Health : जेवणानंतर तोंड धुत नसाल वेळीच व्हा सावधान, कारण… जाणून घ्या!

Health : बहुतेक लोक कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर तोंड धुवायचं विसरून जातात. त्यामुळे आता आपण खाल्ल्यानंतर तोंड न धुतल्यामुळे काय दुष्परिणाम होतात याबाबत जाणून घेणार आहोत.

Health : जेवणानंतर तोंड धुत नसाल वेळीच व्हा सावधान, कारण... जाणून घ्या!
ब्रश न करणे : एखादा पदार्थ खाल्ल्यानंतर किंवा जेवल्यानंतर दात स्वच्छ केले नाही तर दात आणि हिरड्या खराब होऊ शकतात. त्यामुळे अन्नाचे कण दात आणि त्यांच्यातील मोकळ्या जागेत अडकून त्रास होऊ शकतो.
| Updated on: Sep 16, 2023 | 9:17 PM

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात लोक स्वतःकडे जास्त लक्ष देत नाहीत. पुरेशी झोप न घेणं, आराम न करणं तसंच काही लोक शारीरिक स्वच्छतेकडेही लक्ष देत नाहीत. अशा अनेक गोष्टींकडे लक्ष देत नाहीत. त्यात लोक जेवण केल्यानंतर आपलं तोंड धुत नाहीत. आजकालचे बहुतेक लोक बाहेरचे पदार्थ खाल्ल्यानंतर किंवा घरात देखील जेवण केल्यानंतर ते त्यांचं तोंड धुवायचं विसरतात. पण तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही खाल्ल्यानंतर तोंड धुतलं नाही तर तुम्हाला अनेक आजारांचा सामना करू करावा लागू शकतो. तर जेवणानंतर प्रत्येक वेळी तोंड धुणे खूप गरजेचे आहे.

तोंडामध्ये इन्फेक्शन होऊ शकते – कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर जर तुम्ही तुमचं तोंड धुतले नाही तर तुमच्या तोंडात इन्फेक्शन होऊ शकते. कारण आपले खाल्लेले अन्न आणि त्यामध्ये मिसळलेले बॅक्टेरिया यामुळे तुमच्या तोंडात इन्फेक्शन होऊ शकते. मग जिभेवर पुरळ, फोड येणे, तोंडात फोड येणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर तोंड धुणे गरजेचे आहे.

दात आणि दाताच्या वरचा थर खराब होतो – जेव्हा आपण कोणत्याही पदार्थ खातो तेव्हा आपल्या तोंडात लाळ तयार होते. ही तयार झालेली लाळ अन्नातून बाहेर पडणाऱ्या साखरेमध्ये मिसळते. तसेच ही साखर पचवण्यासाठी बॅक्टेरिया एंजामाईन्स तयार करू लागतात. त्यातून आपल्या दातांवर आम्ल आणि टाकाऊ पदार्थ थराच्या स्वरूपात साचतात. याला प्लाक असे म्हणतात. प्लाक आपल्या दातांना पिवळा रंग आणतो, तसेच तोंडात साचलेले आम्ल पदार्थ दातांच्या वरचा थर खराब करतात. त्यामुळे जेवण केल्यानंतर तोंड धुणे गरजेचे असते.

दात किडू शकतात – जर तुम्ही कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर तोंड धुतले नाही तर तुमचे दात किडण्याची शक्यता असते. कारण आपण खाल्लेले अन्न दातांमध्ये साठून बसते त्यामुळे आपले दात किडू शकतात. त्यामुळे दातांमध्ये तीव्र वेदना होऊ शकते आणि तुमचे दात किडू शकतात. त्यामुळे जेवण केल्यानंतर तोंड आवर्जून धुवा जेणेकरून तुम्हाला दातांच्या समस्या निर्माण होणार नाहीत.