AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

6-6-6 वॉकींग रूल, वजन कमी करणे, फिट राहण्याचा सर्वात सोपा अन् फायदेशीर फंडा

6-6-6-Walking Rule: सकाळी लवकर उठण्याची सवय ठेवा. त्यामुळे कोणतीही घाईगडबड न करता तुमचे वॉकचे काम पूर्ण होईल. संध्याकाळी काम संपल्यावर जेवणापूर्वी चालण्याच्या सवयीचा तुमच्या दिनचार्यात समावेश करा. चालताना वातावरणानुसार साधे कपडे वापरा.

6-6-6 वॉकींग रूल, वजन कमी करणे, फिट राहण्याचा सर्वात सोपा अन् फायदेशीर फंडा
Health
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Nov 21, 2024 | 2:12 PM
Share

6-6-6-Walking Rule:  आरोग्य चांगले ठेवण्यासाठी अनेक जण नियमित व्यायम करतात. काही जण जिममध्ये जावून घाम गाळतात. परंतु प्रत्येकाला ते शक्य नसते. यामुळे चालणे हा सर्वात प्रभावी व्यायम आहे. चालण्याचा ‘6-6-6 वॉकिंग रूल’ वेगाने लोकप्रिय होत आहे. या नियमात सकाळी सहा वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता 60 मिनिटांची वॉक केली जाते. त्यात सहा मिनिटांचा वार्म-अप, 6 मिनिटे कूल-डाउनचा समावेश आहे. या नियमामुळे तुमचे आरोग्यच चांगले राहणार नाही तर दीर्घ कालावधीपर्यंत तुम्हाला फायदाही होणार आहे.

सकाळी सहा वाजता ताजी हवा आणि शांत वातावरण असते. त्यामुळे संपूर्ण दिवसभर तुम्हाला उर्जा मिळते. संध्याकाळी सहा वाजता केलेला वॉक कामाचा तणाव कमी करतो. त्यामुळे शरीराला आराम मिळते. तसेच सहा मिनिटांचा वार्म-अप आणि कूल-डाउन शरीराला दुखापतीपासून वाचवतो. त्यामुळे सध्या 6-6-6 हा फंडा यशस्वी होत आहे. सोशल मीडियावर या फंड्याची चर्चा रंगली आहे.

वार्म-अप आणि कूल-डाउनचे फायदे

सहा मिनिटांचा वार्मअपने तुमचे स्नायू सक्रीय होतात. तसेच ह्रदयाचे ठोके हळूहळू वाढतात. त्यामुळे या सहा मिनिटांत हळूहळू चालण्याचा सल्ला दिला जातो. कूल डाऊनमुळे ह्रदयाचे ठोके सामान्य होतात. तसेच स्नायूवरील ताण कमी होतो. यामुळे हळूहळू चालणे आणि दीर्घ श्वास घेण्यासोबत स्ट्रेचिंग करण्याचा समावेश आहे.

6-6-6 वॉकीग रूलचा आरोग्यास होणारा फायदा

  • नियमित चालल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. ह्रदयाचा आजार होण्याचा धोका कमी होतो.
  • कॅलरीचा परिपूर्ण उपयोग होतो. तसेच वजन नियंत्रणात राहतो.
  • संध्याकाळच्या वॉकमुळे तणाव कमी होतो. मानसिक आरोग्य चांगले होते.
  • दिवसभरातील शारीरिक आणि मानसिक थकवा दूर होतो. झोप चांगली येत.

सकाळी लवकर उठण्याची सवय ठेवा. त्यामुळे कोणतीही घाईगडबड न करता तुमचे वॉकचे काम पूर्ण होईल. संध्याकाळी काम संपल्यावर जेवणापूर्वी चालण्याच्या सवयीचा तुमच्या दिनचार्यात समावेश करा. चालताना वातावरणानुसार साधे कपडे वापरा, असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.

Follow Us
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....