सफेद मध म्हणजे अँटीऑक्सिडंट्सचे ‘पॉवर हाऊस’; जाणून घ्या याचे फायदे आणि तोटे

| Updated on: Jul 30, 2021 | 8:27 AM

सफेद मधाला अँटीऑक्सिडंट्सचे पॉवर हाऊस म्हटले जाते. कारण त्यात व्हिटॅमिन ए आणि बी, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि झिंक यांसारखी अनेक पोषक तत्त्वे असतात.

सफेद मध म्हणजे अँटीऑक्सिडंट्सचे ‘पॉवर हाऊस’; जाणून घ्या याचे फायदे आणि तोटे
सफेद मध म्हणजे अँटीऑक्सिडंट्सचे ‘पॉवर हाऊस’
Follow us on

मुंबई : तुम्ही सर्वांनीच तपकिरी रंगाचा मध खाल्ला असेल, पण तुम्ही कधी सफेद रंगाचा मध चाखला आहे का? सफेद मध क्रीमयुक्त पांढऱ्या रंगाचा असतो. हे कच्चे मध म्हणून ओळखले जाते. असे म्हटले जाते की हा मध मधमाशांच्या पोळ्यापासून काढला जातो. यात कोणत्याही हिटींग प्रक्रियेचा वापर केला जात नाही. हिटींग प्रक्रियेदरम्यान मधातील काही फायदेशीर घटक नष्ट होतात. त्यामुळे तपकिरी मधाच्या तुलनेत सफेद मध अधिक फायदेशीर मानला जातो. सफेद मध प्रत्येक हंगामात आणि प्रत्येक फुलांपासून मिळत नाही. तर हा मध अल्फाल्फा, फायरवेड आणि सफेद त्रिदळी पानांच्या रोपट्यावरील फुलांपासून मिळतो. असे म्हटले जाते की दररोज एक चमचा सफेद मध खाल्ल्यास शरीराला बरेच फायदे होतात. (White honey is the ‘power house’ of antioxidants; know the benefits and loss)

सफेद मधाचे फायदे

1. सफेद मधाला अँटीऑक्सिडंट्सचे पॉवर हाऊस म्हटले जाते. कारण त्यात व्हिटॅमिन ए आणि बी, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि झिंक यांसारखी अनेक पोषक तत्त्वे असतात. याशिवाय फ्लेव्होनोइड्स आणि फिनोलिक अशी संयुगे आणि अँटीऑक्सिडंट्स आहेत. यामुळे वृद्धत्वाचे परिणाम रोखले जातात. तसेच हृदयरोग आणि कर्करोग यांसारख्या जीवघेणा आजारापासून संरक्षण केले जाते.

2. जर तुम्हाला खोकल्याचा त्रास होत असेल तर तुम्हाला सफेद मधामुळे खूप आराम मिळतो. तुम्ही पाणी उकळू शकता आणि त्यात लिंबू व सफेद मध घालून ते पिऊ शकता. यामुळे नक्कीच खोकल्यापासून आराम मिळेल.

3. पोटाच्या अल्सरसारख्या समस्यांमध्ये सफेद मध खूप फायदेशीर ठरते. याव्यतिरिक्त हे पचन व्यवस्था सुधारण्यासाठी कार्य करते. दररोज एक चमचा सफेद मध रिकाम्या पोटी घ्या.

4. जर तोंडात फोड असतील तर सफेद मध सेवन करा. याचा भरपूर फायदा होईल.

5. हे मध रोज कोमट पाण्यात मिसळून घेतल्यास शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण झपाट्याने वाढते. याचे सेवन केल्याने महिला अशक्तपणासारख्या समस्यांपासून सुरक्षित राहतात.

6. सफेद मधात फायटोन्यूट्रिएंट असतात, त्यामुळे ते त्वचेच्या जखमांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त असते. तसेच त्वचा हायड्रेटेड आणि सुंदर ठेवण्यास सफेद मध उपयुक्त आहे. बुरशी नष्ट करण्याचे गुणधर्मही सफेद मधात आढळतात.

हे आहेत काही तोटे

सफेद मधामध्ये बरेच गुणधर्म असले तरी सफेद मध तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर विशिष्ट प्रमाणात सेवन केले पाहिजे. जेणेकरून त्याचे फायदे मिळू शकतील आणि शरीराला कोणतीही हानी पोहोचणार नाही. खरंतर सफेद मध त्याच्या सूक्ष्मजीव सामग्रीमुळे, कधीकधी बोटुलिझमचे कारण ठरू शकतो. कधीकधी बोटुलिझममुळे पक्षाघात होण्याचा धोका वाढतो.

या व्यतिरिक्त सफेद मधाचा जास्त वापर केल्याने कधीकधी शरीरात फ्रुक्टोज नावाच्या घटकाचे प्रमाण वाढते, ज्यामुळे लहान आतड्यात पोषकद्रव्ये शोषण्याची क्षमता कमी होते. अशा परिस्थितीत शरीर कमकुवत होऊ लागते. त्याचा जास्त वापर केल्याने अन्न विषबाधेची देखील समस्या होऊ शकते. एक वर्षाखालील मुलांना सफेद किंवा तपकिरी मध असले तरी कोणत्याही प्रकारचे मध देऊ नये. (White honey is the ‘power house’ of antioxidants; know the benefits and loss)

इतर बातम्या

डिमॅट खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! 1 ऑगस्टपूर्वी अपडेट करा केवायसी

Bank Fraud : बँक खात्यात फसवणूक झाली असेल तर केवळ 10 दिवसातच मिळतील पूर्ण पैसे, फक्त करा हे काम