AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नानंतर मूल होत नाही? वंध्यत्व आलंय हे ओळखायचं तरी कसं? डॉक्टरांनी दिलेली उत्तरं जाणून घ्यायलाच हवी

वंध्यत्वाची समस्या अनेकदा स्त्री व पुरुषांमध्ये पाहायला मिळते. हल्लीच्या काळामध्ये ही समस्या जोर धरत आहे यामागे आपली जीवनशैली व आहार पद्धती तसेच बदललेले ताणतणाव दिनक्रम इत्यादी मुळे या समस्या कारणीभूत असण्याची शक्यता आहे. अनेकांना लग्न झाल्यानंतर ही लवकर मुल होत नाही? अश्यावेळी अनेकजण चिंता व्यक्त करतात. वंध्यत्व येण्यामागची कारणे आणि लक्षणं चला तर मग जाणून घेऊया.

लग्नानंतर मूल होत नाही? वंध्यत्व आलंय हे ओळखायचं तरी कसं? डॉक्टरांनी दिलेली उत्तरं जाणून घ्यायलाच हवी
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Jan 18, 2022 | 10:53 PM
Share

सध्याची परिस्थिती ताणतणावाची निर्माण झालेली आहे आणि अनेकांना आरोग्याच्या (health) वेगवेगळ्या समस्या त्रास देत आहे त्यातील एक समस्या म्हणजे वंध्यत्वाची (infertility issue) समस्या अनेक जोडते असे आहेत की त्यांना ही समस्या प्रामुख्याने उद्भवत आहे परंतु या समस्येबद्दल कोणीही काही मोकळेपणाने बोलत नाही आणि म्हणूनच ही समस्या दिवसेंदिवस वाढत जाते अनेकदा ही समस्या पुरुष किंवा स्त्रिया दोघांमध्ये असू शकते परंतु वेळेवर उपचार (treatment) करणे अत्यंत गरजेचे आहे तरच आपण या समस्यांपासून मुक्तता मिळू शकतो. आजच्या लेखामध्ये आपण डॉक्टर संध्या बायस यांच्याकडून वंध्यत्व म्हणजे नेमकं काय लग्नानंतर मूल होत नाही याबद्दलच्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत.

वंध्यत्व म्हणजे काय?

टीव्ही 9शी बातचीत करताना डॉ. श्रद्धा बायस परदेशी यांनी सांगितले की जेव्हा एखादे जोडपे लग्न झाल्यानंतर एका वर्षापर्यंत बाळासाठी प्रयत्न करत असतात परंतु गर्भधारणा जर होत नसेल तेव्हा जी परिस्थिती निर्माण होते त्या परिस्थितीला वंध्यत्व किंवा इंफर्टीलिटी( infertility) असे म्हणतात.अनेकदा पहिले बाळ वेळेवर होत नाही ही स्टेज प्राथमिक वंध्यत्व, अनेकदा एक मूल झाल्यावर दुसरे मुल होत नाही त्या स्टेज ला सेकंडरी वंध्यत्व त्यानंतर वारंवार गर्भपात होऊन बाळ जन्माला न येणे ही जी पायरी असते तिला थर्ड स्टेज असे म्हणता. अश्या या सगळ्या कंडीशन आपल्याला जाणवतात तेव्हा वंध्यत्व ही समस्या उद्भवू लागते. वंध्यत्वाची समस्या होण्यामागे स्त्री व पुरुष हे दोन्ही जबाबदार असतात परंतु अनेकदा स्त्रीला बाळ होत नसल्याने संपूर्ण दोष स्त्रीलाच दिला जातो परंतु या समस्येला पुरुष सुद्धा तितकेच कारणीभूत असतात आणि म्हणूनच जर या सगळ्या समस्या तुम्हाला सुद्धा उद्भवत असतील तर अशा वेळी योग्य ती चाचणी व योग्य ती माहिती जाणून घेणे त्यानुसार उपचार करणे गरजेचे आहे.

लक्षणं

जर पाळी व्यवस्थित वेळेवर येत नसेल, पीसीओडी समस्या,पीसीओएस समस्या त्रास देत असेल,स्पर्म काउन्ट कमी असेल, काही जेनेटिक आजार

वंध्यत्व येण्याची कारणे

वंध्यत्व येण्याची कारणे ही वेगवेगळे आहेत परंतु आपल्या भारतीय समाजामध्ये या कारण या समस्येचे प्रमुख कारण स्त्रियाच मानले जातात आणि म्हणूनच अनेकदा हा एक शारीरिक आजार न राहता अनेकदा मानसिक आजार सुद्धा बनून जातो परंतु हा आजार स्त्रीला होतो तसाच पुरुषांमध्ये सुद्धा हा आजार आपल्याला पाहायला मिळतो परंतु संपूर्ण दोष स्त्रीलाच दिला जातो.

50% पुरुष वंध्यत्वाच्या समस्येला कारणीभूत आहेत

– बदललेली जीवनशैली,

– तणावग्रस्त जीवन, तणावग्रस्त जीवनामुळे होणारा शरीरावर परिणाम – स्पर्म काउंटची कमतरता होणे,स्पर्म ॲक्टीव्ह नसणे, स्पर्म चा आकार योग्य नसणे

– फास्ट फूड अतिमद्यपान अल्कोहोलिक पदार्थ चे सेवन

निदान :

नॅनो जेनेटिक कन्स्टीट्युशनल ट्रीटमेंट

हि एक होमीओपेथीक ट्रीटमेंट आहे, त्या ट्रीटमेंटमध्ये सूक्ष्म डोसाच्या माध्यमातून आपली जी काही जेनेटिक हिस्ट्री म्हणजेच आपल्या घरातील आई वडील त्यांना एखादी आजार होता का ? याचा इतिहास शोधला जातो आणि या इतिहासाच्या आधारावरच आपल्याला 50% आजार होण्याची शक्यता असते. तुम्हाला माहिती असेल की घरातील एखाद्या सदस्याला डायबिटीज झाला असेल तर येणाऱ्या पिढीतील सदस्यांना सुद्धा डायबिटीज चे प्रमाण पहावयास मिळते. कन्स्टीट्युशनल याचा अर्थ असा की एखाद्या व्यक्तीच्या सवयी. व्यक्तीच्या शारीरिक सवयी आणि मानसिकता यावरून एकंदरीत सगळ्या गोष्टींचे निरीक्षण केले जाते आणि हीच संपूर्ण प्रक्रिया ही होमिओ थेरेपीमध्ये जाणून घेतली जाते.

या गोष्टी अवश्य करा.

नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा.जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा ताण तणाव असेल तर अशा वेळी जास्त विचार न करता आपल्या जोडीदारासोबत सकारात्मक दृष्टिकोनातून वेळ घालवा.

कुठेतरी जोडीदारासोबत बाहेर जा.

मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा.

संबंधित बातम्या :

तणावमुक्त राहण्यासाठी खास टीप्स…एका क्लिकवर जाणून घ्या कसे राहाल तणावमुक्त

कोरोनाचा रुग्ण घरात आहे, मग ‘हे’ 10 मूलमंत्र ठेवा लक्षात आणि कोरोनाला करा गुडबाय

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...