींसाठी विशिष्ट प्रकारच्या हीटरची रचना केलेली असते. अशाप्रकारच्या हीटरमध्ये आॉईलचा वापर केलेला असतो. हीटरमध्ये आॉईलचा वापर केल्याने हवा शुष्क होण्याची शक्यता टळते. तुम्ही सलग हीटरचा वापर करत असल्यास थोड्या वेळासाठी हीटरचा वापर बंद ठेवा.

गॅस हीटरपासून सावधान

गॅस किंवा सीएनजी संचलित हीटर बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, आरोग्य तज्ज्ञांच्या गटाने केलेल्या अभ्यासानुसार सीएनजी किंवा गॕस हीटरचा वापर करणाऱ्या घरातील लहान मुलांत श्वसनाचे विकार अधिक प्रमाणात आढळतात. सर्दी, खोकला, श्वसनास त्रास, फुप्फुसांना हानी पोहोचणे यासारखे आजारही उद्भवू शकतात. गॅस हीटरमधून बाहेर पडणारा कार्बन मोनॉक्साइड लहान मुलं तसेच ज्येष्ठ नागरिकांना अपायकारक ठरतो. तसेच हीटर कधीही कपड्यांच्या संपर्कात ठेऊ नये. त्यामुळे आग लागण्याची शक्यता असते.

इतर बातम्या

Pregnancy Problems | प्रसुतीनंतर ताप येतोय, घाबरण्यांचं कारण नाही! जाणून घ्या काय आहेत कारणं…

हिवाळ्यात दिवसाची सुरुवात एक कप हळदीच्या चहाने करा आणि निरोगी राहा!

Yoga Poses : ताण-तणाव वाढला आहे? मग ‘ही’ 4 योगासने नियमित करा आणि मन शांत ठेवा!

(Using heaters can harm you! understand defects of heater before its use in cold)

Follow Us
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल