कॅल्शियम केवळ दुध दहीपासूनच मिळत नाही, तर ‘या’ शाकाहारी पदार्थांमध्येही आहे भरपूर प्रमाणात, आजच करा आहारात समावेश

कॅल्शियम आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे. कारण यामध्ये हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक असलेले खनिज आहे. पण जेव्हा शरीरात कॅल्शियमची कमतरता जाणवते तेव्हा मात्र हाडे कमकुवत होऊ शकतात. यासाठी कॅल्शियमची कमतरता भासू नये यासाठी तुमच्या दैनंदिन आहारात या पदार्थांचा समावेश करून, हाडे निरोगी आणि मजबूत बनवा.

कॅल्शियम केवळ दुध दहीपासूनच मिळत नाही, तर या शाकाहारी पदार्थांमध्येही आहे भरपूर प्रमाणात, आजच करा आहारात समावेश
calcium
| Edited By: | Updated on: Jun 26, 2025 | 4:42 PM

 

कॅल्शियम हे आपल्या शरीरासाठी एक आवश्यक खनिज आहे, जे आपल्या शरीरातील हाडे व दात मजबूत ठेवण्यास मदत करतात. तसेच मज्जासंस्थेसाठी, स्नायूंच्या आकुंचनासाठी आणि हृदयाच्या आरोग्यासाठी देखील महत्त्वाचे आहे. अशातच तुमच्या शरीरातील कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होऊ शकतात, ज्यामुळे फ्रॅक्चर आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढू शकतो.
त्यामुळे बहुतेकजण असे मानतात की कॅल्शियम फक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधून मिळते, परंतु असे नाही कारण असे अनेक शाकाहारी पदार्थ आहेत जे कॅल्शियमने समृद्ध आहेत. तर आजच्या या लेखात आपण अशा काही कॅल्शियमयुक्त शाकाहारी पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत, जे तुमची हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतील, तर चला मग जाणून घेऊया-

तीळ

तीळ कॅल्शियमचा एक उत्तम स्रोत आहे. 100 ग्रॅम पांढऱ्या तिळामध्ये सुमारे 975 मिलीग्राम कॅल्शियम असते. तर तुम्‍ही तुमच्या आहारात तीळाचा समावेश करा जेणेकरून हाडे मजबूत होतीलच शिवाय त्वचा आणि हृदयाच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरेल.

हिरव्या पालेभाज्या

पालक, मेथी यासारख्या हिरव्या भाज्या कॅल्शियमचे चांगले स्रोत आहेत. 100 ग्रॅम पालकामध्ये सुमारे 99 मिलीग्राम कॅल्शियम असते. त्यामुळे तुमच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा.

बदाम

बदाम केवळ प्रथिने आणि व्हिटॅमिन ई ने समृद्ध नाही तर ते कॅल्शियमचा एक चांगला स्रोत देखील आहे. 100 ग्रॅम बदामात सुमारे 260 मिलीग्राम कॅल्शियम असते. त्यामुळे नाष्ट्यामध्ये किंवा दिवसभरात केव्हाही बदामाचे सेवन करा.

अंजीर

सुक्या अंजीरमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. 2 सुक्या अंजीरमध्ये सुमारे 65मिलीग्राम कॅल्शियम आढळते. हे पचन सुधारण्यास तसेच हाडे मजबूत करण्यास मदत करते.

सोया उत्पादने

टोफू, सोया मिल्क आणि सोया चंक हे कॅल्शियमचे चांगले स्रोत आहेत. 100 ग्रॅम टोफूमध्ये सुमारे 350 मिलीग्राम कॅल्शियम असते. याच्या नियमित सेवनाने हाडे मजबूत करण्यास मदत होते आणि हार्मोनल संतुलन देखील चांगले राखले जाते.

चिया बियाणे

100 ग्रॅम चिया बियांमध्ये 631मिलीग्राम कॅल्शियम असते. त्यात ओमेगा-3 फॅटी ॲसिड आणि फायबर देखील भरपूर असते जे हाडांसाठी तसेच हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तुम्ही हे चिया बियाणे स्मूदी किंवा दह्यात मिक्स करून खाऊ शकता.

राजमा आणि चणे

राजमा, चणे आणि काळे वाटाणे यासारख्या कडधान्यांमध्ये आणि बीन्समध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते. तर 100 ग्रॅम राजमामध्ये 100 मिलीग्राम कॅल्शियम असते आणि त्याहून अधिक म्हणजे 100 ग्रॅम हरभरामध्ये 105 मिलीग्राम कॅल्शियम असते.

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ

जर तुम्ही दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करत असाल तर दूध, दही आणि चीज हे कॅल्शियमचे उत्तम स्रोत आहेत. 1 ग्लास दुधात 300 मिलीग्राम कॅल्शियम असते. त्यामुळे घरातील सर्व सदस्यांनी रोज दुधाचे सेवन केले पाहिजे, जेणे करून कॅल्शियमची कमतरता कधीच भासणार नाही.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)