‘व्हिटॅमिन सी’चा तुमच्या दृष्टीशी आहे थेट संबंध; शरीरात ही लक्षणे दिसताच सावध व्हा!

| Updated on: May 31, 2021 | 8:08 AM

खाण्याच्या अनियमित वेळा, काहीही खाणे, खाण्याच्या वाईट सवयींमुळे शरीरातील व्हिटॅमिन ‘सी’च्या पातळीवर परिणाम होऊ शकतो. व्हिटॅमिन ‘सी’ची पातळी कमी होऊ शकते. (Vitamin C is directly related to your vision; Be careful when you see these symptoms in the body)

‘व्हिटॅमिन सी’चा तुमच्या दृष्टीशी आहे थेट संबंध; शरीरात ही लक्षणे दिसताच सावध व्हा!
‘व्हिटॅमिन सी’
Follow us on

नवी दिल्ली : नेहमी आपले आरोग्य उत्तम राखण्यासाठी आपल्याला एक चांगला डाएट घेणे गरजेचे आहे. जेणेकरून आपल्या शरीराला प्रत्येक प्रकारचे व्हिटॅमिन्स मिळतील.जसे शरीराला इतर व्हिटॅमिन्सप्रमाणे व्हिटॅमिन ‘सी’ची नितांत गरज आहे. योग्य आहारातून व्हिटॅमिन ‘सी’चा शरीरात पुरवठा केला जाऊ शकता. खाण्याच्या अनियमित वेळा, काहीही खाणे, खाण्याच्या वाईट सवयींमुळे शरीरातील व्हिटॅमिन ‘सी’च्या पातळीवर परिणाम होऊ शकतो. व्हिटॅमिन ‘सी’ची पातळी कमी होऊ शकते. त्यामुळे आपण आपल्या आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. आपला नियमित डायट ठरवला पाहिजे. (Vitamin C is directly related to your vision; Be careful when you see these symptoms in the body)

व्हिटॅमिन ‘सी’ची पातळी कधी कमी होते?

देशातील प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. अबरार मुल्तानी यांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही स्मोकींग अर्थात धूम्रपान करीत असाल किंवा दारू पिणे, जेवण योग्य वेळेत न घेणे, कुठला ना कुठला मानसिक आजार अशा विविध कारणांमुळे आपल्या शरीरातील व्हिटॅमिन ‘सी’चे प्रमाण कमी होऊ शकते. अशा परिस्थितीत आपल्याला व्हिटॅमिन ‘सी’ सप्लीमेंट जरुर घेतली पाहिजे.

शरीरात व्हिटॅमिन ‘सी’चे प्रमाण कमी झालेय हे या लक्षणांवरून कळते

नाकातून रक्त येणे, हिरड्यांचा त्रास होणे

आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. अबरार मुल्तानी यांच्या म्हणण्यानुसार, नाकातून रक्त येणे, हिरड्यांचा त्रास सुरू होणे ही आपल्या शरीरातील व्हिटॅमिन ‘सी’चे प्रमाण कमी झाल्याची लक्षणे आहेत. हा त्रास होत असलेल्या लोकांनी किमान दोन आठवडे व्हिटॅमिन ‘सी’युक्त फळे खाल्ली तर त्यांच्या शरीरातील व्हिटॅमिन ‘सी’ची पातळी सुधारू शकेल. परिणामी, यासंबंधी त्रासही थांबेल.

वेगाने वजन वाढणे

जर तुमचे वेगाने वाढत असेल तर याला कुठे ना कुठे व्हिटॅमिन सीची कमतरताच कारणीभूत ठरलेली असते. जर शरीरात व्हिटॅमिन सी कमी असेल तर पोटाची चरबी वाढू शकेल. व्हिटॅमिन सी पुरेशा प्रमाणात असतील तर शरीराचे वाढलेले वजन एनर्जी असू शकेल.

रुक्ष त्वचा

त्वचा रुक्ष आणि खडबडीत होणे हे शरीरातील व्हिटॅमिन सीच्या कमतरतेचेच लक्षण आहे. व्हिटॅमिन सीमध्ये अँटी-ऑक्सीडेंट तत्त्वे असतात. ही तत्वे आपल्या त्वचेचे उत्तम पद्धतीने रक्षण करतात. त्वचा रुक्ष बनत नाही.

लगेचच थकवा येणे

जर तुम्हाला थोडेसे काम करूनही थकवा येत असेल तर तुमच्या शरीरात नक्कीच व्हिटॅमिन सीची पातळी कमी झाली आहे. जर तुम्हाला मागील अनेक दिवसांपासून थकवा जाणवत असेल वा चिडचीडपणा वाटत असेल तर सायट्रिक फूडचे सेवन करा. शरीरात व्हिटॅमिन सी कमी होते, त्याचवेळी ही लक्षणे दिसू लागतात.

धूसर दिसू लागणे

व्हिटॅमिन सीमध्ये अँटी-ऑक्सीडेंट गुण असतात. या गुणांची आपल्या डोळ्यांचे आरोग्य उत्तम ठेवण्यास खूप मोठी मदत होते. जर तुम्हाला अंधूक, धूसर दिसत असेल तर शरीरात व्हिटॅमिन सीचे प्रमाण कमी झाल्याचे लक्षात घ्या. जर तुम्ही नियमित व्हिटॅमिन सीयुक्त फळांचे सेवन करीत असाल तर मोतीबिंदू किंवा डोळ्यांच्या इतर व्याधी होणार नाहीत. (Vitamin C is directly related to your vision; Be careful when you see these symptoms in the body)

इतर बातम्या

श्रेयवादावरुन पुन्ह चुरस, दुर्गाडी खाडी पूलाच्या नव्या दोन लेनच्या लोकार्पणाच्या आधीच भाजपची बॅनरबाजी

Mahindra 9 शानदार SUV आणि MPV लाँच करणार, Scorpio, Bolero सह XUV 700 चा समावेश