कोरोनाचा रुग्ण घरात आहे, मग ‘हे’ 10 मूलमंत्र ठेवा लक्षात आणि कोरोनाला करा गुडबाय

कोरोनाचा रुग्ण घरात आहे, मग 'हे' 10 मूलमंत्र ठेवा लक्षात आणि कोरोनाला करा गुडबाय
CORONA TESTING

मुंबई : कोरोनारुपी राक्षस पुन्हा आपल्या घरी येण्यास सज्ज आहे. नवीन वर्षाची सुरुवात झाली आणि कोरोनाने अचानक थैमान घातला. अनेकांचा घरात आमंत्रण न देतात हा राक्षस आला. मग अशावेळी इतर घरातील कुटुंब सदस्यांनी काय करावं, काय खबरदारी घ्यावी याबद्दल WHO ने सांगितलं आहे. कोरोनाचा रुग्ण घरात, मग कशी घ्याल काळजी 1.  कोरोना रुग्णासाठी वेगळी खोली […]

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

Jan 18, 2022 | 5:46 PM

मुंबई : कोरोनारुपी राक्षस पुन्हा आपल्या घरी येण्यास सज्ज आहे. नवीन वर्षाची सुरुवात झाली आणि कोरोनाने अचानक थैमान घातला. अनेकांचा घरात आमंत्रण न देतात हा राक्षस आला. मग अशावेळी इतर घरातील कुटुंब सदस्यांनी काय करावं, काय खबरदारी घ्यावी याबद्दल WHO ने सांगितलं आहे.

कोरोनाचा रुग्ण घरात, मग कशी घ्याल काळजी

1.  कोरोना रुग्णासाठी वेगळी खोली – कोरोना रुग्णासाठी घरात वेगळी खोली असावी. शौचालय सुद्धा वेगळं असावं. कोरोना झालेल्या रुग्णाला पूर्णपणे वेगळे ठेवायचं असतं. कारण त्या माणसाच्या संपर्कात आलेल्यांना सुद्धा कोरोनाची लागण होण्याची भीती असते. त्यामुळे कोरोना रुग्णाला किमान 14 दिवस वेगळ्या खोलीत ठेवलं पाहिजे.

2. जेवण्याचे वेगळे भांडे आणि इतर साहित्य – कोरोना रुग्णासाठी जेवण्याची वेगळी भांडी असावी. तसंच ज्या वस्तूंची रुग्णाला गरज आहे त्या सगळ्या वस्तू फक्त तोच वापरेल याची काळजी घ्यावी. त्याचं टॉवेल, नॉपकिन, ऑक्सिमीटर, औषधं, वाफेचे मशीन इत्यादी गोष्टी वेगळ्या असाव्यात. जर आपण्यास त्या वस्तूंची गरज पडल्यास त्या वस्तू डेटॉल लिक्विडने साफ करु मग त्याचा वापर करावा.

3. रुग्णाचे कपडे आणि इतर साहित्य कायम स्वच्छ ठेवावे. आणि ते गरम पाण्यात डेटॉलने साफ करावे.

4. कुटुंबातील इतर सदस्यांनी मास्कचा वापर करावा.

5. कोरोना रुग्णांची सेवा घरातील अशा व्यक्तीने करावी ज्याची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत असेल. कारण अशा व्यक्तीला कोरोनाच्या संसर्गाचा धोका कमी असतो. मात्र या व्यक्तीनेही त्या रुग्णांशी 1 मीटरचं अंतर राखून संपर्क ठेवला पाहिजे.

6. बाहेरच्या व्यक्तींना नो एन्ट्री – घरात जर कोरोना रुग्ण असेल तर 14 दिवस तुमच्या घरात बाहेरील कोणत्याही व्यक्तीला प्रवेश देऊ नका. असं न केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव पसरण्याची भीती असते.

7. कोरोना रुग्ण घरात असल्याने त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवा. कारण त्याला ताप, सर्दी, खोकला इतर कुठलेही त्रास या दिवसांमध्ये दिसू शकतात. या लक्षणांकडे लक्ष ठेवा आणि वेळोवेळी डॉक्टरांना याची माहिती द्या.

8. सर्वात महत्त्वाचे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही औषधं या दिवसात घेऊ नका. किंवा आजारपण अंगावर काढू नका. कोरोना हा साधा आजार नसून यामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. त्यामुळे आपल्याला सर्व समजतं या भ्रमांत राहू नका. इंजेक्शनचे दोन डोस आणि कोरोना होऊन गेलेल्यांना परत कोरोना होतोय. त्यामुळे नियम पाळा आणि काळजी घ्या.

9. प्रोटीनयुक्त आहार घ्या – कोरोना रुग्णाला या दिवसात रोगप्रतिकारकशक्ती वाढेल असा सकस आहार द्या. व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी मिळतेल असे पदार्थ खा. फळ, ताज्या भाज्या आणि खिचडी, गरम पाणी रोज घेतलं पाहिजे. अंडी खा, चिकन सूप घेतलं पाहिजे. जर तुम्ही मांसाहार करत नाही अशानी दूध आणि पनीरचा आहारात समावेश करावा.

10. आनंदी राहा – सगळ्यात महत्त्वाचं होम आयसोलेशनमध्ये असेल्याने रुग्ण आणि घरातील इतर मंडळी तणावात असतात. त्यामुळे याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. या दिवसात तुम्ही जेवढे तणावमुक्त राहाल आणि आनंद असाल तेवढं तुम्ही लवकर बरे व्हाल. तुम्ही तणावात असाल तर तणाव निर्माण करणारे हार्मोन्स वाढतात आणि आनंदी असाल तर आनंदी राहणारे हार्मोन्स वाढतील. त्यामुळे या दिवसात सगळ्यांनी सकारात्मक राहा. आपल्या आवडीच्या गोष्टी करा ज्यातून आनंद मिळतो ते करा. पुस्तकं वाचा, मोबाईलवर सिरीज, चित्रपट पाहा. मित्रमैत्रिणींशी गप्पा मारा.

संबंधित बातम्या

Corona Cases India : देशात 2 लाख 38 हजार नवे रुग्ण, ओमिक्रॉनबाधितांची संख्या 9 हजारांच्या उंबरठ्यावर

Corona in India: कोरोना चाचण्या वाढवा, चिठ्ठी लिहून केंद्र सरकारच्या सर्व राज्यांना सूचना

Onion juice : दररोज कांद्याचा रस प्या आणि कोरोनापासून दूर राहा!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें