Blood sugar : मध्यरात्री 3 वाजता अचानक ब्लड शुगर का वाढते?; वाचा सविस्तर

प्रत्येकाला रात्री निवांत आणि पुरेशी झोप हवी असते. रात्रीची झोप पूर्ण नाही झाली तर व्यक्ती दिवसभर त्रस्त असतो. अशावेळी अनेक लोक रात्रीच्यावेळी पाणी पिण्यासाठी आणि लघूशंकेसाठी उठतात. (Why Blood Sugar Levels Rise Overnight)

Blood sugar : मध्यरात्री 3 वाजता अचानक ब्लड शुगर का वाढते?; वाचा सविस्तर
blood sugar levels

मुंबई: प्रत्येकाला रात्री निवांत आणि पुरेशी झोप हवी असते. रात्रीची झोप पूर्ण नाही झाली तर व्यक्ती दिवसभर त्रस्त असतो. अशावेळी अनेक लोक रात्रीच्यावेळी पाणी पिण्यासाठी आणि लघूशंकेसाठी उठतात. त्यानंतर पुन्हा झोपी जातात. तशी ही काही समस्या नाही. मात्र, मधुमेही रुग्णांबाबत परिस्थिती अगदीच वेगळी असते. मधुमेही रुग्ण रोज मध्यरात्री 3 वाजता उठत असतात. (Why Blood Sugar Levels Rise Overnight)

मधुमेही रुग्ण मध्यरात्री 3 वाजता उठण्यामागंचं नेमकं कारण वेगळं आहे. ते पाणी पिण्यासाठी उठतात हे त्यामागचं खरं कारण नाही. तर त्यांच्या रक्तातील साखर वाढल्याने त्यांना मध्यरात्री 3 वाजता जाग येते. तज्ज्ञांच्या मते रक्तातील साखर वाढण्याचे दोन कारणे असू शकतात. पहिला म्हणजे सोमोगी इफेक्ट आणि डॉन फेनोमेनन. या दोन्हींमुळे आपली झोप का खराब होते? याबाबत जाणून घेऊया.

डॉन फेनोमेनन काय आहे?

शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी ग्लूकोजचा वापर केला जातो. अशावेळी सकाळी उठताना आपल्या शरीरात अधिक ऊर्जेची गरज असते. तुम्ही जेव्हा रात्री झोपत असता तेव्हा शरीरात अधिक ऊर्जेची आवश्यकता असते. जेव्हा तुम्ही झोपेत असता तेव्हा शरीर एकत्रित ग्लूकोजचा दुसऱ्या दिवसासाठी वापर करण्यास सुरुवात करतं.

यावेळी ग्रोथ हार्मोन, कोर्टिसोल आणि कॅटेकोलाईमनमुळे यकृत अधिक ग्लुकोज सोडतं. हीच प्रक्रिया रात्री 2 ते 3च्या दरम्यान होत असते. त्यामुळे शरीर दुसऱ्या दिवशीसाठी तयार होतं. जेव्हा ही प्रक्रिया सुरू असते तेव्हा डायबिटीजच्या औषधांचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे पहाटेच्यावेळी ब्लड शुगरची लेव्हल अधिक होते.

सोमोगी इफेक्ट म्हणजे काय?

पहाटेच्यावेळी रक्तातील साखर वाढण्याचं दुसरं कारण म्हणजे सोमोगी इफेक्ट होय. याला रिबाऊंड हाईपरग्लेसेमिया सुद्धा म्हटलं जातं. रात्रीच्यावेळी तुमच्या रक्तातील स्तर अत्यंत कमी होतो, तेव्ही ही परिस्थिती निर्माण होते. अशावेळी तुम्हाला लो ब्लड शुगर लेव्हलच्या खराब स्तरातून बाहेर पडण्यासाठी शरीर हार्मोन सोडत असते.

हे हार्मोनच यकृतातील एकत्रित ग्लुकोजला रिलीज करण्यास मदत करतात. मात्र, मधुमेह रुग्णांच्याबाबतीत यकृताकडून अधिक ग्लुकोज सोडलं जातं. त्यामुळेही पहाटेच्यावेली रक्तातील साखरेचं प्रमाण वाढलेलं दिसतं.

दोन्हींतील फरक काय?

सोमोगी इफेक्ट आणि डॉन फेनोमेननमधील फरक समजणं सोपं आहे. सोमोगी इफेक्टमुळे रक्तातील रक्तातील साखरेवर परिणाम झाला असेल तर रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर रक्तातील साखर तपासा. जर रात्री रक्तातील साखर कमी झाली असेल तर ते सोमोगी इफेक्टमुळेच झालं असेल. तसेच रक्तातील शर्करा साधारण किंवा त्यापेक्षा अधिक वाढला असेल तर ते डॉन फेनोमेननमुळे झाल्याचं समजावं. सोमेगी इफेक्ट दिवसा कधीही होऊ शकतो, हे लक्षात ठेवा.

रक्तातील साखर कशी चेक कराल?

सकाळी रक्तातील साखर वाढण्याचं कारण काय आहे हे एकदा समजल्यानंतर त्यावरील उपाय काय आहेत हे तुम्हाला आपोआप समजेल. त्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्लाही घेऊ शकता. यातून बरे होण्यासाठी डॉक्टर तुम्हाला काही सल्ला देऊ शकतात. तसेच काही सल्ले खालील प्रमाणे आहेत.

डॉन फेनोमेननसाठी

डायबिटीजची औषधे बदलणं
नाश्त्याच्यावेळी अधिक न खाणं
सकाळच्या औषधांचे डोस वाढवणे

सोमोगी इफेक्टसाठी

रात्रीच्यावेळी घेण्यात येत असलेल्या डायबिटीजच्या औषधांचा डोस वाढवणे
झोपतेवेळी कार्ब्सयुक्त स्नॅक्स खाणे
एक्सरसाईजचे शेड्यूल बदलणे (Why Blood Sugar Levels Rise Overnight)

 

संबंधित बातम्या:

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा वाढली, कोरोनाबळींतही वाढ सुरुच

Health Care : हाडे मजबूत करण्यासाठी आहारामध्ये ‘या’ फळांचा समावेश करा!

National Nutrition Week 2021 : अंकूर फुटलेले कडधान्य आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा अधिक!

(Why Blood Sugar Levels Rise Overnight)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI