AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डिमॅट खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! 1 ऑगस्टपूर्वी अपडेट करा केवायसी

जर पॅनकार्ड शासनाने निश्चित केलेल्या तारखेआधी आधार कार्डशी लिंक केलेले नसेल तर पॅनकार्ड अवैध मानले जाईल. पॅनकार्ड आणि आधार कार्ड परस्परांशी लिंक करणे हे सर्वच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

डिमॅट खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! 1 ऑगस्टपूर्वी अपडेट करा केवायसी
डीमॅट आणि ट्रेडिंग खात्यात नामांकन : आता डीमॅट आणि ट्रेडिंग खाते उघडण्यासाठी, गुंतवणूकदाराला नामांकन माहिती देणे देखील आवश्यक आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराला नामांकन द्यायचे नसेल, तर त्याला त्याबाबत एक घोषणा फॉर्म भरावा लागेल. जर गुंतवणूकदाराने हे केले नाही तर त्याचे ट्रेडिंग आणि डीमॅट खाते गोठवले जाईल.
| Edited By: | Updated on: Jul 29, 2021 | 11:57 PM
Share

नवी दिल्ली : डिमॅट आणि ट्रेडिंग खातेधारकांना डिपॉजिटरीद्वारे 31 जुलैपर्यंत केवायसी अपडेट करण्यास सांगितले होते. अपडेटची शेवटची तारीख संपण्यासाठी फक्त दोन दिवस शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत खातेदारांनी ते लवकरच अपडेट करावे, अन्यथा त्यांचे खाते निष्क्रिय केले जाऊ शकते. यासंदर्भात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) यांनी परिपत्रकेही जारी केली आहेत. अवघे दोन दिवस हाती असल्यामुळे खातेधारकांना अधिक घाई करावी लागणार आहे. मात्र आपले खाते निष्क्रिय होण्याचा धोका रोखण्यासाठी केवायसी अपडेटसाठी वेळ काढणेच अधिक सोईचे होईल. (Important News for Demat Account Holders! Update KYC before 1st August)

उत्पन्नाच्या मर्यादेविषयी माहिती द्यावी लागेल

जर एकच मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी एकापेक्षा जास्त डीमॅट खात्यात टाकला गेला असेल आणि कौटुंबिक तपशील अपडेट केला गेला नसेल तर अशा डीमॅट खातेदाराला आपला मोबाईल नंबर / ईमेल आयडी दुरुस्ती फॉर्म किंवा विनंती पत्र सादर करण्यासाठी 15 दिवसांची नोटीस देणे आवश्यक आहे. जर नियमांचे पालन केले नाही तर अशा खात्यांचे पालन न करणारी खाती म्हणून वेगवेगळ्या श्रेणींमध्ये वर्गीकृत केले जाईल. ज्यामध्ये एक लाख ते 25 लाख उत्पन्न असणाऱ्या लोकांचा समावेश असेल. खातेधारकांना डिपॉझिटरीला त्यांच्या उत्पन्नाच्या मर्यादेविषयी माहिती द्यावी लागेल, ज्याची श्रेणी व्यक्ती आणि बिगरव्यक्तींच्या विविध श्रेणींमध्ये वर्गीकृत केली जाईल.

पॅनकार्ड आधारशी लिंक नसल्यास अवैध मानले जाईल

एनएसडीएल आणि सीडीएसएलच्या परिपत्रकानुसार, शेअर बाजाराच्या व्यवहारासाठी प्राप्तिकर विभागाने ग्राहकांना पॅनकार्ड आपल्या वेबसाईटद्वारे ऑनलाईन पडताळणी करण्यास सांगितले आहे. जर पॅनकार्ड शासनाने निश्चित केलेल्या तारखेआधी आधार कार्डशी लिंक केलेले नसेल तर पॅनकार्ड अवैध मानले जाईल. पॅनकार्ड आणि आधार कार्ड परस्परांशी लिंक करणे हे सर्वच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे खातेधारकांनी याबाबतीत मुळीच हयगय करता काम नये. सर्व लाभार्थ्यांसाठी (बीओ) स्वतंत्र मोबाईल क्रमांक आणि ईमेल पत्ते उपलब्ध करावे लागतील. तथापि, लेखी घोषणा सादर केल्यानंतर बीओ आपल्या कुटुंबातील सदस्यांचा मोबाइल नंबर व ईमेल पत्ता अपडेट करू शकतो. यात जोडीदार, अवलंबून असणारे पालक आणि मुलांच्या तपशीलाचा समावेश असेल. (Important News for Demat Account Holders! Update KYC before 1st August)

इतर बातम्या

Bank Fraud : बँक खात्यात फसवणूक झाली असेल तर केवळ 10 दिवसातच मिळतील पूर्ण पैसे, फक्त करा हे काम

VIDEO : नवोदित अभिनेत्रीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या निर्मात्यांना मनसेचा चोप

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.