AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ova : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी ‘ओवा’ खा, त्याचे विशेष फायदे समजून घ्या

Ova is effective against winter : बदलत्या वातावरणामध्ये सर्दी, खोकला, ताप हे संसर्गजन्य आजार होणे सामान्य आहे. त्यामुळे बदलत्या वातावरणामुळे होणाऱ्या समस्यांबाबत आपण काळजी घेतली पाहिजे. रात्री झोपण्यापूर्वी ओवा खाल्यास त्याचे अनेक फायदे शरीराला होतात.

Ova : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी 'ओवा' खा, त्याचे विशेष फायदे समजून घ्या
Ova
| Updated on: Nov 20, 2024 | 4:58 PM
Share

ओवा हा एक मसाला आहे. जो प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात असतो. स्वयंपाकात वापरला जाणारा हा मसाला आरोग्यासाठी औषधांसारखा आहे. ओव्यामध्ये दाहक विरोधी, अँटिऑक्सिडंट आणि अँटिव्हायरल गुणधर्म आहेत. जे शरीराला अनेक आजारांपासून वाचवते. काही आजारांमध्ये ओव्याचे सेवन केल्याने रोग ही बरा होतो. कोमट पाण्यात ओवा टाकून खाल्ल्याने औषधी परिणाम होतो. ओव्याचा वापर भारतीय घरगुती उपचारांमध्ये अनेक वर्षांपासून केला जात आहे. पोटाच्या गंभीर समस्या असल्यास ओव्याचे सेवन केले जाते. रात्री कोमट पाण्यासोबत ओवा खाल्ल्याने अनेक फायदे होतात.

ओवा खाण्याचे फायदे

कोमट पाण्यासोबत ओवा चावून खाल्ल्याने पोटातील गॅस, बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटीच्या समस्या दूर होतात. ज्या समस्या असल्या तरी त्या दूर केल्या जातात. ओव्यामध्ये पचनक्रिया सुधारणारे घटक असतात.

रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा ओवा चावून कोमट पाणी प्यायल्याने पोटात जमा झालेला वायू निघून जातो आणि अपचनाची समस्या दूर होते.

ओवा खाल्ल्याने चयापचय वाढतो. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी कोमट पाण्यासोबत ओवा खाल्ल्याने शरीरातील चरबी लवकर वितळते.

अनेकांना गरजेपेक्षा जास्त खाण्याची सवय असते. जर तुम्ही रात्री कोमट पाण्यासोबत एक चमचा ओव्याचे सेवन केले तर तुमचे पोट तासान तास भरलेले राहते आणि तुम्ही जास्त खाण्यापासून वाचू शकता.

रात्री पाण्यासोबत ओवा चावून खाल्ल्याने शरीराला आराम मिळेल आणि चांगली झोप येईल. ओव्यामध्ये शरीर आणि मन शांत करणारे तसेच शांत झोप आणणारे गुणधर्म आहेत.

ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे. अशा लोकांना हिवाळ्यात सर्दी आणि खोकल्याचा त्रास होतो. कोमट पाण्यासोबत ओवा खाल्ल्यास सर्दी खोकला यासारख्या संसर्गजन्य आजारांपासून बचाव होतो.

ओवा खाणे विशेषतः महिलांसाठी फायदेशीर आहे. हे मासिक पाळीच्या दरम्यान अस्वस्थपणापासून मुक्त होण्यास मदत करते. ओवा खाल्ल्याने हार्मोनल संतुलन राखले जाते आणि रक्ताभिसरण सुधारते.

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप